(शशक-एक पायाचा कावळा)
पेरणा
फांदिवरी बसून
तो स्वमग्न होता
इच्छा आकांक्षाचा
हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली
परी न तो बधला
छळावयास तुम्हां
येईन फिरून वदला
पोटात कोकताना
कावले गुर्जी जेंव्हा
काढून दर्भ काक,
म्हणाले......
मिटवून हिशोब टाक
तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी रात्रंदिवस झुरतंय
माळावरचा दगडू पैलवान भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी टांगणीला गं लागलाय जीव
सुताराचा चकणा म्हादू तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम कानशीनं की करतो
डोईवर घेऊन शेण-बुट्टी ठुमकत गं तू निघते
दीवाण्यांची टोळी तुझ्या मागं मागं फिरते
प्रत्येकाला तुझाच राणी गुलाम बनून रहायचंय
तुला मात्र माधुरी बनायला म्हमईला जायचंय .
आमची पेर्णा: