मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मानवतेचं कलेवर

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
आतंकवादी बेलगाम पुलवामा,पहलगाम....... होतच रहाणार कुठवर मानवतेचं कलेवर ॐ शांती म्हणत ओढत रहाणार रोज रोज कुठवर मरायचं XXX की औलाद, तोंडाला लागलयं रक्त भ्याड हल्ले बघत रहायचं कुठवर आसवं गाळायची कुठवर मेणबत्ती जाळायची एकजुट होणार,का? फक्त राजकिय पोळी भाजणार भळभळतीय जखम नकोय आता रकम,हवा डोळ्याला डोळा,गोळीला गोळी आतंक्यांची होळी,मगच पुरण पोळी नको अश्वासने नको वल्गना हवी गुरूवाणी,शिवगर्जना पुरे आता दया,क्षमा,शांती मिटवा एकदाची खाज त्यांची पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा... आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे.. अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा.

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

साहित्य संपादक ·

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद ·
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.

च वै तु हि

पुष्कर ·
लेखनप्रकार
सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात. आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'...

ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा

कौशिक लेले ·
लेखनप्रकार
अमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते. मिपा लेख १ मिपा लेख २ त्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे. २ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- "क्रियापद रूपावली". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे ·
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

एक संध्याकाळ..

दिपक लोखंडे ·
लेखनप्रकार
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..