Skip to main content

बुद्धीबळाची गोष्ट: मॅक्सवेलसारखा थरार

लेखक मार्गी यांनी सोमवार, 31/08/2026 20:42 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. बुद्धीबळ हा खेळ मुलांच्या बुद्धीमत्तेला चालना देण्यासाठी ओळखला जातो. कल्पनाशक्ती, विचार शक्ती, संयम, दृढता ह्या गुणांसाठी तो उपयोगी ठरतो. अदू- माझ्या मुलीसोबत माझे आजवर शेकडो बुद्धीबळाचे डाव झाले आहेत. खूप छोटी होती तेव्हा हरल्यावर रडून माझ्या राजावर हवाई हल्ला करण्यापासून ते आता मला अधून मधून हरवण्यापर्यंत! किमान ३०० डाव आम्ही खेळलो असू. काही डाव खूप गाजले! एक डाव तर टायसुद्धा झाला. नियमित खेळायला लागल्यावर तिला हळु हळु गोष्टी कळत गेल्या. आता इथून पुढे मला तिच्याविरुद्ध जिंकणं कठीण आहे. एक मात्र खूप वेगळा रंगलेला डाव आठवतो. अगदी मी हरलोच होतो तो डाव. त्याची गोष्ट अशी. 

मुंबईत बस सेवेची 100 वर्षे 🚍🚍

लेखक साहित्ययात्री यांनी रविवार, 26/07/2026 03:02 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबईतील मोटारीकृत बस वाहतुकीची १०० वर्षांची यशस्वी वाटचाल

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराच्या विकासामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. त्यामध्ये मोटारीकृत बस वाहतूक ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी ठरली आहे. १५ जुलै १९२६ रोजी मुंबईमध्ये मोटारीकृत बस सेवेची सुरुवात झाली.  या सेवेला आता १०० वर्षे पूर्ण झाली असून हा प्रवास केवळ वाहतुकीचा नसून मुंबईच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाचाही साक्षीदार आहे.