लेखकमाहितगारयांनी मंगळवार, 19/03/2024 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी शुक्रवार, 30/06/2023 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले
प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच...
चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी,
दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.
लेखकRDKयांनी गुरुवार, 21/09/2017 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
बठा चालना गयात
ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं
ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत
जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस
फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस
ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे
ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे
मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत
पण तो वट्टा
लेखकमधुकायांनी बुधवार, 30/11/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
(बहिणाबाईंची माफी मागून)
अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार
आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर
अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही,
भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही!
अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं,
येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं
अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार
देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!
लेखकमाहीराजयांनी शनिवार, 02/04/2016 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे,
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच
श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच
वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही
जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही
एक नियती सार्यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..
लेखकपाषाणभेदयांनी रविवार, 14/07/2013 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत.