तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो
तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस
आणि त्यात माळलेला तो मोगर्याचा गजरा
पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते
कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली
तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो.
जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती
प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची
मी तिची अडचण समजाउन घेतली आणि
मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा.
जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता
पण शेवटी करार हा करारच असतो
मग मी प्रेम करतच राहिलो आणि
ती लग्न करुन निघून गेली
पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही
मी तिची वाट बघत थांबलो
वीस वर्षांपूर्वी म्हणजे दि. ५ ऑगस्ट २०१४ रोजी हम आपके है कौन हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यातली माधुरी दिक्षीत आठवली की अजुनही हृदयातुन हलकीशी कळ उठते.
असा चित्रपट आपण मराठीतही करायचा हे आम्ही त्याच वेळी ठरवले होते. त्याच्या आधिच, म्हणजे साधारण १९९४ सालच्या आधिच आम्ही एक गाणे लिहिले होते. ते आमच्या आगामी चित्रपटासाठी योग्य आहे असे आम्हाला वाटले. आज आम्ही ते रसिकांच्या चरणी अर्पण करत आहोत.
तरी सुध्दा एक खुलासा करावासा वाटतो. ही कविता संपूर्ण पणे स्वतंत्र आहे आणि तीचा इतर कोणत्याही मराठी किंवा हिंदि किंवा इतर कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेल्या कवितेशी कोणताही संबंध नाही.