✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

||राधायन.. एक सांगीतिक कथादर्शन|| (निमंत्रण)

प
प्राची अश्विनी यांनी
Fri, 04/01/2022 - 08:48  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर्स या गुढीपाडव्याला, 2एप्रिल, रात्री 8.30 वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात " राधायन .. एक सांगीतिक कथादर्शन" हा कार्यक्रम घेऊन येतोय. त्याचं हे आग्रहाचं आमंत्रण. नवीन कथा, गीते, संगीत व नृत्ये, आणि या सा-यांच्या जोडीला चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक, असा अनोखा मेळ साधणारा कार्यक्रम, "राधायन- एक सांगीतिक कथादर्शन, गुढीपाडव्याच्या शुभदिनी, 'राधा-कृष्ण' हा म्हटलं तर परिचित विषय; पण कल्पनेला, प्रतिभेला सतत आवाहन करणारा! राधेच्या वृंदावनातील वास्तव्याच्या आणि कृष्णसहवासाच्या अनेक आख्यायिका आहेत. परंतु कृष्ण वृंदावनातून बाहेर पडल्यानंतरच्या राधेबद्दल आपणास फार माहीत नाही. राधेच्या आयुष्याच्या या अपरिचित पर्वात जर आपल्याला डोकावायला मिळालं तर? "राधायन" हा असाच एक प्रयत्न ज्याच्या पूर्वाधात आणि उत्तरार्धातही राधा आहे. श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायलेल्या राधेच्या कृष्णापर्यंत पोचणा-या एका कल्पनेतील प्रवासाचे वर्णन साकारणारा अविष्कार म्हणजे राधायन. "राधायन" म्हणजे राधा आणि अयन (अयन म्हणजे प्रवास). Radhayan कथा व कथन- डॉ. प्राची जावडेकर संगीत- डॉ. आश्विन जावडेकर निवेदन- मंजुषा अमीन कला - शिल्पा बेंडाळे प्रकाश- अतुल जोशी, आकाश पांचाळ लाईव्ह पेंटिंग- शिल्पा बेंडाळे गायन- श्रीराम नरसुळे, वृशाली देढे, डॉ.आश्विन जावडेकर नृत्य- अनन्या गोवित्रीकर, चिन्मय जोशी. प्रिया समर्थ, प्रतिक्षा फडके, यशश्री जोशी, तन्वी घनवटकर. गीते- संत एकनाथ, पु. शि. रेगे, प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, मनोहर नाईक, संगीता जोशी, प्रदीप कुलकर्णी, डॉ प्राची जावडेकर, डॉ आश्विन जावडेकर साथसंगत- डॉ. हिमांशू गिंडे, गौरव मूरकर, अभिजित करंजकर, अभिषेक प्रभू, श्रेयस कांबळे समूह गायन- डॉ श्रद्धा नाटेकर काळे, रमा अमीन, ओवी जावडेकर उक्ती जावडेकर. रंगमंच साहाय्य- वर्षा ओगले, मानसी जोशी, ध्वनी- यतीश पाटील ध्वनिमुद्रण- गणेश पोकळे, ऑडिओ आर्ट्स. छायाचित्रे- आमोद घैसास, मंगेश खानविलकर संयोजन व मार्गदर्शन- श्री. सुमुख वर्तक तिकिटे नाट्यगृहावरती तसेच www.ticketkhidakee.com येथे उपलब्ध आहेत. नक्की या आणि प्रोत्साहन द्या. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्षेत आहोत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
संगीत
कथा
स्थिरचित्र

प्रतिक्रिया द्या
13400 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

नेहमी प्रमाणे फोटो

प्राची अश्विनी
Fri, 04/01/2022 - 08:51 नवीन
नेहमी प्रमाणे फोटो डकवण्याच्या बाबतीत अनपढ गवार असल्याने तो टाकता येत नाहीये. :)
  • Log in or register to post comments

व्वा, मस्तच !

चौथा कोनाडा
Fri, 04/01/2022 - 12:20 नवीन
व्वा, मस्तच ! राधायनास हार्दिक शुभेच्छा ! फोटो मला chautha.konada@gmail.com ला पाठवल्यास मी इथे पोस्ट करीन.
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद. मी तुमचा

प्राची अश्विनी
Fri, 04/01/2022 - 18:07 नवीन
खूप खूप धन्यवाद. मी तुमचा रिप्लाय पहाण्याआधी फोटो आला सुद्धा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

व्वा, भारीचग्रेट !

चौथा कोनाडा
Fri, 04/01/2022 - 20:59 नवीन
व्वा, भारीचग्रेट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

||राधा-कृष्ण||

तुषार काळभोर
Fri, 04/01/2022 - 14:42 नवीन
भारतीय संस्कृतीतील कदाचित सर्वाधिक मनमोहक युगल... कार्यक्रम सुंदर होईलच! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर! कुणी ठाणैकर

प्राची अश्विनी
Fri, 04/01/2022 - 18:08 नवीन
धन्यवाद सर! कुणी ठाणैकर ओळखीचे असतील तर नक्की कळवा त्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सुंदर फोटो

सौंदाळा
Fri, 04/01/2022 - 15:00 नवीन
सुंदर फोटो कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मनापासून धन्यवाद. :)

प्राची अश्विनी
Fri, 04/01/2022 - 18:08 नवीन
मनापासून धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

अरे वा प्राची ताई

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/01/2022 - 18:09 नवीन
मस्त, कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा इकडे वृत्तांत लिहायला विसरु नका पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद बुवा. नक्की लिहीन

प्राची अश्विनी
Fri, 04/01/2022 - 18:17 नवीन
धन्यवाद बुवा. नक्की लिहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कार्यक्रम बघायला आवडेल

गामा पैलवान
Fri, 04/01/2022 - 20:55 नवीन
प्राची अश्विनी, कार्यक्रमास शुभेच्छा. कलाकारी बघायला आवडेल. व्यासांच्या बहाभारतात राधा हे पात्र नाही ( ऐकीव माहिती ). तर मग राधायनाचा स्रोत काय आहे? कुतूहल म्हणून विचारतोय. कथाकार तुम्हीच आहात असं गृहीत धरतोय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

व्यासांच्या महाभारतात राधा

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:25 नवीन
व्यासांच्या महाभारतात राधा नाही. राधायन मध्ये त्याचा उहापोह केला आहे.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आणखी एक पोस्टर !

चौथा कोनाडा
Fri, 04/01/2022 - 21:01 नवीन
आणखी एक पोस्टर ! Image removed.
  • Log in or register to post comments

कार्यक्रमा करता शुभेच्छा

कर्नलतपस्वी
Fri, 04/01/2022 - 22:16 नवीन
राधा की आँखें तरसी होंगी, जब कान्हा मथुरा गये होंगे, दिल भी बहुत रोया होगा, जब वो रूक्मिणि के भये होंगे।
  • Log in or register to post comments

वाह)!

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:28 नवीन
वाह)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सुंदर कल्पनेसाठी (थीम)

Bhakti
Fri, 04/01/2022 - 22:29 नवीन
सुंदर कल्पनेसाठी (थीम) अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:28 नवीन
धन्यवाद! (खूप दिवसांनी मिपावर आले म्हणून रिप्लाय करायला उशीर झाला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

आत्ताच तीन हात नाक्याला

धर्मराजमुटके
Fri, 04/01/2022 - 22:34 नवीन
आत्ताच तीन हात नाक्याला जाहिरातीचा फलक पाहिला. कार्यक्रमाला येणे शक्य नाही मात्र कार्यक्रमास शुभेच्छा ! जमल्यास कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाची ओळख म्हणुन एखादा ५-१० मिनिटाची चित्रफीत येथे प्रदर्शित करावी.
  • Log in or register to post comments

wow!

जव्हेरगंज
गुरुवार, 04/07/2022 - 12:51 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:27 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/07/2022 - 14:25 नवीन
अरे वाह ! अभिनंदन आणि शुभेच्छा.! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कार्यक्रम होऊन गेल्यावर

धर्मराजमुटके
गुरुवार, 04/07/2022 - 16:54 नवीन
कार्यक्रम होऊन गेल्यावर शुभेच्छा द्याव्यात काय असा एक प्रश्न पडला :) अर्थात त्यांची गरज माणसाला केव्हा ही पडू शकते ब्वॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नक्कीच पुढील कार्यक्रमासाठी

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/07/2022 - 17:30 नवीन
प्राडॉ सर दुरदर्शी आहेत, नक्कीच पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या असणार !

😎

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

सर तुमच्या मुखी साखर पडो. :)

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:25 नवीन
सर तुमच्या मुखी साखर पडो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अभिनंदन

सरिता बांदेकर
Sat, 04/09/2022 - 08:45 नवीन
प्राची अश्विनी अभिनंदन. आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये तुमच्या प्रयोगाबद्दल चांगलं लिहून आलं आहे. ठाण्यात नाहीय त्यामुळे प्रयोगाला येऊ शकले नाही.पण पत्र वाचून खूप आनंद झाला.
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद!

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:26 नवीन
खूप खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरिता बांदेकर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा