मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

मार्गी ·
लेखनप्रकार
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

मार्गी ·
लेखनप्रकार
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(न्हाऊन ये त्वरेने)

ज्ञानोबाचे पैजार ·
आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच... चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी, दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.

(ढबोला...)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा :- प्राची ताईची अबोला.. http://misalpav.com/node/50707#comment-1153556

ढबोला...

तुझ्या ढबोल्या भावाने सोडला मागे भस्मासूर जीव झाला वेडापिसा त्याचा पाहुनिया नूर तुझ्या ढबोल्या भावाने कशी ओरपली नळी? उरे हडकांचा ढीग रस्साजाई खोल तळी तुझ्या ढबोल्या भावाने किती भाकरी हादडल्या.. अगं वेडे भातही आता आला नं संपाया! तुझ्या ढबोल्या भावापुढे मी सपशेल शरण, बघावे तेव्हा तेव्हा याचे चालूच चरणं ! (“चरणं” मधला “च” हा चरख्यातला “च” आहे याच्री कृपया नोंद घ्यावी) पैजारबुवा,

(सन्तूर)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा आमचे परम मित्र श्री श्री १०८ अनन्त्_यात्री यांची ही कविता http://misalpav.com/node/50404

(सन्तूर)

झटपट छनछन तुषार अगणित भवतालाला व्यापत उडले रोमरोम पुलकित करुनी त्यांनी वरुणावरती गारूड केले स्वरचित्रातील अवकाशात अचूक तिचे आगमन झाले सुंदरीचे त्या चिमुरडीशी निगूढ नाते पुनश्च कळले स्वप्नशिल्पातील कल्पनेचा वर्तमानाशी घालूनी मेळ नेहमी सारखा सहज रंगला सुपरमॉमचा अद्भुत खेळ पैजारबुवा, कवितेतले गूढ उलगडण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पहावा https://www.youtube.com/watch?v=Oy9za_67vgk

(दळण नसलेल्या गिरणीवर)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा http://misalpav.com/node/50380 कर्नलसाहेबांची त्रिवार क्षमा मागून *दळण नसलेल्या गिरणीवर* जेंव्हा कोणीतरी पीठ पाडतं मग त्या पिठावरच्या सरळ रेषाच कंटाळून नागमोडी होऊन जातात टोमणे आणि कुचकट बोलणे जेव्हा नित्याच होतं तेव्हा वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं बदललेला गिरणी चालक आणि त्याच्या भूलथापांचा मारा सततची कुचंबणा, अन अवहेलना आणि नको नकोसे असमान वाटप वाटेवर नाराजी पसरवते भिजलेला सैनिक,त्याचा दबलेला आवाज पुन्हा एकदा गर्जना करतो अन नाराज वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते अतिरेक झाला की असेच

(किती काळ तुडवायचे)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा किती काळ झुलवायचे http://misalpav.com/node/50291

किती काळ तुडवायचे

खरे सांग केव्हा तुझ्या बंद ओठी साथीदारांचे नाव केव्हा उमटायचे किती घालायचे तुला टायरी अन किती वेळ पाण्यात बुडवायचे तुला कोठडी लागली आवडायला आम्ही रिमांड कितीदा मागायचे मळकट घोंगडे पुन्हा पांघरोनी तू मात्र बिनघोर झोपायचे अरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती दिनभर नाचायचे कोर्टातही तू अससी मुक्याने माXXXX जजनाही किती काळ झुलवायचे कोपऱ्यात ढीग तुटक्या वेत छड्यांचा अजून किती काठ्यांना तोडायचे कितीदा करावे रफू शर्टाला कितीदा पुन्हा तुला

(थू)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेर्णा पाभे सरांची तू http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग तू हसते अशी छाती माझी धडधडे ग गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

(वल्लीदांच्या सहवासात)

ज्ञानोबाचे पैजार ·
कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची बघू केव्हा पूर्ण होते ती?