नमस्कार,
माझी पत्नी सुवर्णा एक हौशी चित्रकार आहे.
बर्याच वर्षांपूर्वी तिनं चित्रकलेचा एक लहानसा कोर्स केला होता. तेव्हापासून ती अधूनमधून चित्रे काढत असते.
आमचं घर म्हणजे तिच्या चित्रांचं एक छोटं प्रदर्शनच आहे. ;)
ती अधूनमधून मिपावरची चित्रे पहात असते. (शार्दूल कदमांची चित्रं पाहून ती थक्क झाली.)
संगणक/ आंतरजाल/ मराठी कळदाबी यापासून ती दूर असल्याने तिच्यावतीने मी तिची चित्रे चिकटवत आहे.
तिनं काही प्रख्यात चित्रकारांची चित्रं नकलली आहेत तर काही चित्रं लोककला स्वरूपाची आहेत. बघा, तुम्हाला कशी वाटतात -
(मूळ चित्रकार - राजा रविवर्मा .