एक किंचित चोप्य्पस्ते कविता : ती सध्या काय करते ?
आमची पेर्णा: (एक एकटा एकटाच.. यांची क्षमा मागून)
आमची पेर्णा: (एक एकटा एकटाच.. यांची क्षमा मागून)
कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.
तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.