Skip to main content

जीवनमान

जीवनमान — जीवनशैली, आरोग्य, नातेसंबंध आणि दैनंदिन जगणे यांवरील मराठी लेख. जीवन अधिक अर्थपूर्ण करणारे अनुभव व मार्गदर्शन येथे वाचा.

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

लेखक संपादक मंडळ यांनी शनिवार, 02/11/2013 05:16 या दिवशी प्रकाशित केले.

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

आयटीतला किस्सा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/11/2026 20:19 या दिवशी प्रकाशित केले.

आयटीतला किस्सा

त्या ग्रे रंगाच्या नेटवर्क केबलवरचा मास्किंग टेप अजूनही "REMOVE ON FRIDAY" असंच सांगतोय. ज्याने ते लिहिलं, तो तारीख न लिहिण्याइतका हुशार होता. 😂 


याची सुरुवात एका अगदी योग्य होती. मीटिंग रूमला एका दुपारसाठी कनेक्शन हवं असतं, पोहोचेल इतकी लांब एक स्पेअर केबल पडलेली असते, आणि कोणीतरी म्हणतं, "रूम रिकामी झाली की मी परत येऊन काढतो."

दीपावली आणि पणती

लेखक Bhakti यांनी रविवार, 08/11/2026 14:24 या दिवशी प्रकाशित केले.

 

“कार्तिक महिन्याचा पहिला दिवस, म्हणजे अमावास्या, जेव्हा सूर्य तुळ राशीत प्रवेश करतो, त्याला दिबाली म्हणतात.

 

त्या दिवशी लोक आंघोळ करतात, उत्सवी वस्त्रे घालतात, एकमेकांना पान-सुपारी देतात; ते मंदिरांना जातात, दान देतात आणि दुपारपर्यंत आनंदाने खेळतात-गातात.

 

रात्री ते सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवे लावतात, इतके की हवा पूर्णपणे प्रकाशमान होते.

 

लक्ष लक्ष दीप उजळले

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/10/2026 22:24 या दिवशी प्रकाशित केले.

 

मला अनेक गोष्टींचे कौतुक वाटते. त्यात एक सुंदर गोष्ट म्हणजे ' दिवे '!
त्या कापसाच्या वातीने, तेलाच्या साथीने, उजळेले दिवे खुप सकारात्मकता देतात.
कोजागिरीला ज्येष्ठय अपत्य ओवाळणी हा फार घरात होणारा रूढी परंपरा आहे. काही घरात मुलगा ज्येष्ठय असेल तरच ओवाळतात. पण आता तसें करत नाही. मुलगा असो वा मुलगी तिला ओवाळतात.
हं... तर असें दिव्यांविषयी जे काही सुचेल, समजेल ते इथे देत राहीन.... दिवाळी पर्यंत!!
उठा उठा दिवाळी आली... लक्ष लक्ष दिव्यांची आरास लावण्याची वेळ झाली....😊

सह्याद्री वाचवा !

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 26/10/2026 09:06 या दिवशी प्रकाशित केले.

सह्याद्रीच्या जंगलावर कुऱ्हाड, जनतेच्या पैशांवर भार आणि सत्ताधाऱ्यांचे उद्योगपतींशी हितसंबंध — टॉरंटच्या कर्जत प्रकल्पाला विरोध का केला पाहिजे?

३२,४९० झाडे तोडून ३,००० मेगावॅटचा पंप स्टोरेज प्रकल्प उभारणे म्हणजे विकास की निसर्गाच्या किमतीवर खासगी कंपनीसाठी नवा व्यवसाय?

शेवटचा तुकडा..

लेखक गवि यांनी गुरुवार, 12/03/2026 17:21 या दिवशी प्रकाशित केले.

जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. 

असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  

शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  

पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?