पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले.
हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.
मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??
भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??
एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.
पुर्वपिठिकाभडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!
Howdy मिपाकर्स
आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन?
येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.
तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.
आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया!
एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!
Howdy मिपाकर्स
आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन?
येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून.
तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे.
आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया!
एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन.....
######
जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत
तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस
*
देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही
तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते?
पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर
शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास
तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या
चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस?
भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली
परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?
पेरणा
अर्थात प्राची ताईंची मनातल्या मनात क्षमा मागून
भेटायला गेलो,
गप्पा मारून आलो?
माझ्याच घरुन मी
चहा पिऊन आलो..
ना थेंब दिलास पाण्याचा
पण बोध फुकट दिलास.
आपापल्या घरून आपण
चहा पिऊन आलो..
मित्र होते वर्हाडी,
पुण्यामध्ये नवखे ?
त्यांना कसे पटावे मी
चहा पिऊन आलो..?
कप जरी धुतले तरी
थोडे पिवळे झाले ..
कुणास समजू न देता मी
(गुपचुप) चहा पिऊन आलो.
पैजारबुवा,
पेरणा...अर्थातच
एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....
-चमचमचांदन्या