आमच्या टेरेसवरच्या छोट्याश्या बागेत अनेक वर्षे एक ब्रह्मकमळाचे (Epiphyllum oxypetallum) रोपटे एक कोपरा पकडून झोपाळू अनामिक सदस्यासारखे चूपचाप पडून आहे. हिमालयात आणि श्रीलंकेत मूळ घर असलेली ही वनस्पती भारताच्या अनेक घरांच्या बागेत रोपट्यांच्या स्वरूपात वाढवली जाते. तिचा भारतापेक्षा थोडा वेगळा प्रकार (Phyllocactus purpusii) मेक्सिको, ब्राझील, इ अमेरिकन खंडातील देशांतही सापडतो.
बागेतल्या इतर नखरेल वृक्षवल्लींना सांभाळताना आणि त्यांच्या सुंदर रूपरंगाचे कौतुक करताना या कार्टूनमध्ये रोडरोलर अंगावर जाऊन सपाट झाल्याप्रमाणे दिसणार्या बिचार्या वनस्पतीकडे बर्याचदा लक्षही जात नाही.