मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज मै उपर , आसमां नीचे--१

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मै उपर , आसमां नीचे करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे.

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) २१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.

दोसतारः शाळेत लग्न लागते २

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो. फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती. हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53531 इतके कंटाळलो होतो की रोजच्यासारखे जित्या बोलावत असतानाही ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो नाही.

दोसतारः शाळेत लग्न लागते (१)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्‍या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही. कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्‍याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्‍याची चटणी तरी हवीच. पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.

मंतरलेले बेट (ऐसी अक्षरे -३९)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff.

महामाया निळावंती (ऐसी अक्षरे ३८)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महामाया निळावंती लेखक-सुमेध 1 दोन वर्षांत २५ वी आवृत्ती प्रकाशित झालेली ही मराठी साहित्यातील आताची उत्कृष्ट कादंबरी आहे. जीवनाची लालसा मृत्यूला हरवायला पाहते.

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

विषारी सरोवर : युधिष्ठिराची अखेर

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बराच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकत होता. तहानेने त्याचा गळा कोरडा पडला होता. अखेर त्याला वाळवंटात दूर एक सरोवर दिसले. "आता पाणी मिळेल, तहान भागेल," या आशेने तो त्वरित सरोवराजवळ पोहोचला. पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले! हे दृश्य पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी? बहुतेक सरोवराचा रक्षक यक्ष असावा.

सैरभैर डायरी - २.४

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२.१ २.२ २.३ ज्याचा पगार ७००० आहे.त्याला एकरकमी २ लाख म्हणजे मोठी रक्कम होती. बुलेटची डुग डुग कानात ऐकू यायला लागली होती. २.४ विचार करून सांगतो म्हणून बाहेर सटकलो. बिल्डरला प्रत्यक्ष बघणारा मी एकमेव साक्षीदार होतो , माझ्या साक्षीवर केस बरीच पुढे जाणार होती . पोलिसांना मोठा रीमांड मिळाला असता म्हणून ही गुळपट्टी लावणे चालले होते. उगाच माझ्या मागे झा*उपट ! असला रोज रोज थोडी आपल्या आयुष्यात घडते ?