"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
18 Aug 2017 - 10:23 pm

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत.

त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे. त्याचा तपशील असा आहे...

दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) )
भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ
कार्यक्रम :
   १) हिरवळीवर (पावासाने हजेरी लावल्यास, लेण्यामध्ये) गप्पा
   २) जमलेल्या मिपाकरांनी सर्वानुमते ठरवलेल्या जवळच्या एका उपहारगृहात ("तू तेरा, मै मेरा" बेसिसवर) भोजन

नवीन-जुन्या, (वयाने) लहान-मोठ्या, लेखक-वाचनमात्र, इतर मिपाकरांशी प्रत्यक्ष ओळख असलेल्या-नसलेल्या... म्हणजे एकंदरीत सर्वच आजी-माजी-भावी-हौशे-नवशे-गवशे मिपाकरांचे कट्ट्यामध्ये स्वागत आहे.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

मोदक's picture

18 Aug 2017 - 10:39 pm | मोदक

येणार...!!!

खेडूत's picture

18 Aug 2017 - 10:44 pm | खेडूत

+१

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2017 - 11:02 pm | अभिजीत अवलिया

कट्ट्याला शुभेच्छा. ह्या काळात महाराष्ट्राबाहेर असल्याने इच्छा असून पण येऊ शकणार नाही.

आल्यावर डिट्टेल प्रवासवर्णन टाकायचे आहे हे लक्षात असूद्या...!!

जुइ's picture

19 Aug 2017 - 7:01 am | जुइ

सविस्तर वृत्तांत येऊद्यात.

चामुंडराय's picture

20 Aug 2017 - 8:04 am | चामुंडराय

अनिवासी यांचे अनुभव वाचायला आवडतील.
गप्पा गोष्टी आणि खादाडी यांचे फोटो येऊ देत.

भाते's picture

20 Aug 2017 - 11:07 am | भाते

कट्ट्याचा सचित्र आणि सविस्तर शाब्दिक वृत्तांत मिपावर येईलच. पण ते आता जुने झाले. जर शक्य असेल तर चतुरभ्रमणध्वनीवरून कट्ट्याच्या काही भागाचे (खादाडी सोडुन, इतर गप्पागोष्टी वैगरे) चित्रण करून मिपाच्या तुनळीवरच्या वाहिनीवर टाकणे शक्य होईल का? कट्ट्याला प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने तुनळीवर काही भाग पाहुन समाधान करून घेता येईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2017 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्ट्याला शुभेच्छा...! सविस्तर फोटो आणि वृत्तांताची वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे

उपेक्षित's picture

20 Aug 2017 - 2:58 pm | उपेक्षित

येणार

पिलीयन रायडर's picture

20 Aug 2017 - 5:43 pm | पिलीयन रायडर

शुभेच्छा!!

जनल्यास फेसबुकवर लाईव्ह जा! आम्हालाही तिथे असल्यासारखं वाटेल!

धडपड्या's picture

21 Aug 2017 - 12:37 am | धडपड्या

अशा अनुभवी माणसा सोबत गप्पा मारायचा चान्स कोण सोडेल?

नक्की येणार...

अरुंधती's picture

21 Aug 2017 - 10:14 am | अरुंधती

कट्ट्याला शुभेच्छा!

सूड's picture

21 Aug 2017 - 12:46 pm | सूड

शुभेच्छा!!

मिपाकर कंजूस दीड तास आधी म्हणजे सकाळी ९:४० पर्यंत पोहोचतील्,त्यामुळे मी लवकर येत आहे.
अजून कोण कोण लवकर येऊ शकतात?

मोदक's picture

24 Aug 2017 - 7:37 pm | मोदक

मी येतोय.

पिलीयन रायडर's picture

24 Aug 2017 - 7:51 pm | पिलीयन रायडर

फेसबुक वर लाईव्ह जा रे.

lakhu risbud's picture

25 Aug 2017 - 6:33 pm | lakhu risbud

मी नक्की येणार.

अन्य एकही जण परिचित नसलेलं कोण कोण येणार आहे?

Ranapratap's picture

24 Aug 2017 - 6:09 pm | Ranapratap

येणार

प्रशांत's picture

25 Aug 2017 - 11:50 am | प्रशांत

हजेरी लावण्यात येईल

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2017 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा

कामातून येळ ह्रायल्यास चक्कर टाकनेत यील.

पुण्यात पाऊस कसा आहे? ठाणे मुंबईतला दहीहंडी अगोदरपासून लागलेला पाऊस थांबलेला नाही.

मोदक's picture

26 Aug 2017 - 9:28 am | मोदक

छत्री घेऊन या.

कडक ऊन आणि पाऊस जे कांही असेल त्या दोन्हीत वापरता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2017 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे पावसाची मधून मधून रिपरिप चालू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून छत्री आणू शकता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2017 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपाकरांना उद्याच्या कट्ट्याची आठवण करून देण्यासाठी हा धागा वर आणत आहे.

दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) )
भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ

या धाग्यावर प्रतिसाद दिला असलेल्या/नसलेल्या व अचानक येण्याचा बेत केलेल्या सर्वांचे स्वागतच आहे.

मग भेटूया उद्या !

Ranapratap's picture

27 Aug 2017 - 9:26 am | Ranapratap

लवकरच पोहचतो

Ranapratap's picture

27 Aug 2017 - 9:26 am | Ranapratap

लवकरच पोहचतो

कट्टा सुरू झाला. अनिवासी आताच आले. बाराजण आहेत.

कंजूस's picture

27 Aug 2017 - 11:12 am | कंजूस

फोटो मिपाकर mipakar facebook group टाकले आहेत.

कंजूस's picture

27 Aug 2017 - 11:40 am | कंजूस

फोटो १

डावीकडून - शरद हर्डीकर, Ranapratap, खेडूत, बसलेले अनिवासी ( श्री मुकुंद नवाथे ), उभे त्यांचे नातेवाईक, कंजूस, प्रचेतस, सतिश गावडे, मोदक, संत घोडेकर.

कंजूस's picture

27 Aug 2017 - 1:49 pm | कंजूस

फोटो २

डावीकडून - खेडूत, अनिवासी ( श्री मुकुंद नवाथे ), मोदक आणि संत घोडेकर.

फोटो३

डावीकडून - lakhu risbud ,Ranapratap, खेडूत, संत घोडेकर, डॉ सुहास म्हात्रे, प्रशांत, कपिलमुनी, मोदक, प्रचेतस आणि सतिश गावडे.

फोटो४

डावीकडून - डॉ सुहास म्हात्रे, संत घोडेकर, सतिश गावडे( टोपीवाले), कपिलमुनी, मोदक, lakhu risbud.

बाजीप्रभू's picture

27 Aug 2017 - 2:18 pm | बाजीप्रभू

नावं सांगता का प्लिज... म्हणजे आम्हालाही ओळख होईल.

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2017 - 1:56 pm | माम्लेदारचा पन्खा

आवडला . . . . .

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Aug 2017 - 2:11 pm | माम्लेदारचा पन्खा

वेगळा वृत्तांत अपेक्षित आहे . . कोणीतरी मनावर घ्या !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2017 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

येणार, येणार, लवकरच येणार ! मोदकने सविस्तर वृत्तांत टाकण्याचे काम स्विकारले आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Aug 2017 - 2:10 pm | हतोळकरांचा प्रसाद

संपला की आहे अजून कट्टा? कुठे जेवत आहात/जेवलात?

सतिश गावडे's picture

27 Aug 2017 - 2:48 pm | सतिश गावडे

कट्टा संपला. सर्वांनी जंगली महाराज रस्त्यावरील पांचाली उपहारगृहात स्नेहभोजन केले. त्यानंतर सर्वजण मार्गस्थ झाले.

हतोळकरांचा प्रसाद's picture

27 Aug 2017 - 2:53 pm | हतोळकरांचा प्रसाद

हैला! जेएम रोडवरचं काम संपायला 1:45 वाजले. पांचाली कि मॉडर्न कॅफे कि शिवसागर असा विचार करत शेवटी शिवसागर मध्ये शिरलो. यामुळेच मी कॅसिनो/लॉटरी वगैरेच्या भानगडीत पडत नाही :|

कट्टा हुकुमी आला नाही :(.

कंजूस's picture

27 Aug 2017 - 2:59 pm | कंजूस

Audio
अनिवासी यांच्याशी गप्पा १

पद्मावति's picture

27 Aug 2017 - 4:36 pm | पद्मावति

किती सुंदर मनमोकळ्या गप्पा. खूप छान वाटलं. बनारसे आजींबद्दल अनिवासी सर म्हणतात तेच मला अनिवासी सरांविषयी म्हणावसं वाटतं की He is an institution in himself__/\__

सही रे सई's picture

29 Aug 2017 - 12:31 am | सही रे सई

या पहिल्या क्लीपला काहीतरी एरर येत आहे.

कंजूस's picture

29 Aug 2017 - 7:48 am | कंजूस

Audio
अनिवासी यांच्याशी गप्पा १

अनिवासी यांच्याशी गप्पा
Audio २
अनिवासी यांच्याशी गप्पा

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2017 - 3:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

कट्ट्याचे अजून काही फोटो...

नंदन's picture

27 Aug 2017 - 5:08 pm | नंदन

महाराष्ट्र मंडळात बसणार्‍या नाटकांमागचे किस्से हे इतके प्राचीन आहेत, हे ऐकून गंमत वाटली. गप्पांच्या क्लिपा येथे दिल्याबद्दल कंकाकांचे आभार.

प्रचेतस's picture

27 Aug 2017 - 6:50 pm | प्रचेतस

कट्ट्याला मजा आली खूप. नेहमीप्रमाणेच धमाल झाला कट्टा.

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2017 - 7:50 pm | पिलीयन रायडर

मोदकने पिंग केलं तोवर मी झोपले होते, नाही तर किमान व्हिडीओ कॉल करुन हजेरी लावली असतीच. :(

पण कंजुस काकांनी ऑडीओ टाकलेत ते ऐकुन समाधान मानेन. त्याबद्दल धन्यवाद कंकाका!

वा! कट्टा आणि खादाडी हे दोन्ही कार्यक्रम मिपाच्या शिरस्त्याला अनुसरून दणक्यात झालेले दिसत आहेत! फोटोंखाली मिपाकरांची नावे देता येतील का? ऑडिओ क्लिप तर खासच.

अरे वा! गप्पांचा ऑडिओ मस्तच.

चौकटराजा's picture

28 Aug 2017 - 12:12 pm | चौकटराजा

काही सुपर सिनियरना उत्तम स्मरणशक्तीची देणगी दैववशात मिळते.दुसरे असे की आठवणी सांगण्यासाठी आयुष्य तसे उत्कटतेने, डोळसपणे जगावे लागते. पैकी कटट्याचे मुख्य निमंत्रित असावेत. त्यानी सांगितलेल्या आठवणी मजेशीर आहेत.त्याना मी उत्तम आरोग्य चिंतितो.

सिरुसेरि's picture

28 Aug 2017 - 1:48 pm | सिरुसेरि

छान कट्टा . छान आठवणी .

फोटो छान आलेत. ऑडिओ क्लिप पहिली ऐकायला नाही मिळाली पण दुसरी ऐकली. हसू आले.
वृत्तांताची वाट पहात आहे.

चामुंडराय's picture

29 Aug 2017 - 2:39 am | चामुंडराय

.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2017 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवातीच्या फोटोंखाली सर्व हजर लोकांची नावे (आयड्या) दिल्या आहेत.

...तर एक्काकाकांनी अनिवासीकाकांसोबतच्या कट्ट्याचा धागा काढला आणि जायचे निश्चित झाले. इतक्या अनुभवसमृद्ध माणासाची भेट कोण चुकवणार..?

सकाळी लवकरच कंजूस काकांना भेटायला जायचे ठरले मात्र अचानक निघालेली कामे आणि पुण्यातले ट्रॅफिक यांमुळे अंमळ उशीर झालाच.

मी पोहोचलो तेंव्हा रस्त्यावरूनच वल्ली उर्फ प्रचेतस दिसला, वल्लीच्या अनेक माहेरांपैकी एका माहेरी कट्टा असल्याने तो असणारच हा अंदाज खरा ठरला. ;)

सगा, खेडूत, एक्का काका अशी मंडळी गोल कोंडाळे करून गप्पा ठोकत होती.

थोड्याच वेळात अनिवासी काका त्यांच्या बंधूंसोबत पाताळेश्वर लेण्यांच्या अंतर्भागातून आंम्ही बसलो तेथे आले.

नंतर काकांसोबत गप्पा सुरू झाल्या. त्यांनी लंडनमध्ये पोटापाण्यासाठी केलेली वेगवेगळी कामे, तेथील महाराष्ट्र मंडळे आणि इन जनरल दोन मराठी माणसे मिळून तीन मंडळे कशी स्थापन करतात, लंडनच्या आजीबाईंच्या आठवणी अशा अनेक गंमती जमती ऐकायला जाम मजा आली.

.

नंतर हळूहळू तिथेही कंपू (:D) पडून उपकट्टे सुरू झाले.

उपकट्टा - १

.

उपकट्टा - २

.

चला आपण तिकडे वडाच्या झाडाखाली बसूया असे कोणीतरी सुचवले - नेमके तेथे एक प्रि-वेडिंग शूट सुरू होते, त्यामुळे "तिकडे नको, त्यांना उगाच डिस्टर्ब नको" असा कोणीतरी त्या सूचनेचा निकाल लावला.

हे दोघे वेगळ्याच विश्वात हरवले होते.

.

अनिवासी काकांनी एका कागदावर कट्ट्याला कोण कोण येणार हे लिहून आणले होते.

.

पुन्हा एकदा ओळख परेड पार पडली..

असाच एक प्रसन्न क्षण..

.

अनिवासी काकांचे बंधू सायकलिंग करतात आणि मिपावर वाचनमात्र आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले.

यानंतर सर्वांचा निरोप घेऊन अनिवासी काकांनी रजा घेतली.

नंतर पाचच मिनीटात प्रशांत मालक अवतरले.. मग मिपाचा इतिहास वगैरे गोष्टींची जुजबी उजळणी झाली.

नंतर दहा मिनीटांनी कपिलमुनी आला. त्याच्या डोक्यावर "मी आहे मुनी" असे लिहिलेली गांधी टोपी नाही यावरून त्याची थोडावेळ खेचण्यात आली.

एक ग्रुप फोटो घेऊन सर्वांनी खादाडीकडे प्रयाण केले.

.

शेवटी निघताना यापुढील कट्टा चाकण येथे मांसाहारी कट्टा करण्याचा प्लॅन ठरला आहे.

झकास मजा आली.

विनोद वाघमारे's picture

5 Sep 2017 - 4:31 pm | विनोद वाघमारे

मुंबई मध्ये सुद्धा होउन जाऊ द्या