Skip to main content

कोळीगीत: आई एकवीरा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 27/09/2026 23:02 या दिवशी प्रकाशित केले.

कोळीगीत: आई एकवीरा

 

आई एकवीरा हाय माजी पावन मोठी
तिच्या पुजेला आनली साडी चोली          ||ध्रु||

आम्हा कोल्यांची देवी ही नवसाची
वाट अवघड गो हिच्या मंदीराची
डोंगरावर जाऊन माय बसली
तिच्या पुजेला आनली साडी चोली          ||१||

हळद कुंकू निरांजनाने 
ताट पुजेचे हे सजवीले
साडी चोली बांगड्या नथ कानातले
कंबरपट्टा जोडवी पैंजन पायातले
तिच्या पुजेची अशी तयारी केली
तिच्या पुजेला आनली साडी चोली           ||२||

सांगू सखे तू काय हो

लेखक akshardas यांनी रविवार, 30/08/2026 09:45 या दिवशी प्रकाशित केले.

सांगू सखे तू काय हो

 

पसरवी किरणे रवीची

असा शीतल चंद्र हो

 

सोसूनी थकल्या घराचा

निखळ तो आनंद हो

 

माझिया माता पित्यांचे

सद्गुणी अपत्य हो

 

ना ढासळे कधीही असा

माझा दृढ विश्वास हो

 

साथ ना सुटते जयाची

असा माझा श्वास हो

 

- अक्षरदास

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 18/04/2026 20:30 या दिवशी प्रकाशित केले.

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

काव्यरस

युद्ध बखर

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 18/03/2026 21:42 या दिवशी प्रकाशित केले.

युद्ध बखर |  

ताजी खबर | 

 इराण 'खार्ग' |  

समृद्धी मार्ग || 

तेलसाठा बेट | 

हमला हा थेट | 

स्ट्रेट हॉर्मुझ | 

माझं ना तुझं || 

रथी लारीजानी | 

आणि सुलेमानी | 

ठोकले दोघांना | 

या एकाच दिनी ||

 

 तो ट्रम्प अहंकारी | 

कंटाळले सहकारी | 

फेकले राजीनामे | 

नको तुझी कामे || 

 

इकडे मोदी, जयशंकर गद्दी | 

3 तेल जहाजे, आणली मुसद्दी || 

हा युद्ध ज्वरा | 

गॅस साठी दाही दिशा ....

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 12/03/2026 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 07/03/2026 21:12 या दिवशी प्रकाशित केले.

अक्षरांचे पंख 

होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते

 बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते

 

 का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी 

अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते 

 

त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी

 तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते 

 

चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा 

कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते 

 

सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण

 मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! 

 

खेळ मांडला...

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 07/03/2026 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धाचा भडका, सामान्यांना धडका || तेलासाठी खेळ, अवघड वेळ || उच्च तंत्र युद्ध, सामान्य हतबुद्ध || काय चांगले, काय वाईट, मिडिया ला पाहिजे, फक्त बाईट || बुडाला एकदाचा, खामेनेई कातील, अमेरिका जगाचा पोलिस पाटील

संध्येच्या व्याकूळ छाया.

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 22/02/2026 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
संध्येच्या व्याकूळ छाया अंधार माखुनी येती हा डोह अंतरीचा दुःखाने ढवळून जाती. मी व्याकूळ होतो जेव्हा दुःखाने मेघही झरती अश्रूंनी विझुनी गेल्या नभीच्या चांदणं ज्योती. सावली उन्हाची व्हावी तशीच शीतल माया गेले प्रहर निघुनी छळती स्मृतींच्या छाया. अंधार भारल्या राती नभी चांदणे झरते अंधाऱ्या डोही दुःखाच्या सुख तसे पाझरते. https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa
काव्यरस

भिवंडी ची दवंडी

लेखक बाजीगर यांनी शुक्रवार, 20/02/2026 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
भिवंडी ची दवंडी भाजपा ने धरला काँग्रेस चा हाथ !! राष्ट्रवादी(शप) ची घेतली साथ || भाजपात फूट, 9 जणांची लूट || नारायण चौधरी भाजपा बंडखोर, होणार आता, भिवंडी महापौर !! सत्तेसाठी ताताथैया विरोधक आता एकशैय्या || -------------------------- भिवंडी बलाबल एकूण ९० बहुमत पाहिजे ४६ combo-1 : भाजप 22 शिवसेना 12 राष्ट्रवादी (SP) 12 = 46 combo-2: भाजप 22 शिवसेना 12 समाजवादी 6 , कोणार्क विकास आघाडी 4 भिवंडी विकास आघाडी 3 = 47 पण झाले combo -3 कांग्रेस 30 भाजप 9 राष्ट्रवादी (SP) 12 = 51