मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

करायला गेलो आत्महत्या

खिलजि ·
केलेल्या कृत्यांचा पश्चाताप म्हणून करायला गेलो आत्महत्या टाकला दोर उभा वर पंख्यांला राहत्या नव्या घरी गच्चं मारुनी गाठ दाखवणार होतो आयुष्याला पाठ घेतला गळफास तेव्हा गदागदा हलु लागले सिलिंग फुसका बार निघतोय कि काय ? याचे हळूहळू येऊ लागले फिलिंग साला , नको तो डोक्याला ताप झाला सिलिंगसकट वरचा माणूस खाली आला दोघेही उताणे एकावर एक पडलो दोघेही जागच्या जागीच मोडलो घातली बिल्डरच्या नावाने शिवी साला बिल्डर हाय कि न्हावी ?

जालफ्रेझीची सोय

खिलजि ·
Taxonomy upgrade extras
भोपळ्याने सर्व भाज्यांना दमात घेतलं सांगितलं मी आजपासून आहे तुमचा राजा शेपू पालक सर्वानी शेपूट घालून मान दिला अन बनल्या भोळी प्रजा शेपूला केला मंत्री त्याने पालक झाला प्रधान धुसफुसणारी भेंडी वझीर केली देउनी खास सन्मान कसेबसे ते राज्य उभारले कांदे बटाटे रुसले संख्येने ते जास्त म्हणोनि आरक्षण मागत सुटले कोथिंबीरही मिरचीसंगे चूल मांडते वेगळी कडीपत्ताही राग आळवतो तर पुदिन्याची बंडाळी वांगे आपले अलिप्त तेथे , ना कसलीही चिंता गनिमीकावा गवार वापरते , वाढवत सुटते गुंता भोपळा झाला येडा पुरता डोकं झालं बधिर भेंडी देई आधार त्याला तर पालक देई धीर दोन घडीचा डाव मांडला

ती पहाट ओली(झालेली! ;) )

अत्रुप्त आत्मा ·
पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकले

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.