Skip to main content

प्रतिक्रिया

माझी दिवाळी

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 01/11/2013 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

पाभे की बात नं ८

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 23/05/2026 12:47 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात नं ८

मितरों,  

आता इथेनॉलचा नवा जोर चाललाय! सरकार म्हणतंय – पेट्रोलात इथेनॉल मिक्स करा, जास्त करा, E30 पर्यंत करा, शेवटी E100 करा! म्हणजे १००% इथेनॉल. गडकरी साहेब म्हणतात, “पेट्रोल सोडा, इथेनॉल प्या... अरे म्हणजे गाडीत घाला!”  

मिटरों, मी तर लगेच माझ्या गाडीत E100 भरलं. आता गाडी चालते आहे, पण सुंगध येतोय तो देशी दारूचा! शेजारचा पोलिस म्हणाला, “साहेब, हा ब्रेथ ॲनालायझर कशाला घेतलाय आम्ही? त्याचेशिवायही वास येतोय.”  

सहज सुचलं म्हणून _ २०२६

लेखक कंजूस यांनी बुधवार, 18/03/2026 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३.

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 10/03/2026 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन! 1 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 21/02/2026 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी 1 युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.

सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 17/02/2026 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 30/01/2026 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

मंतरलेले बेट (ऐसी अक्षरे -३९)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/01/2026 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
1 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff.

पत्र निमित्तमात्र

लेखक Bhakti यांनी शनिवार, 17/01/2026 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
1 सुनीता देशपांडे आणि जी. ए कुलकर्णी यांच्यातील चिंतनशील पत्रव्यवहार (काही संकलन केलेला )नुकताच स्टोरीटेलवर संवादरूपाने ऐकला. गहन व्यक्तिमत्त्वांची निखळ, मायेने ओतप्रोत मैत्री...

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 08/01/2026 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.