Skip to main content

मांडणी

सहज सुचलं म्हणून _ २०२६

लेखक कंजूस यांनी बुधवार, 18/03/2026 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मागील धागा ( https://www.misalpav.com/node/52636 )जुना झाल्याने आणि खूप मोठा झाल्याने हा नवीन धागा काढत आहे. राजकीय विषय सोडून इतर विषयांसाठी. ----------------------------- एक नवीन प्रश्न . PASSKEY विरुद्ध PASSWORD १. विविध साईटस किंवा इमेलसाठी login करताना username , password टाकावे लागू नये म्हणून passkey वापरण्याची पद्धत दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली. २. एकच password सर्व साईटसना ठेवणे धोक्याचे आहे असं डिजिटल सुरक्षितता जाणणारे सांगतात. एवढे password बनवून लक्षात कसे ठेवायचे? ३.

गॅस साठी दाही दिशा ....

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 12/03/2026 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

किंमत प्रणाली - भाग १

लेखक केदार भिडे यांनी शुक्रवार, 27/02/2026 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थशास्त्रातील किंमत प्रणालीचे (Price system) महत्व सांगणारी ही दोन लेखांची मालिका आहे. पहिल्या भागात किंमत येते कोठून आणि किंमत प्रणालीचे नेमके कार्य काय याची चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात काही नेमक्या उदाहरणांची चर्चा केली आहे. गेले जवळ जवळ वर्षभर मी रिक्षाने प्रवास करण्यासाठी रॅपीडो या ऍपचा वापर महाराष्ट्रातील एका शहरात करत आहे. त्यावरचा अनुभव असा आहे जवळच्या भाड्यासाठी रॅपीडोवरील भाडे हे मिटरने होण्यारे भाड्याच्या तुलनेत २०-३०% जास्ती असते. आणखी दूरचे भाडे मात्र काही त्यापटीत वाढत नाही आणि मीटरपेक्षा २-५ रुपये (टक्के नव्हे) कमीच असते.

भारत-म्यानमार फाळणी

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 14/02/2026 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.

डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 08/02/2026 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने ============== --राजीव उपाध्ये चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्‍या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात.

मी कोण? - एक प्रयोग

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 05/02/2026 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
 मी कोण? - एक प्रयोग ============ -राजीव उपाध्ये मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा. इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!

ए०आय० - एक नवे देवत्व!

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 28/01/2026 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
 ए०आय० - एक नवे देवत्व! ============================ - राजीव उपाध्ये टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्‍यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वीचा म्ह० ए०आय० अवतीर्ण होऊन स्थिराऊ लागला तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग आहे.

निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 23/01/2026 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
निष्काम कर्मयोग: आत्ममुक्तीचा मार्ग की शोषणाचा सुसंस्कृत मुखवटा? -राजीव उपाध्ये भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत काही संकल्पना इतक्या तेजस्वी वाटतात की त्या ऐकतानाच मन आपोआप नम्र होतं. “निष्काम कर्मयोग” ही त्यातलीच एक. फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, अहंकार कमी करून समत्वाने जगणे—हे सगळं ऐकायला जितकं सुंदर आहे, तितकंच ते वास्तवात गुंतागुंतीचं आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतं. कारण कोणतीही उच्च किंवा आकर्षक कल्पना जेव्हा समाजाच्या असमान रचनेत उतरते, तेव्हा तिचं रूपांतर “आत्मविकासा"तून “सत्तेचं साधन” होण्यात वेळ लागत नाही.

AI सोबत लेखन : विचार, शब्द आणि जबाबदारी - प्रस्तावना

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 19/01/2026 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
२०२५ च्या दिवाळी अंकासाठी AI ही थीम ठेवावी अशी सूचना पुढे आल्यावर 'टीम दिवाळी अंक' च्या सदस्यांपैकी माझ्यासहित अनेकांच्या हृदयात एक बारीकशी कळ आली होती.

[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 18/01/2026 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
[ताज्या जिलब्या] एक काल्पनिक प्रयोग ================== -राजीव उपाध्ये पदार्थविज्ञानात ’काल्पनिक प्रयोग’ (थॉट एक्सपेरीमेण्ट) ही एक महत्त्वाची कल्पना आहे.