सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे
प्रिय मिपाकरांनो,
होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.
पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.
सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.
१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.
२. राहण्याची सोय केल्या जाईल.
३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.
४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :)
'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग,
तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते.
या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार
लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली.
आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :)
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा.
मी इतक्यात अॅड्रुनोचा (अॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी -
https://www.arduino.cc/
https://en.wikipedia.org/wiki/Arduino
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!
पुणेकर मित्र मैत्रिणिंनो,
दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे.
२३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही.
ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा. वेळापत्रक, शाळेचा पत्ता, इतर लेखनिकांचे संपर्क आणि काही आवश्यक जुजबी माहिती, इत्यादी तपशील प्रत्यक्ष बोलून आणि वैयक्तिक संपर्कातून देता येतील.
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
नमस्कार,
दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे.
आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे.
तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का?
ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम.
कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच.
आपलाच,
मुवि.
... काय म्हणतील!
आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात.
मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही.
रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते.
दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते.
सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते.