इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
19 Sep 2016 - 9:47 am

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा.
मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अ‍ॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी -
https://www.arduino.cc/
https://en.wikipedia.org/wiki/Arduino
http://playground.arduino.cc/Projects/Ideas

या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!
ती माहिती संपादकांना सांगुन वर या भागात संकलित करता यावी. म्हणजे ते प्रश्न वाविप्र सारखे आपोआपच टळतील.

तोवर ज्यांना अनेक छोटे प्रकल्प करायचे ज्यांनात्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. ज्यांनी प्रकल्प केले आहेत त्यांनी आपले अनुभव सांगायला प्रत्यवाय नाही.
तर येऊ द्या जमेल तसे!

जीवनमानतंत्रविचारमाहितीचौकशीप्रश्नोत्तरेमदत

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

19 Sep 2016 - 10:09 am | सतिश गावडे

या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!

मी चार वर्षांचा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयरींगचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर गेल्या बारा वर्षात कुठेही या माहितीचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे.

मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच

आरडुइनो बोर्डचे प्रोजेक्ट त्याच्याशी संबंधीत फोरमवर वाचायला छान वाटतात. प्रचंड उत्साह आणि चिकाटी नसेल तर बोर्ड काही दिवसांत अडगळीत जातो. :)

निनाद's picture

19 Sep 2016 - 10:44 am | निनाद

त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे. शंका रास्त आहे. पण मागे एक अति लघु प्रकल्प केला होता. त्यात एक मिलिअँप करंट मिळवायचा होता. आणि त्यासाठी रझिस्टर शिवाय ट्रान्झिस्टरचा ही वापर केला होता. फक्त रझिस्टर वापरूनही काम झाले असते तेथे ट्रान्झिस्टरचा वापर का केला असावा हे मला समजले नाही. पण त्याचे कारण मला या क्षेत्राची नसलेली ओळख हे आहे. मिपावर शोधले पण काही आढळले नाही. मग असे प्रश्न विचारायला धागा असावा असे वाटले. संकलन करून ठेवले तर वाया तर नक्की जाणार नाही असे वाटते.

या शिवाय ज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्या त्या व्यक्तिवर अवलंबून आहे ना? तुमच्याकडे सारे ज्ञान आहे पण त्याचे अ‍ॅप्लिकेशन नाही!
पण याच वेळी कुणाला तरी एक बटाटेवडे तळून देणारे स्वस्त आणि मस्त मशिन हवे असेल.
पण त्याला माहिती नसेल की हे सहज शक्य आहे.
त्या मशिनचे रोबोटिक्स अ‍ॅड्रुनोचा वापर करून प्राथमिकरित्या बनवता येतील.
वापरून पाहता येतील. मग प्रत्य्क्ष युनिट बनवता येईल.

कल्पनाशक्तीला भरारी आणि स्टार्ट अप्स http://www.misalpav.com/node/37276 ची तांत्रिक बाजू सांभाळणे यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो ना गावडे साहेब?

असो...

सतिश गावडे's picture

19 Sep 2016 - 11:08 am | सतिश गावडे

माझा प्रश्न प्रामाणिक होता. :)

तुम्ही या विषयाचा लघू उद्योगांसाठीच्या उपयोगीतेच्या दृष्टीकोनातून विचार करत असाल तर ती आनंदाची गोष्ट आहे.

निनाद's picture

22 Sep 2016 - 3:56 am | निनाद

दुखावले असल्यास क्षमस्व गावडे साहेब!

सतिश गावडे's picture

22 Sep 2016 - 7:12 am | सतिश गावडे

नाही भौ :)

चेतनकुलकर्णी_85's picture

19 Sep 2016 - 3:46 pm | चेतनकुलकर्णी_85

तुमच्या नोकरीत तुम्हाला ह्या संकल्पनांचा वापर होत नसेल तर दुसर्यांना पण होत नसेल हा विचार योग्य नाही

एफेमची रेंज घरात येत नाही ,मोबाइलची रेंज येत नाही त्यासाठी कोणी उपाय शोधले आहेत का? कोकणात बय्राच लोकांनी कौले काढून पत्रे घातलेत.पण त्यामुळे या अडचणी वाढल्या आहेत.फ्लॅट सिस्टिमात खिडक्या,बॅल्कनीच्या अॅल्युमिनियम फ्रेमसही रेंज अडवतात.फक्त ब्लुटुथ युनिट मिळते का?त्याला जुने प्रकारचे टिव्ही,साधे आपल्याकडचे स्पिकर जोडता येतील.

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Sep 2016 - 11:08 am | श्री गावसेना प्रमुख

अल्युमिनिअम च्या तारेचा एन्टेना बनवुन तो घराबाहेर लावला तरी एफ एम व्यवस्थीत चालतो,तार नसेल तर तांब्याच्या ताराची वायर घराबाहेर काढली तरीही चालेल.

स्वप्क००७'s picture

19 Sep 2016 - 11:49 am | स्वप्क००७

ह्याचा काही उपयोग होत आहे का बघा. मी करून पहिला नाही आहे
http://www.instructables.com/id/DIY-2G3G4G-Wireless-Cell-Phone-Signal-Bo...

निनाद's picture

22 Sep 2016 - 4:00 am | निनाद

फक्त ब्लुटुथ युनिट (आणि एफ एम ट्रान्स्मिटर?) वापरून कोणतेही स्पिकर वापरात आणता येतील.
मी ब्लुटुथ युनिट पाहिले होते, पण ते अ‍ॅड्रिनोला जोडण्यासाठी होते.
मला खात्री आहे फ्री स्टँडिंग पण मोबाईल चार्जरवर चालेल असे पण मिळायला हवे.

याच पद्धतीने ऑडियोजॅमर तर नाही पण ऑडियो मध्ये गोंधळ उत्पन्न करणारे युनिट बनवता येईल का? जेणेकरून मोठ्याने स्पिकर वाजवणे अवघड होईल. :)

इलेक्ट्रिकच्या वस्तुंसाठीही धागा असायला हवा असं वाटलं होतं परंतू इस्त्री,ट्युबलाइट्सचा वापरच कमी झालाय.

कवितानागेश's picture

19 Sep 2016 - 10:44 am | कवितानागेश

सगळ्या इ कचऱ्याचे काय करायचे हे पण कुणीतरी सांगा. कुठे जमा करून घेतात का?

पिशी अबोली's picture

20 Sep 2016 - 3:49 am | पिशी अबोली

पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये 'जन-आधार' नावाच्या एका संस्थेचं ऑफिस आहे. ते घेतात इ-कचरा. पण मोठ्या प्रमाणावर असेल तर काय करायचं माहीत नाही. त्यांच्याचमार्फत एक संस्था इ-कचरा गोळा करून घ्यायला येते असं काहीतरी अंधुक आठवतं..

मारवा's picture

19 Sep 2016 - 11:00 am | मारवा

सदाहरीत प्रश्न धागा या रेग्युलर नावाला
ईलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भातला "सदाभारीत" शब्द जो वापरला तो
लयच भारी आहे.
शब्दयोजना प्रचंड आवडण्यात आलेली आहे.

निनाद's picture

19 Sep 2016 - 11:09 am | निनाद

आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद!

"सदाभारीत" या भारी शब्दाने मी भारावुन गेलेलो आहे. असे "भारदस्त" नाव देउन आपण एक प्रकारे "ईलेक्ट्रॉनिक्स" क्षेत्राच्या प्रतिष्ठेला "हातभार" च लावत आहात. नाहीतर आजकाल नुसती "भारंभार" शब्दांची जंत्रीच बघायला मिळते. हल्ली जो तो उधार शब्दांचा "भारवाही" हमाल झालेला आहे. अशा युगात आपण केलेल्या कार्याचे जितके आ"भार" मानावे तितके कमीच.
ईलेक्ट्रॉनिक्स जिंदाबाद !!!
हा व वरील प्रतिसाद "भारावलेल्या"
अवस्थेत दिलेला आहे.

निनाद's picture

19 Sep 2016 - 11:11 am | निनाद

आपल्या 'भारी'तल्या प्रतिसादामुळे आमच्या एका जुन्या रचनेची आठवण झाली...

चकती वाचे
http://www.misalpav.com/node/33337
:)

जमेल तशी माहीती देत जाईन. जरी मी यन्त्र अभियान्त्रीकीची पदवीका घेतली असली तरी मूळ ओढा "ईलेक्ट्रॉनिक्स" कडेच होता आणी आहे. [ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी प्रतिशब्द काय आहे?]

ऑफिस मध्ये ५ दिवसांचे [ रोज १ तास ] प्रशिक्षण घेऊन सहभागी जनांना स्वतः LED उघड-झाप करणारे सर्कीट / उजेडानुसार आवाज कमी-जास्त करणारा भोंगा बनवताना बघणे खुप रोमांचकारी असते.

टवाळ कार्टा's picture

19 Sep 2016 - 5:18 pm | टवाळ कार्टा

वायरलेस पध्धतीचा डॉल्बी जॅमर बनवता येईल का? बरेच मार्केट आहे त्याला ;)

संदीप डांगे's picture

19 Sep 2016 - 6:02 pm | संदीप डांगे

लौकर बनवा, आमची ऑर्डर आताच बुक करा

किमाण दोन तीन गाणी एक्दम आणि भराभर (जुन्या ६०-९० च्या तबकड्या जोरात पळवल्या की येतो तस्सा काहीसा प्रकार) वाजतील असा उपाय करणारे उपकरण बनवा (लोकाम्नी रागाने डॉल्बीच फोडली पाहिजे) ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.

मी त्याची ही आगावू नोंदणी करत आहे,

डॉल्बी उपाय असुरी नाखु

निनाद's picture

20 Sep 2016 - 4:14 am | निनाद

ग्रेट!
LED उघड-झाप करणारे सर्कीट / उजेडानुसार आवाज कमी-जास्त करणारा भोंगा हे कसे बनवायचे ते इथे ही द्या ना...

त्यातील कार्यकारणभाव जाणून घेण्याची आवड असेल तर Flasher Circuits इथे भेट द्या. कोणाला स्वतः हे सर्कीट बनवायचे असेल तर मी स्वतः मदत करायला तयार आहे. हवे असेल तर तू-नळी वर पण शोधु शकता.

[ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी प्रतिशब्द काय आहे?]

अणुविद्युत

सतिश गावडे's picture

22 Sep 2016 - 10:29 pm | सतिश गावडे

atom = अणू
electrons = ऋणभारीत कण??

निनाद's picture

23 Sep 2016 - 3:30 am | निनाद

ऋणिकी असा शब्द electronic या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे.
ऋणिकी म्हणजे इलेक्ट्रॉनीक्स इलेक्ट्रॉन.
हे ऋणभारीत कण आहे म्हणून चपखल शब्द ऋणिकी

माझ्या माहितीप्रमाणे विद्युत भारीत कणांचा( electrons ) अभ्यास म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मराठी मध्ये कण हे अणु म्हणून प्रचलित झाले असावे बहुधा. तसेच खूप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक्स साठी अणुविद्युत अभियांत्रिकी हाच शब्द पाहण्यात आलाय.

उपयोजक's picture

19 Sep 2016 - 6:15 pm | उपयोजक

या धाग्यावर तर याच पण इथेही या.
http://www.misalpav.com/node/37402

Electric,Electronics,computer यांसंबंधी समस्या,शंका विचारा,माहिती सामायिक करा.
एक दिवस पुर्ण व्हायच्या अातच १५ सदस्य झाले.

उपयोजक's picture

19 Sep 2016 - 9:11 pm | उपयोजक
उपयोजक's picture

19 Sep 2016 - 9:11 pm | उपयोजक
उपयोजक's picture

19 Sep 2016 - 9:11 pm | उपयोजक
उपयोजक's picture

19 Sep 2016 - 9:12 pm | उपयोजक
उपयोजक's picture

19 Sep 2016 - 9:12 pm | उपयोजक
अमितदादा's picture

19 Sep 2016 - 10:24 pm | अमितदादा

उत्तम विषयावरती धागा या धाग्यात इलेक्ट्रिकल बद्दल हि माहिती हवी. या धाग्यातून बरीच नवीन माहिती मिळेल असे वाटतेय . बरेच दिवस झाले एक विषय डोक्यात होता , ज्याची चर्चा मी ऑफिस मध्ये मित्राबरोबर केली होती पण त्यावरती वाचन काही होत नव्हतं . हा धागा आला आणि वाचायचं ठरवलं. तो विषय म्हणजे वायरलेस इलेक्ट्रिसिटी , म्हणजे कंडक्टर चा वापर न करता विजेचं wi -fi प्रमाणे होणारे वहन . याची सोप्या भाषेत मांडणी म्हणजे एक अँटेना (व इतर सर्किट ) असेल जो विजेचे मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह मध्ये रूपांतर करेल , दुसरीकडं एक रिसिव्हर (व इतर सर्किट ) असेल जो हि मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह catch करेल आणि ज्याचं परत विजेत रूपांतर करेल. सध्या तरी हे तंत्रज्ञान बाल्य अवस्थेत आहे , सरळ बोलायचं झालं तर ह्या तंत्रांज्ञानांचे दोन प्रकार होतात
१. Non-radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान छोट्या किंवा माध्यम अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फिल्ड हे माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी.
२. Radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान जास्त अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये लेसर, रेडिओ वेव्ह , मिक्रोवेव्ह इत्यादी माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी.
हे तंत्रज्ञान भविष्यात खूप उपयोगी होईल यात शंका नाही, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चार्जिंग, कार चार्जिंग, बायोमेडिकल डिव्हिसेस पासून सोलर उपग्रहापर्यंत याचा उपयोग आहे. अधिक माहिती साठी खालील लिंक पहा
https://en.wikipedia.org/wiki/Wireless_power_transfer
http://edition.cnn.com/2014/03/14/tech/innovation/wireless-electricity/

अवांतर: मिपावरील बऱ्याच लोकांना हि माहिती असण्याची श्यक्यता असल्याने त्यातील तज्ञ् लोकांनी याबद्दल लेख लिहल्यास वाचाय आवडेल.

निनाद's picture

20 Sep 2016 - 3:41 am | निनाद

माहिती आवडली. Radiative Wireless Electric Transfer हे व्यावसायिक स्तरावर जास्त अंतरासाठी का वापरले जात नाही? उर्जाव्यय परवडत नाही का?

अमितदादा's picture

20 Sep 2016 - 10:14 pm | अमितदादा

लिन्क मध्ये दिलेलं आहे वाचा The range of these fields is short, and depends on the size and shape of the "antenna" devices, which are usually coils of wire. The fields, and thus the power transmitted, decrease exponentially with distance

अमितदादा's picture

20 Sep 2016 - 10:16 pm | अमितदादा

nonradiative साठी वरच वाक्य आहे बर का, प्रश्नात गफलत आहे.

nikhil.nemade's picture

19 Sep 2016 - 10:50 pm | nikhil.nemade

http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)

nikhil.nemade's picture

19 Sep 2016 - 10:52 pm | nikhil.nemade

http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)

निनाद's picture

23 Sep 2016 - 3:33 am | निनाद

छान आहे दुवा!
धन्यवाद...

मराठी मध्ये असते तर अजून मजा आली असती.. :)

अमितदादा's picture

19 Sep 2016 - 11:05 pm | अमितदादा

मला वाटतंय ह्या सारख्या धाग्यावर माहितीकम प्रतिक्रिया देताना त्या विषयाची चार वाक्यात summary लिहावी आणि त्यानंतर त्याच्या लिंक द्याव्यात. जेणेकरून मिपाकरांना पुढे वाचायचं कि नाही हे ठरवता येईल, तसेच ज्यांना कमी वेळात बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचाय त्यांना summary वरून कळेल. आणि summary सहज आणि सोप्या भाषेत असावी, काही वैज्ञानिक इंगर्जी शब्दांचे मराठीकरण टाळावे कारण सोयी पेक्षा गैरसोय होण्याची शक्यता जास्त. अर्थात ही सूचना आहे व्यवस्थीथपणा येण्यासाठी, लिहिणारे त्यांना जसे हवे तसे लिहू शकतात.

अनिकेत वैद्य's picture

22 Sep 2016 - 9:43 am | अनिकेत वैद्य

सद्ध्या एका रेडीओ रिसीव्हर सर्किटवर काम करतो आहे. हे झाल्यावर रेडीओ ट्रान्स्मीटर तयार करणारे.
(टीपः मी HAM RADIO operator आहे. माझ्याकडे रेडीओ transmitting साठी अधिक्रुत लायसन्स आहे.)

अभ्या..'s picture

22 Sep 2016 - 9:47 am | अभ्या..

भारीच. काही त्यात अ‍ॅक्ट्व्हिटी केल्यास कृपया मिपावर सांगा.
मला लै इंटरेस्ट आहे.
(टिपः मी व्यावसायिक रेडिओ स्क्रीप्ट आणि आरजेचे काम केले/करतो आहे)

मराठी_माणूस's picture

23 Sep 2016 - 12:59 pm | मराठी_माणूस

अवांतरः एखादा चांगला MW रीसिव्हर सुचवु शकाल का . जे बाजारत उपलब्ध आहेत त्यांच्यात फार खर्खर येते.

उपयोजक's picture

22 Sep 2016 - 9:19 pm | उपयोजक

http://www.misalpav.com/node/37402
सदस्य होऊ इच्छिणार्यांना विनंती. कृपया आपला व्हॉटस्अप क्रमांकही द्या.त्याशिवाय कसं सामील करणार?
अजूनही कोणी राहिले असल्यास कृपया व्यनिवर कळवा.

पैसा's picture

22 Sep 2016 - 10:34 pm | पैसा

धागा आवडला

ईलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक छोटे छोटे भाग/पार्ट्स असतात. यांना तांत्रिक भाषेत मोड्युल म्हणतात. हे मोड्युल डायोड, ट्रान्सिस्टर, रेसिस्टर, कॅपॅसिटर, इण्डक्टर, इण्टीग्रेटेड सर्किटस (आयसी) आणि एसी/डीसी व्होल्टेज सोर्स अशा अनेक काम्पोनंटची विशिष्ट जोडणी करुन बनवलेले असतात.

a

या प्रत्येक काम्पोनंटचे काम करण्याचे स्वतःचे असे एक तत्व असते. उदा. डायोडमधून विद्यूत प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहतो; विरुद्ध दिशेने विद्युत प्रवाह सोडल्यास तो अडवला जातो. तसेच या काम्पोनंटची त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार ठराविक अशी विद्युत प्रवाह वाहून नेण्याची आणि विद्युत दाब सहन करण्याची विशिष्ट क्षमता असते. या सार्‍या बाबींचा एकत्रित विचार करुन काही उपयुक्त जोडणी (सर्किट) बनवता येईल यावर संशोधन होत असते. त्यासाठी सुरुवातीला गणिती पद्धतीचा वापर जोडणीच्या विविध काम्पोनंटमधून किती विद्युत प्रवाह जाईल, किती विद्युत दाब असेल, त्याचा विविध काम्पोनण्टवर काय परीणाम होईल, ते कसा प्रतिसाद देतील याचा कागदावर कच्चा लेखा जोगा घेतला जातो.

आता वेळ आलेली असते हे "डीझाईन" खरंच आपल्या गणिताप्रमाणे काम करतंय का हे तपासण्याची. त्यासाठी सारे काम्पोनंट "ब्रेडबोर्ड" नावाच्या भोकांची रांग असणार्‍या बाहेरुन प्लास्टीक असणार्‍या परंतू आतून या भोकांच्या रांगा विशिष्ट पद्धतीने जोडलेल्या असलेल्या फळकुटावर ठेवून ते जोडले जातात.

a

a

या जोडणीला डिझाईनप्रमाणे काही ठराविक अ‍ॅम्पियर आणि व्होल्टचा विद्युत पुरवठा केला जातो. आणि मग एक तर ती जोडणी अपेक्षेप्रमाणे चालते किंवा काही चुकले असल्यास धमाका होतो.

पूर्वी हीच पद्धत इलेक्ट्रॉनिक्स शिकणार्‍या विद्यार्थ्यांना विविध सर्किट्स शिकवण्यासाठी वापरली जायची.

अतिशय खर्चिक आणि काहीसा धोकादायक असा हा प्रकार होता. कारण हा वीजेचा खेळ होता. अगदी मोठा अपघात झाला नाही तरी काम्पोनंट सर्रास जळायचे. यावर उपाय शोधला गेला ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचा.

ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर हे असे सॉफ्टवेअर असते जे आपले डिझाईन व्हर्च्युअली तपासू देते. यातील जोडणी प्रत्यक्ष जोडणीप्रमाणे विविध जोडांच्या ठिकाणी ठराविक विद्युत प्रवाह आणि विद्युत दाब दाखवते.

याचा फायदा असा की हे सारे व्हर्च्युअल असल्याने प्रत्यक्ष जोडणी तपासणी करताना वीज हाताळतानाचे धोके इथे नसतात. शिवाय प्रत्यक्ष काम्पोनंट वापरायचे नसल्याने तो खर्च वाचतो. एकच डिझाईन फेरफार करुन तपासता येते.

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून वापरल्या जाणार्‍या "ईलेक्ट्रॉनिक वर्कबेंच" या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचे एक चित्र.
a

प्रसाद_१९८२'s picture

23 Sep 2016 - 1:33 pm | प्रसाद_१९८२

जालावर ह्या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर सॉफ्टवेयरचे डेमो/ट्रायल वर्जन उपलब्ध आहे का?

संजय पाटिल's picture

23 Sep 2016 - 4:00 pm | संजय पाटिल

उपयोजक's picture

30 Sep 2016 - 9:06 pm | उपयोजक

डेमो का पुर्ण व्हर्जन अाहे.

उपयोजक's picture

27 Sep 2016 - 9:35 pm | उपयोजक

सोप्या भाषेत छान माहिती.आवडेल येथे यायला.

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2016 - 1:02 pm | मार्मिक गोडसे

गावडे सर, धन्यवाद

इलेक्ट्रिक करंट चे दोन प्रकार आहेत AC आणि DC हे आपण जाणताच. (उदारणार्थ घरात पाण्याची मोटार AC वर चालतात तर सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे DC वर चालतात.) आज आपण पाहतो कि AC करंट हा पॉवर transmission साठी वापरा जातो याची खूप फायदे आहेत म्हणून, एक तर रेसिस्टीव्ह लॉसेस कमी आहे DC पेक्षा जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे, तसेच व्होल्टेज स्टेप उप/स्टेप डाउन सहजरित्या करता येते. तसेच जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे flow होणारा करंट कमी होतो ज्यामुळे वायर चे diameter कमी असतात, हे एक कारण आहे की मोठ्या टॉवरच्या ओव्हरहेड वायर मधून जास्त व्होल्टेज असत. परंतु समुद्रातून जाणाऱ्या वायर मधून DC पॉवर transmission जास्त फायदेशीर होते (AC पॉवर transmission केबल सुद्दा आहेत), कारण हवेतून होणाऱ्या पॉवर transmission साठी inductive and capacitive losses कमी असतात त्यामुळे तिथे AC करंट फायदेशीर तर समुद्रातील केबल मध्ये inductive and capacitive losses जास्त असतात त्यामुळे तिथे DC करंट फायदेशीर.

अता महत्वाची स्टोरी, 19 शतकाच्या शेवटी (1880-1890) अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी दोन महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे Edison Electric Light Company ( आपल्या बल्ब वाल्या थॉमस एडिसन ची कंपनी) आणि Westinghouse Electric Company ( जॉर्ज वोशिंग्टनहोऊस याची कंपनी). तर यातील एडिसन च्या कंपनीचं अस म्हणणं होत की DC करंट हा पॉवर transmission साठी उत्तम आणि उपयोगी आहे, तर AC करंट हा धोकादायक आणि निरूपयोगी तसेच खर्चिक आहे. मात्र याच्याविरोधी जॉर्ज आणि निकोला टेलसा (ज्याने मॉडर्न AC ट्रान्सफॉर्मर बनवला) ह्यांनी एडिसन ची मत खोडुन काढत होते तसेच AC पॉवर transmission मध्ये नवीन नवीन शोध लावून AC च महत्व पटवून सांगत होते. हि 10 वर्षे अमेरिकेचं वीज क्षेत्र ह्या giant लोकांच्या आरोप प्रत्यारोपात ढवळून निघाले ह्या गोष्टीला war of currents म्हंटल जात . अर्थात लवकरच जास्त अंतरावर पॉवर transmission करण्यासाठी AC ची उपयोगिता लक्ष्यात आली आणि जसा त्याचा वापर वाढला तसा एडिसन ची कंपनी तोट्यात जायला लागली याचा शेवट कंपनी विकण्यात झाला.
अधिक माहिती खाली वाचा. तसेच काही कमी किंवा अपूर्ण असेल तर भर हि घाला.

1. http://www.history.com/news/ask-history/what-was-the-war-of-the-currents
2. http://www.scienceninjas.ca/war-history-electric-currents/
3. https://en.m.wikipedia.org/wiki/War_of_Currents

स्वप्क००७'s picture

27 Sep 2016 - 10:01 am | स्वप्क००७

मला डिजिटल to अनालॉग ऑडिओ कन्वर्टर करायचा आहे (ऑप्टिकल to 3.5MM jack) कोणी मदत करू शकतो का? बाजारात 1000rs पर्यंत उपलब्ध आहे पण स्वतः बनवण्याची इच्छा आहे.

नितिन थत्ते's picture

27 Sep 2016 - 1:26 pm | नितिन थत्ते

कळलं नाही.....

हेमन्त वाघे's picture

28 Sep 2016 - 6:26 am | हेमन्त वाघे

DAC मध्ये एक चिप असते आणि त्या चपच्या अवती भवती सर्किट असते . अनेक चिनी सर्कईट्स बघून हे लक्षात आले आहे हि तयार घेणे हे स्वस्त पडते .. तरीही तुम्हाला बहुदा किट मिळावीत

हा एक प्रकार चांगला आहे

http://www.ebay.com/itm/Digital-Optical-Coaxial-Toslink-Signal-to-Analog...

तसेच हा डाक तुम्हाला का पाहिजे आहे ? LED TV ला लावायला ?

स्वप्क००७'s picture

28 Sep 2016 - 5:28 pm | स्वप्क००७

होय
माझ्या LED TV चे ऑडिओ आउटपुट ऑप्टिकल आहे म्हणून हवंय.
असो धन्यवाद आता विकत घेण्या शिवाय पर्याय नाही.

मला ठाण्या-ंमुबंई मध्ये रिमोट कंट्रोल हॉबी कार आणि टॉय रिपेअर करण्या साठी माहिती हवी आहे. मी थोडा प्रयत्न केला पण सर्कीट बोर्ड जळाला चुकुन..

उपयोजक's picture

24 Mar 2017 - 1:11 pm | उपयोजक

रोधक अर्थात रेझिस्टरचा उपयोग सिग्नल लरवल अॅडजस्ट करण्यासाठी कसा केला जातो?

नितिन थत्ते's picture

24 Mar 2017 - 2:12 pm | नितिन थत्ते

प्रश्न कळला नाही.

उपयोजक's picture

24 Mar 2017 - 7:23 pm | उपयोजक

इंजिनिअरींगच्या पुस्तकात रेझिस्टरचं एक कार्य दिलं आहे,
To adjust the signal level
याचा अर्थ काय?
मुळात सिग्नलची लेवल म्हणजे काय? थोडं विस्तृतपणे सांगा.

जुन्या न चालणाय्रा इले वस्तू कुठे टाकायच्या हा प्रश्न अगोदर विचारला आहे. cnbc awaaj चानेलवर टेकगुरू कार्यक्रमात आज दाखवलय . उद्या सकाळी रिपीट 07.00-07.30 पहिल्या पाच मिनिटात आहे.

उपयोजक's picture

25 Mar 2017 - 6:13 am | उपयोजक

फार छान माहिती!

http://www.ecocentric.co.in/
हे इ - कचर्‍याचं नियोजन करतात.त्याबद्दल इथे सांगितलंय.छान माहिती मिळाली.
सिसिडी सोबत त्यांची अॉफरही आहे.किंडल जिंकण्याची!