माझी खाद्यशैली योग्य आहे का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
11 May 2016 - 2:26 pm

माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही.

रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते.

दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते.

सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते.

उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एखादा हलका-फुलका सिनेमा बघत बसतो.

नाश्त्यापुर्वी अर्धा ते पाऊण तास फिरणे.

सकाळचा नाश्ता ===> ८:०० ते ८:१० पर्यंत नाश्ता कारायला बसतो.

नेहमीच्या खाण्यातील नाश्त्यातील पदार्थ ===>

१. थालीतीठ+लोणी*दही+लोणचे

२. इडली+सांभार+चटणी

३. बटाटे-पोहे

४. उपमा

५. मेतकूट+तूप्+भात

६. आमलेट पोळी किंवा आमलेट्+ब्रेड

७. डोसे+सांभार+चटणी

८. उत्तप्पा+सांभार+चटणी.

नाश्ता झाला की वाचनालयात पुस्तक बदलायला जाणे आणि भाजी बाजार.

जेवणाची वेळ आणि खाद्यपदार्थ

जेवणाची वेळ ===> १२:०० ते १२:१५ च्या दरम्यान जेवायला बसतो.

खाद्यपदार्थ =====>

वरण्+भात+तूप+लिंबू जवळपस रोज.

२ भाकर्‍या , ज्वारीच्या किंवा तांदूळाच्या.कधी-कधी पोळ्या.पण पोळ्या मात्र आठवड्यातून एक ते दोन वेळाच.

एक वाटी कोशिंबीर, काकडी किंवा बीट किंवा कोबी. कोशिंबीर कुठलेही असो, बीट मात्र जेवणात असतेच असते.

१ उकडलेले अंडे. सकाळी आमलेटचा नाश्ता झाला असेल तर अंडे कटाप.

एक ते दोन वाटी पालेभाजी ===> मेथी,पालक,करडई,पातीचा कांदा,चुका,चाकवत,अळू किंवा माठ.

एक वाटी उसळ ===> चवळी,मटकी,वाटाणे,हरभरा.

(कधी-कधी मटकी-तोंडली, वांगी-हरबरे किंवा पडवळ-वाल अशी उसळ+फळभाजी करतो.अशावेळी मग अजून एखादी उसळ किंवा फळभाजी करत नाही.)

एक ते दोन वाटी फळभाजी ===> बटाटा, सुरण, फ्लॉवर, कोबी, ढेमसे, वांगी,दुधी भोपळा, लाल भोपळा (लाल भोपळा महिन्यातून एकदा.लाल भोपळा आणि कोहळा सांभारात जास्त वापरतो.)

एक ग्लास ताक.

जेवण झाले की एखादी खोबर्‍याची वडी, सोनपापडी किंवा गुळाचा खडा.

दुपारी जेवण झाले की घरात थोडी शत-पावली आणि वाचन.

दुपारी २ ते ३:३० झोप. (ह्याला वामकुक्षी काय म्हणणार्?मस्त झोरत पडलेला असतो.)

४:०० ते ५:०० वाचन

५:०० ते ५:३० नाश्ता. जास्त करून पोहे किंवा उपमा,दुपारची उसळ उरली असेल तर मिसळ-पाव, कधी-कधी सुरळीच्या वड्या, मेदूवडे-सांभार, बटाटे-वडे (वड्यांच्या बरोबर लसूण चटणी हवीच.)

६:०० ते ८:०० फिरणे किंवा कामानिमित्ताने इतरांकडे जाणे.

८:०० ते ८:३० पर्यंत जेवण.

सध्या रात्रीचे जेवण जरा हलकेच घेतो.खिचडी-कढी, आमटी-भात किंवा बटाट्याचे परोठे किंवा पिठले-भाकरी.

महिन्यातून एकदा, घरी केलेली आणि फक्त बटर मध्ये बनवलेली पाव-भाजी. (साधारण १५० ग्रॅम बटर लागते आणि ६-७ जणांना पुरते.)

९:०० ते १०:०० वाचन आणि जास्तीत जास्त १०:३० पर्यंत झोपायला जाणे.

आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.

==========================================

आता माझे प्रश्र्न....

१. मी सकाळ आणि संध्याकाळ शांत वातावरणात फिरण्याशिवाय इतर कुठलाही व्यायाम करत नाही किंवा योगासने पण करत नाही.वजन अद्याप तरी आटोक्यात आहे. उंची १५५ सेमी आणि वजन ६० किलो (अधिक-उणे २ किलो.)

२, सध्या मी दर ६ महिन्यांनी रक्तदाब आणि मधूमेह व हिमोग्लोबिन ह्याची तपासणी एकाच डॉ,कडून आणि एकाच ठिकाणी करून घेतो.

ह्या व्यतिरिक्त अजून काही तपासण्या आवश्यक आहेत का? आणि असल्यास किती महिन्यांनी?

३. जीवनसत्वांची तपासणी करणे आवश्यक आहे का? आणि असल्यास किती महिन्यांनी?

४. स्ट्रेस टेस्ट ऑगस्ट-२०१५ मध्ये करून घेतली होती.ती नॉर्मल आली.आता परत दुसरी टेस्ट करणे आवश्यक आहे का?

५. माझ्या खाण्यात जास्त प्रमाणात तेल किंवा तूप किंवा लोणी आहे का?

६. ६० नंतर माझ्या खाण्यात कुठले पदार्थ कमी करू आणि कुठले वाढवू?

देव=दयेने अद्याप तरी, हृदयाचे किंवा किडनीचे दुखणे नाही.ते पुढेही होऊ नये ही देवाचरणी प्रार्थना आणि मिपावरील डॉ.ना नम्र विनंती, की कृपया मला मार्गदर्शन करावे.

समाजजीवनमानतंत्रराहणीसल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

11 May 2016 - 2:32 pm | प्रीत-मोहर

=))

तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-)

बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

स्पा's picture

11 May 2016 - 2:40 pm | स्पा

जिलबी टाकली आहे का ? ;)

टवाळ कार्टा's picture

11 May 2016 - 2:44 pm | टवाळ कार्टा

सुखी माणूस :)

...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका

मन१'s picture

11 May 2016 - 2:50 pm | मन१
जेपी's picture

11 May 2016 - 2:51 pm | जेपी

सुखी माणुस...

एखादा सदरा मिळेल का ? ;)

तुषार काळभोर's picture

11 May 2016 - 8:04 pm | तुषार काळभोर

एखादं बनेल असलं तर इकडं द्या ;)

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 3:59 pm | बोका-ए-आझम

आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.

दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता.
(खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम's picture

11 May 2016 - 3:59 pm | बोका-ए-आझम

आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.

दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता.
(खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

नाखु's picture

11 May 2016 - 4:05 pm | नाखु

श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता..

मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे.

खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो.

अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

चंद्रनील मुल्हेरकर's picture

11 May 2016 - 4:17 pm | चंद्रनील मुल्हेरकर

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे's picture

11 May 2016 - 4:28 pm | बाळ सप्रे

पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ??

बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही.

त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

आदूबाळ's picture

11 May 2016 - 5:55 pm | आदूबाळ

तुमची खाद्यशैली जाऊदे, ही जीवनशैली मला पन्नाशीत (किंवा त्याआधी) मिळाली तर पुढची पन्नास वर्षं टेनशन नाय.

सध्या वामकुक्षी कशासोबत खायची असते हेदेखील विसरलोय, त्यामुळे हेवा वाटला.

मन१'s picture

11 May 2016 - 6:14 pm | मन१

मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :)
साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे.
दीड तास ???
मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून
जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

आदूबाळ's picture

11 May 2016 - 6:20 pm | आदूबाळ

+२

दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode's picture

11 May 2016 - 7:38 pm | mugdhagode

फळं खात नाहीत ?

फलाहार कमी पडतोय.

बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

उगा काहितरीच's picture

11 May 2016 - 7:56 pm | उगा काहितरीच

हेवा वाटावा अशी जेवणशैली जीवनशैली आहे.

मुक्त विहारि's picture

11 May 2016 - 10:27 pm | मुक्त विहारि

धन्तवाद.....

घाटी फ्लेमिंगो's picture

11 May 2016 - 8:04 pm | घाटी फ्लेमिंगो

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

प्रयत्न करीन.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 May 2016 - 8:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

मुक्त विहारि's picture

11 May 2016 - 10:34 pm | मुक्त विहारि

२२ मे २०१६ला कट्टा करायचा का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 May 2016 - 1:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

इकडे येताय का?

सतिश गावडे's picture

11 May 2016 - 9:05 pm | सतिश गावडे

ही जीवनशैली तुमच्याकडून तुम्हीच बनवलेला चहा पिताना ऐकली तेव्हाच तुमचा हेवा वाटला होता. :)

मुक्त विहारि's picture

11 May 2016 - 10:33 pm | मुक्त विहारि

माझ्याकडून दूढ उतू गेले.

बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.)

असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये.

आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

मुक्त विहारि's picture

11 May 2016 - 10:26 pm | मुक्त विहारि

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे.

कधीही जेवायला या.

@ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही.

@ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका."

ओके.

@ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा.

@ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का?

@ बोका-ए-आझम ===>

२२ मे २०१६ जमेल का?

@ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे.

@ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा."

माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो.

@ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ??

हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले.

पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे.

"आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा."

ओके.प्रयत्न करतो.

@ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता.

@ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा.

बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली.

@ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले.

===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा."

गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही.

त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल.

फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

mugdhagode's picture

12 May 2016 - 8:11 am | mugdhagode

शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ?

नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो.

तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता.
होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;)
पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते.
बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

मुक्त विहारि's picture

12 May 2016 - 8:03 am | मुक्त विहारि

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते."

अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले.

असो,

स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

स्रुजा's picture

12 May 2016 - 8:15 am | स्रुजा

पुरावा नाहिसा केला आहे :)

बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__

असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

रेवती's picture

12 May 2016 - 10:40 pm | रेवती

का नष्ट केलास तो पुरावा? त्याबद्दल मुविंकडून काही पदार्थ मिळणारेत का तुला?

टवाळ कार्टा's picture

12 May 2016 - 11:24 pm | टवाळ कार्टा

हा तुम्ही संपादकांच्या कंपूतले असल्याचा पुरावा समजायचा का? =))

मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P

साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

पैसा's picture

13 May 2016 - 10:01 pm | पैसा

हिरण्यकश्यपू सिंड्रोम असेही म्हणतात.

स्रुजा's picture

13 May 2016 - 10:15 pm | स्रुजा

लोल..

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 5:05 pm | टवाळ कार्टा

अर्रे ...शेवटीची स्माईलीपण बघत जा की

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2016 - 10:53 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे.

a

तुम्ही मच्छी खूप कमी खाता असे दिसतेय. मच्छी खावा जास्त..

मुक्त विहारि's picture

12 May 2016 - 8:04 am | मुक्त विहारि

ओके.

पुढे-मागे मत्स्य-शेती केली तर, कोलंबी खायला नक्की या.

आनंदी गोपाळ's picture

15 May 2016 - 4:17 pm | आनंदी गोपाळ

किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे.

दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

मुक्त विहारि's picture

17 May 2016 - 5:08 pm | मुक्त विहारि

त्यामुळे सध्या शेती करणे शिकत आहे.

पैसा's picture

12 May 2016 - 9:54 am | पैसा

झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण.

डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

स्पा's picture

12 May 2016 - 2:14 pm | स्पा

नवीन बाळ????

अभिनंदन मूवी, सांगितलात नाहीत ते

मुक्त विहारि's picture

12 May 2016 - 5:09 pm | मुक्त विहारि

हो....

हे बघ....

लिली नावाचे, बीगल जातीची कुत्री आहे.

,

सस्नेह's picture

12 May 2016 - 11:02 am | सस्नेह

मुविंची जीवनशैली पाहून ! (ह घ्यावे)

चित्रगुप्त's picture

12 May 2016 - 11:18 am | चित्रगुप्त

यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो:
१. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे
२. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे:
..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय.
३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम.
४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम.
५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम.
६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात.
७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील.
८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

सामान्य वाचक's picture

12 May 2016 - 2:55 pm | सामान्य वाचक

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो
आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते's picture

12 May 2016 - 11:35 am | भाते

मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर.

बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली.
६६, ६८, ७०…
गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले.
सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती.
पण…
वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता!
तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे!

अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात

ये क्या सुन रहा हूं मै?
मुविकाका, यू टू.
एनीवे. लै लै शुभेच्छा.
मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 11:57 am | सुबोध खरे

आपले वजन ५२ ते ६७ किलो या मध्ये असायला पाहिजे. BMI १९.१ ते २४. ९ हे व्यवस्थित असल्याचे लक्षण आहे
https://www.rush.edu/health-wellness/quick-guides/what-is-a-healthy-weight

मुक्त विहारि's picture

12 May 2016 - 1:05 pm | मुक्त विहारि

ह्याची सरासरी म्हणजे

(५२+६७)/२ = ११९/२ =५९.५

म्हणजे वजन एकदम प्रमाणबद्ध आहे का?

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 1:30 pm | सुबोध खरे

साधारण साठ किलो हे आदर्श (IDEAL) वजन आहे. (आजकाल हा शब्द वापरायची भीती वाटते).
यात १० % अधिक उणे (+/-)

नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही

त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे .
साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

बेकार तरुण's picture

12 May 2016 - 2:09 pm | बेकार तरुण

माझी खाद्यशैली योग्य आहे का? >>> योग्य का अयोग्य माहित नाही, पण कोणालाहि हेवा वाटेल अशी नक्कीच आहे !!

मोहनराव's picture

12 May 2016 - 2:18 pm | मोहनराव

जाम सुखी माणुस!! आहे ते चांगलं चाललय! आहार परिपुर्ण वाटतोय..

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 7:41 pm | सुबोध खरे

मु वी
तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही.
आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो)
बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन.
बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो.

मग ..

आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली.

मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

सुबोध खरे's picture

12 May 2016 - 7:42 pm | सुबोध खरे

IT IS NOT ONLY IMPORTANT TO ADD "YEARS" TO LIFE
BUT
IT IS EQUALLY IMPORTANT TO ADD "LIFE" TO YEARS

हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे..

-
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

रातराणी's picture

13 May 2016 - 12:15 am | रातराणी

सहीये!

अनोशा पोटी ===> ८२ मि.ग्रॅ.

जेवण झाल्या नंतर ===> १२१ मि.ग्रॅ.

लघवीतल्या साखरेचे प्रमाण ===> Absent

हेमंत लाटकर's picture

13 May 2016 - 11:14 pm | हेमंत लाटकर

तुमची जेवणातील महाराष्ट्रीयन थाली आवडली.

काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ.

पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2016 - 8:28 am | डॉ सुहास म्हात्रे

मुविशेट,

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही.

तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट".

केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :)

तेव्हा...

"ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका.

तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

सुबोध खरे's picture

14 May 2016 - 9:58 am | सुबोध खरे

+ १

एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.

नाखु's picture

17 May 2016 - 8:36 am | नाखु

एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.

किंचीत दुरुस्ती

एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय.

(जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई

खटपट्या's picture

17 May 2016 - 8:48 am | खटपट्या

दिवसाला एक अवॅकाडो खात जा !! बरा असतो म्हणतात तब्येतीला !!!

सप्तरंगी's picture

17 May 2016 - 4:47 pm | सप्तरंगी

माठ , करडी , चुका नि काय काय ..अहाहा काय सुखी आहात, तुमची जेवणाची जीवनशैली मस्त आहे. कोण बनवते हे सगळे… तुमची बायको. lucky आहात.