आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...
रेलवेच्या आठवणी
असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो...
भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.)
गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती...
दोन दिवसानंतर दिवाळी होती.
म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती...