जुनेरलं नातं...निरोपाची वेळं
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात.
जुनेरलं नातं...
आभाळीची चंद्रकोर
शोभते तुझ्या भाळी
तुझ्या पैंजण नादाने
आनंदाची मांदियाळी
चंद्रकोरीचा गारवा
सुखावतो डोळा
विचार चांदण्याचा
मनी घुमतो पारवा
चंद्रकोर झाली बिंब
उजळल्या दाही दिशा
चंचल मन शिंजीर
पालवल्या नव्या आशा
जसे नभी सुर्य चंद्र
दिनरात अशी साथ
कधी तार कधी मंद्र
ताल,सुरांचे आर्त