मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त ·

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.

दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

तो

मार्गी ·
दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख.

अल्पवयीन मातृत्वाची गंभीर समस्या

हेमंतकुमार ·

एक वेगळाच विषय वाचायला /चर्चेला आणल्याबद्दल अभिनंदन. एका लेखात वाचल्याप्रमाणे उसतोड मजुरांमध्ये बाल विवाहाचे प्रमाण खुप आहे, त्यालाही हेच कारण. मुलीला एकटी घरात ठेवुन आईबाप शेतावर जाउ शकत नाहीत. मग आली वयात की द्या लग्न लावुन आणि संपवा जबाबदारी. चाईल्ड ट्रॅफिकींग, बालमजुरी वगैरे फार सौम्य असे म्हणण्यासारखी परीस्थिती

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वामन देशमुख 29/01/2024 - 17:19
बालमजुरी वगैरे फार सौम्य असे म्हणण्यासारखी परीस्थिती
सहमत. हे प्रकार पाहून, "बालमजुरी हा तर गैरप्रकार नाहीच" असे म्हणावे म्हणावे लागेल. बाकी धाग्यातील विषयाशी सहमत. बालमाता हा अनेक देशांतील प्रश्न आहे.

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:21
पाच वर्षे सात महिने वयाची मुलगी (Lina Medina) माता बनली. त्या बालकाला सिझेरियनने काढावे लागले. या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मासिक पाळी येत होती (? Precocious puberty).
बापरे... ऐकावे ते नवलच! एकंदरीत विषय गंभीर आहे.

कंजूस 30/01/2024 - 05:18
या मुली कुटुंबात असूनही खरेतर निराधार आणि दुर्लक्षितच असतात आणि त्याचं कारण गरीबी. आजुबाजुच्या समाजही उद्योग आणि ध्येयहीनही असतो. लोकसंख्या वाढ हे गरीबीची कारण सांगतात,पण साडेचार हजार वर्षांपूर्वीचे इजिप्तमधील ऐतिहासिक पुरावे सांगतात की गरीबी होतीच. म्हणजे काय तर आर्थिक विषमता हे कारण. धनवान, सत्तावान बांधीव दगडी घरांत आणि जनता, गुलामीत मातीच्या खोपटांत. कुमारी मातेने मोझेसला पेटीत घालून सोडून दिलं. इकडे पौराणिक कथेतला कर्ण. समाजातल्या तरुणांना काही ध्येय निर्माण करून ठेवणे कठीण काम.

गवि 30/01/2024 - 06:50
विचित्र प्रकार आहे पाचव्या वर्षी मूल होणे म्हणजे. आणि त्यामागील व्यक्ती कायम अज्ञात राहिली हे वाईट. वरील तुम्ही दिलेली केस वाचताना बरोबर उलट बाजूची केस विकिपीडियाने दाखवली. सर्वात जास्त वयात अपत्य प्राप्ती. वयाच्या ७२ आणि ७३ व्या वर्षी मूल झालेल्या दोन्ही स्त्रिया भारतीय आहेत.

In reply to by गवि

हेमंतकुमार 30/01/2024 - 07:44
विचित्र आहे खरे ! म्हातारपणीच्या मातृत्वाचा विक्रम बघायला गेल्यास त्यात दोन प्रकार पडतील : १. नैसर्गिक मार्गाने गरोदर झालेली स्त्री : याचा 2017 च्या ‘गिनेस’ नोंदणीनुसार विक्रम, वय 59 असा दिसतो आहे. २. कृत्रिम गर्भधारणेने गरोदर झालेली स्त्री : हे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे वय 73.

In reply to by हेमंतकुमार

गवि 30/01/2024 - 09:00
धन्यवाद. बाकी कृत्रिम का असेना, पण ते गर्भाशयात रोपण करून मग डिलिव्हरी झाली असे वाटते आहे. साठ, सत्तर या वयातही गर्भाशय आदि अवयव काम करत असतात असे माहीत नव्हते.

हेमंतकुमार 25/09/2025 - 12:47
अल्पवयीन मातृत्वाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मुलींचे बालविवाह. राजस्थानमध्ये ही समस्या मोठी आहे. असे विवाह रोखण्यासाठी तिथे अनेक संस्थांनी एकत्र येऊन जागतिक स्तरावरील 'girls not brides' या नेटवर्कची स्थापना राजस्थानात केली आहे. सध्या या नेटवर्कमध्ये 28 संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून तिथले बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांना गती आली आहे. . . . बालविवाह : हेरंब कुलकर्णी यांचे नवे पुस्तक त्या लेखातून :
". . . बालविवाह हे माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. बालविवाह ही महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर समस्या आहे. दुर्दैवाने अजूनही अनेकांना बालविवाह मागच्या शतकातला विषय होता असे वाटते व आता कुठे आहेत बालविवाह? असा उलटा प्रश्न विचारतात. त्यामुळे या विषयावर उपाययोजना तर सोडाच, पण फारशी चर्चाही होत नाही. राजस्थानात हे प्रमाण जास्त असल्याने, राजस्थानची किमान चर्चा तरी होते. महाराष्ट्र हे ‘पुरोगामी’ राज्य असल्याने जणू इथे बालविवाह नसतीलच, असाच सार्वत्रिक समज आहे. या समजामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण किती? बालविवाहाच्या प्रश्नाची दाहकता किती? याची चर्चा कोणीच करत नाही. यामुळे महाराष्ट्रातील बालविवाहाचा प्रश्न जणू संपला आहे, असे सर्वसाधारण समजले जाते. पण भारतात आजही २३ टक्के, तर महाराष्ट्रात हे प्रमाण २२ टक्के इतके आहे, हे लक्षात घेतल्यावर धक्काच बसतो. . ."

११ वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर गर्भधारणा झाली होती. परंतु आता गर्भ ३१ आठवड्यांचा असल्यामुळे तिला गर्भपाताची परवानगी उच्च न्यायालयाने नाकारली
नुकतीच ही जयपूरची बातमी वाचली आणि सुन्न व्हायला झाले. इतक्या अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनेतून जे मातृत्व लादले जाते ते अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या निमित्ताने या विषयाचा घेतलेला हा शास्त्रीय कानोसा.

महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा

मार्गी ·

चौथा कोनाडा 12/01/2024 - 18:12
अ ति श य कौतुकास्पद मोहिम !

अ‍ॅमेझींग !

YH1245DTGF आपल्या मोहिमेला भरघोस लाभो आणि पुढील वाटचाली साठी योग्य तो उद्देश सापडो या मनापासून शुभेच्छा !

मार्गी 24/01/2024 - 18:16
नमस्कार. स्मिताची गोवा मुंबई राईड मस्त सुरू आहे. पहिल्या दिवशी पोंडा ते सावंतवाडी 91 किमी, दुसऱ्या दिवशी सावंतवाडी ते राजापूर 114 किमी व आज राजापूर ते रत्नागिरी 65 किमी अंतर तिचं पूर्ण झालं. वाटेतले चढ, समुद्राजवळची ह्युमिडिटी, अनोळखी रस्ते असूनही ती जिद्दीने राईड करते आहे. वाटेत नर्सिंग महाविद्यालय, शाळा, सामाजिक संस्था अशा अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम होत आहेत. तिला ह्या रूटवर मदत करणाऱ्या सर्वांना धन्यवाद.

मार्गी 30/01/2024 - 19:28
नमस्कार. स्मिताची गोवा ते मुंबई सोलो सायकल मोहीम यशस्वी झाली. तिने 7 दिवसांमध्ये 600 किमी अंतर सायकल चालवली. वाटेतल्या शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स अशा विविध ठिकाणी तिचे कार्यक्रम झाले. चढाचे रस्ते व ह्युमिडिटी असूनही तिने जिद्दीने हे अंतर पार केलं. तिला ह्या प्रवासात अनेकांनी मदत केली. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे- महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग मोहीमेची उद्दिष्टे सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं.

योद्धा

कर्नलतपस्वी ·

खरी शक्ती,यानेच कित्येकदा नियती सुद्धा हार मानते. अशाच एका योद्ध्याची घमासान लढाई मध्ये लढताना केलेली आणखी एक शब्द रचना. शब्द येतात कविता घेऊन आजारी असताना माणसं येतात, डझनभर केळी घेऊन, किती असतात कोण जाणे, आलेली आपण होऊन.।। भेटताना ही येतात, हातावरती वेळ बांधुन, जाताना मात्र म्हणतात, परत येऊ वेळ घेऊन.।। कोणी आणतात फुलं पानं, क्षण जातात सुगंधात न्हाऊन , मळभ दाटलेले विरु लागते, जातात वृत्ती स्वच्छ होऊन.।। आलं कोणी भेटायला की, डॉक्टर तेंव्हाच जातात पाहुन , गर्दी कमी करण्यासाठी, जातात मोठ्ठं इंजेक्शन देऊन.।। सगळ्यांच्या शुभेच्छांनी, आजार जातो बरा होऊन, उमटतात त्याच्या पाऊलखुणा, अन शब्द येतात कविता घेऊन.।।

धष्टपुष्ट 05/01/2024 - 15:06
घेउनी जखमा उरी,फिरलो कसा ठाऊक नाही./ घेउनी व्रण ते उरी, फिरलो कसा ठाऊक नाही . अंधारल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. जिंकताना नेमके, हरलो कसा ठाऊक नाही. कटिबद्ध होती ती, नि होता विपुल तीचा शस्त्रसाठा/ बांधली होती कटी अन् विपुल होता शस्त्रसाठा

दुःख माझे मी कसे,सांभाळीले ठाऊक नाही, घाव जे शिरी सोसले,उरलो कसा ठाऊक नाही. . वेदना झाल्या तरीही,मूक मी का राहिलो, जखमा उरी घेऊनी,फिरलो कसा ठाऊक नाही. . हाक ना आली कुठूनी,साद ही ना पोचली, अंधारलेल्या वाटेवरी,शिरलो कसा ठाऊक नाही. . सुख झाले पाहुणा अन दुःख झाले सोबती, जिंकतानाच नेमके,हरलो कसा ठाऊक नाही. . सावलीतही जाणवे ते,ऊन तापलेले किती, श्वासातल्या धाग्यातूनी,विरलो कसा ठाऊक नाही. . कटिबद्ध होती ती,विपुल शस्त्रसंभार होता नि:शस्त्र मी,अगतीक मी,कसा पुरलो ठाऊक नाही - कवी योगेश

फिटनेस सोपी गोष्ट आहे

मार्गी ·
फिटनेस ५० आणि फिटनेस १०० कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

सैंधव मीठ/हिमालयीन/खेवडा मीठ

Bhakti ·

कॉमी 03/07/2023 - 17:48
सैंधव मिठामध्ये जे मिनरल असतात ते खूप कमी प्रमाणात असतात. त्याचा काही उपयोग हवा असेल तर खूप जास्त सैंधव मिठ आहारात ठेवावे लागेल. इतके, की त्यामधला सोडियम हा अपायकारक ठरेल. म्हणजे ह्या मिठाच्या वापरातून काही उपयोग होतो असे अभ्यासात अढळून आलेले नाही. तसेच, शरीराला उपयोगी मिनरल सारखेच, शरीराला अपायकारक मिनरल सुद्धा सूक्ष्म प्रमाणात सैंधव मिठात असतात. ट्विटर वर @TheLiverDr ह्यांनी सगळे सोर्स देऊन ह्यावर लेख लिहिला आहे. https://twitter.com/theliverdr/status/1667873745716023298

In reply to by कॉमी

Bhakti 03/07/2023 - 18:04
चांगला लेख,खरच सैंधव मीठ फारच ग्लोरीफाईड झाल आहे.
rock salt because it not only contains sodium chloride, but also gypsum (CaSO4) and sylvite (KCl), potassium sulfate and polyhalite (K2Ca2Mg(SO4)4.2H2O)!
अशुद्ध असताना एवढे नको असलेले मिनरल आहेत तर..

प्रचेतस 03/07/2023 - 18:56
कालच ह्या मिठाच्या दगडांनी भरलेल्या दोन गाड्या आळेफाटा नगर रस्त्यावर दिसलेल्या होत्या, इथं पिंपरीत पण कायम असतात. लहानपणी काळे मीठ चघळायला आवडत असे, त्याची बारीक पूड करून बडीशेपमध्ये टाकून खायला पण भारी लागे.

गवि 03/07/2023 - 20:24
जिथे समुद्र नाही तिथे मजबुरी म्हणून हे वापरले जात आले आहे. सोडियम खेरीज अन्य क्लोराइड्स , सल्फाइड्स देखील असल्याने रंग वेगवेगळे. हायड्रोजन आणि सल्फाइडचा पादरट वास. पण तरी चाट किंवा फ्रूट प्लेटवर चविष्ट. यात एक गंमत आहे. अमुक हजार वर्षे जुने हिमालयातील सैंधव अशी प्रसिद्धी असलेले सैंधव एखादी कंपनी पॅक करून विकते आणि तिच्यावर काही महिन्यांची एक्सपायरी डेट छापते. कायद्यापुढे काय करणार?

चित्रगुप्त 04/07/2023 - 00:32
मिठाविषयी माहितीपूर्ण लेखन आवडले, अलेक्झांडरच्या घोड्याने चाटल्यामुळे या पर्वताची ओळख 'जगाला' झाली, ही माहिती प्रथमच कळली. बाकी पाश्चात्यांनी अलेक्झांडर, ज्युलियस सीझर, नेपोलियन, अकबर इत्यादिकांना 'ग्रेट' ठरवून शतकानुशतके सातत्याने तसा प्रचार केलेला असला, तरी अजुनही आपण त्यांची री ओढत रहाणे कितपत सयुक्तिक आहे, असा प्रश्न पडला आहे.

चॉकलेटचा डोंगर शोधुन काढा ना! आमचे आजोबा कंजूस आहेत. ते दररोज कॅडबरीची एकच वडी देतात चाटायला. आरारा... पुन्हा टंकाळ्याची मिश्टेक. चाखायला म्हणायचं होतं. (चॉकलेट वेडा भाचा )

चौथा कोनाडा 04/07/2023 - 20:43
खारट्ट .... आय मीन नमकीन लेख. सैंधव मीठ आज काल वापरात आहेच , पण त्याच्या खडकांचे फोटो ते ही ट्रक मधले पहिल्यांदाच पाहिले या पोस्ट मुळे. धन्यू भक्ति !

मिठाचा महिमा अगाध आहे. रोमन साम्राज्यात किंवा एकंदरीत प्राचीन इतिहासात मिठाला अनन्यसाधारण महत्व होते. इतके की रोमन फौजांत मीठ हे पगार म्हणून वाटले जाई. रोमन भाषेत मीठ म्हणवले जाई सॅलेरीयम , अन् ह्यावरून आलाय पगारासाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द "सॅलरी" असाच इतिहास अभ्यास आवडतो आम्हाला म्हणून राहवले नाही लिहिणे. - (नुसताच) इपित्तर इतिहासकार. बाकी तो ट्रक ड्रायव्हर पूर्ण गृहस्थी सोबत घेऊन चालतो आहे का काय ह्या फिरतीवर असे वाटले तो वरती लटकवलेला नीळा ट्रक पाहून.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Bhakti 05/07/2023 - 07:08
वाह!नवी माहिती समजली. येस वेशभूषेवरून तो ट्रकचा मालक भारत-पाकिस्तान सीमारेषावरील पंजाबचा वाटत होता त्याच्याबरोबर बायकोही होती.

In reply to by Bhakti

जगातील सगळ्यात कठीण लवण उर्फ मीठ व्यापार हा "ट्रान्स हिमालयन मिठाचा व्यापार" असे. (आजच्या) चीन मधील शिंजियांग (Xin Xiang) मधून, काशगर मधून वगैरे तिबेटियन व्यापाऱ्यांचे काफिले याक वर मिठाच्या गोणी लादून लडाख मध्ये उतरून तिथल्या वेगवेगळ्या valleys मध्ये ते विकत आणि बदल्यात जव, लोकर, अक्रोड, अक्रोडाच्या लाकडाचे गोठ, जर्दाळू वगैरे सामान परत घेऊन जात. images-9 ते याक असेच काहीसे दिसत असतील.

टर्मीनेटर 05/07/2023 - 12:08
सैंधव मीठ हा पदार्थ चांगलाच परिचित असला तरी त्याविषयीची सामान्यज्ञानात भर टाकणारी माहिती असलेला हा छोटेखानी लेख आवडला, त्यावरचे प्रतिसादही छान आहेत. अशाप्रकारे विकल्या जाणाऱ्या 'क्रुड' सैंधव/हिमालयीन मिठाच्या ह्या दगड धोंड्यांचा उपयोग प्रत्यक्ष सेवनासाठी किती जण करत असतील ह्याची मला कल्पना नाही पण घरगुती शेळी पालन करणारे मुस्लिम लोकं मात्र त्यांचा वापर करताना पाहिले आहेत. (व्यावसायिक गोट फार्मवाले करतात का हे माहिती नाही.) विविध वनस्पतींची पाने हा शेळ्यांचा नैसर्गिक आहार. ग्रामीण भागात तो सहजासहजी उपलब्ध होतो. पण शहरी/निमशहरी क्षेत्रातील मोहल्यांमध्ये घरगुती शेळी पालन करणाऱ्यांना तो रोज उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने ते गहू, ज्वारी, बाजरी अशी धान्ये किंवा बाजारात तयार मिळणाऱ्या कोरड्या पशुखाद्याचा वापर करतात, ज्याच्या परिणामी बकऱ्यांना अपचनाचा त्रास होण्याचे प्रसंग वारंवार उद्भवतात. त्यावर साधा सोपा घरगुती उपाय म्हणून एका घमेल्यात ह्या मिठाचा दगड ठेवतात. बकरे/बकऱ्याही हुशार असतात, कुठल्याही प्रशिक्षणाशिवायही त्या खाणे झाल्यावर जरुरी पुरता तो दगड चाटतात. ठेवलाय एवढा मोठा दगड म्हणून विनाकारण त्याला चाटत बसत नाहीत 😀 सैन्द्रिय पद्धतीने शेती करणारेही वनस्पतींची लोह, जस्त, सल्फेट आणि विशेषतः मॅग्नेशियमची गरज भागवण्यासाठी ह्या मिठाच्या सौम्य द्रावणाचा वापर करतात. असो.. पाकिस्तानातले सैंधव/हिमालयीन/खेवडा मिठावरचा लेख तर छान झाला, आता पुढील लेखासाठी तुम्हाला 'हिंग' (Asafoetida) हा विषय सुचवतो. प्राचीन काळापासून भारतीयांच्या रोजच्या खाण्यातलया ह्या पदार्थाचे मूळ भारतात नसून ते मध्य आशियातील पूर्व इराण आणि अफगाणिस्तानात आहे 😇

In reply to by टर्मीनेटर

प्रचेतस 05/07/2023 - 12:25
माहितीपूर्ण प्रतिसाद.
साधा सोपा घरगुती उपाय म्हणून एका घमेल्यात ह्या मिठाचा दगड ठेवतात
हे तर अगदी अभयारण्यातही दिसते. जंगलात पाणवठ्यांजवळ हे सॉल्ट लिक ठेवलेले असते. ह्या विषयी माझ्या मेळघाटाविषयक एका धाग्यात लिहिले होते.
प्राचीन काळापासून भारतीयांच्या रोजच्या खाण्यातलया ह्या पदार्थाचे मूळ भारतात नसून ते मध्य आशियातील पूर्व इराण आणि अफगाणिस्तानात आहे
ह्याविषयी अधिक लिहा. कारण हिंगाचा उल्लेख हरिवंशात (खिलपर्वात) स्पष्टपणे येतो. अर्थात तेव्हा पूर्व इराण, अफगाणिस्तान हे तत्कालीन जंबूद्विपाचेच भाग असल्याने वर्णन येणे साहजिकच आहे.

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर 05/07/2023 - 13:06
जंगलात पाणवठ्यांजवळ हे सॉल्ट लिक ठेवलेले असते. ह्या विषयी माझ्या मेळघाटाविषयक एका धाग्यात लिहिले होते.
'सॉल्ट लिक' बद्दलची माहिती रोचक आहे! लॉकडाउन काळातला असल्याने बहुतेक मेळघाटाविषयक हा सुंदर लेख माझ्या वाचनातुन निसटला असावा, तो ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने आज वाचायला मिळाला. खुप छान चित्रदर्शी लिहिलंय 👍
ह्याविषयी अधिक लिहा.
तुर्तास तो बॉल मी भक्तिंच्या कोर्टात टोलवला आहे, त्यामुळे त्यांना लिहु देत. (आणि त्यांनी लिहिण्याचे नाहीच मनावर घेतले तर मी त्या विषयाला हात घालीन 😀)
हिंगाचा उल्लेख हरिवंशात (खिलपर्वात) स्पष्टपणे येतो. अर्थात तेव्हा पूर्व इराण, अफगाणिस्तान हे तत्कालीन जंबूद्विपाचेच भाग असल्याने वर्णन येणे साहजिकच आहे.
भागवत पुराणातही हिंगाचा उल्लेख आहे.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 05/07/2023 - 13:38
मला हिंगाचा ट्रक दिसू द्या आधी :) आणि या लेखाचं श्रेय आमच्या ह्यांना जातं कारण रस्त्यावरून जाताना,"थांब थांब पाकिस्तानच मीठ घेऊ या"असं म्हणाले."काय आपण पाकिस्तानचं मीठ खातो?" अशी माझी संभ्रम अवस्था झाली.

टर्मीनेटर 05/07/2023 - 14:09
मला हिंगाचा ट्रक दिसू द्या आधी :)
ह्याचा अर्थ तुम्ही हिंगावर लेख लिहिण्यासाठी केलेली सुचना/विनंती धुडकावताय असा घ्यायचा का 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 05/07/2023 - 16:28
हा हा , नाही तसं नाही.पण सध्या सौदीचे ओले खजूर पहिल्यांदा पाहिले,ते मोठ्या प्रमाणात कुठे मिळतेय त्याचा विचार सुरू आहे.डोक्यात खजूर आहे सध्या :) A तुम्ही हिंगाच मनावर घ्या.येऊ द्या मस्त लेख.

In reply to by Bhakti

हे तुम्हाला सौदी मधून आले असतील तर भारीच. पण असेच पिवळे अन् लाल खजूर (ओले) गुजरात मधून येतात. कच्छ भागात शेती होते त्यांची. कच्छी खारेक म्हणतात. खायला मधुर अन् तुरट असतात थोडे, घशात खवखवते जास्त खाल्ले तर. मजा असते एकंदरीत. images

टर्मीनेटर 05/07/2023 - 16:38
सध्या सौदीचे ओले खजूर पहिल्यांदा पाहिले,ते मोठ्या प्रमाणात कुठे मिळतेय त्याचा विचार सुरू आहे
काय योगायोग आहे बघा... दहा-बारा दिवसांपुर्वी सौदीहुन परतलेल्या एका मित्राने तिथल्या बेस्ट क्वालीटीच्या खजुरांचा बॉक्स दिला होता. त्यातले बऱ्यापैकी आम्ही आषाढि एकादशीला खाउन संपवले होते, शेवटचे दोन-चार राहीले होते ते आत्ता मी गट्टम केले आणि तुम्ही इथे खजुरांचा विषय काढलात 😀
तुम्ही हिंगाच मनावर घ्या.येऊ द्या मस्त लेख.
करतो मग आता प्रयत्न...

Bhakti 06/07/2023 - 21:49
शेजारी धागा आहे.प्रतिसादानिमित्ताने त्यात लिहिलंय सारख धन्यवाद म्हणू नये ;) सर्वांना एकत्रित धन्यवाद ! -भक्ती

काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.

नको ना रे

पाषाणभेद ·

जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी घ्या ना थोडीशी थोडीशीच घ्या ना आजच्याच दिवस १ ६० ३० उलीशीच घ्या ना...... जशी समजली तशीच प्रतिसादली. पाभे भौ कृ ह घ्या.......

चित्रगुप्त 03/01/2023 - 11:37
नको नको म्हटलं तरी मिपावर येणं होतंच नको नको म्हटलं तरी कविता वाचणं होतंच ... बाकी काय काय नको, ते समर्थ सांगून गेलेतचः नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ नको वासना वीषयीं वृत्तिरुपें। पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥ नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी ॥ नको रे मना शीकवूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ ........ ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे.... असेही कुणितरी म्हटलेच आहे, तस्मात : नको वीट मानूं पाषाणभेदा। अती आदरे बोलिले सर्व वेदा ॥ जय जय रघुवीर समर्थ.

नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको