काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.
सैंधव मीठ ज्याला
हिमालयीन मीठ-हिमालयाच्या पायथ्याशी सापडतं
सैंधा /सैंधव मीठ -सिंधू नदीच्या भागात सापडते
खेवडा/खैबुर/लाहिरी मीठ-पाकिस्तानमधील खेवडा प्रांतात याच्या खाणी आहेत.
गुलाबी मीठ-रंगाने गुलाबी आहे.
Rock salt-खनिज पदार्थापासून मिळवलं जातं.
जगातली मीठाची दुसर्या क्रमांकाची खाण पंजाब -पाकिस्तान येथे आहे.आणि ती इतकी मोठी आहे की आणखीन कित्येक शतकं यातून सहज सैंधव मीठ मिळवता येईल.
५००-६०० लक्ष वर्षांपूर्वी या भागातील समुद्र बाष्पीभवन प्रक्रियाने आटले.मीठाचे अधिक प्रमाणात अंश येथे उरले.पुढे बर्फ,लाव्हा यामुळे यांचे जमिनीखाली दाबून खडक बनत राहिले.भूगर्भातील टेक्टॉनिक हालचाली सुरू झाल्या.मोठ्या दाबाने हे मिठाचे डोंगर पर्वत रांगा होऊन वर आल्या.अल्केझांडर द ग्रेट या भागात मोहिमेवर असताना त्याच्या युद्धातल्या घोड्याने हे डोंगर चाटले व चाटतच राहिला त्यामुळे या खारट गुलाबी पर्वताची ओळख जगाला झाली.पाकिस्तान यांची निर्यात भारताला करतो,त्यांच्याकडे याच्या प्रोसेसिंगचे तंत्रज्ञान नाही.भारत या खडकांवर प्रकिया (शुद्धीकरण)करुन यांची निर्यात जगभर करतो.
याचे विशिष्ट गुणधर्म म्हणजे सोडियम क्लोराईड (NaCl)शिवाय यात मग्नेशिअम, पोटॅशियम ,कॅल्शियम आयर्न आढळते.आयर्न आक्साईडमुळे रंग गुलाबी आहे.परदेशातील नागरिक या गुलाबी खडकापासून शोभेच्या वस्तूही बनवतात .
याच हिमालयीन मीठावर गंधक प्रक्रिया करून काळे मीठ बनवतात.ज्याची चव वेगळी होते.बाजारात समुद्री मीठावर प्रक्रिया करून बनवलेल्या काळ्या मीठाचाही सुळसुळाट आहे.
तरीही सैंधव मीठामध्ये आयोडिन (जीवाश्म प्रक्रियेत मिसळते?) नाही.अयोडिन हे समुद्री मीठात आढळते जे थायरॉईड ग्रंथीना कार्य करण्यासाठी गरजेचे आहे.तरीही केवळ सोडियम क्लोराईड बरोबर आणखीन भरपूर मिनरल मिळवण्यासाठी सैंधव मीठ उपयोगी आहे.पण कोणतेही मीठ असो प्रमाणात खावे.
-भक्ती
वाचने
10160
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सोडियम क्लोराईड नसते तर
नाही हो विजूभाऊ सोडियम
In reply to हे सोडियम क्लोराईड नसते तर by विजुभाऊ
चूक मान्य.
In reply to नाही हो विजूभाऊ सोडियम by Bhakti
सैंधव मिठामध्ये जे मिनरल
चांगला लेख,खरच सैंधव मीठ फारच
In reply to सैंधव मिठामध्ये जे मिनरल by कॉमी
माहिती बद्दल धन्यवाद...
कालच ह्या मिठाच्या दगडांनी
जिथे समुद्र नाही तिथे मजबुरी
खरंच गंमत आहे.
In reply to जिथे समुद्र नाही तिथे मजबुरी by गवि
मीठ आणि अलेक्झांडर 'द ग्रेट'
भक्ती तै....
तयार चाॅकलेटचा डोंगर मिळणे अशक्य आहे ... पण...
In reply to भक्ती तै.... by कर्नलतपस्वी
खारट्ट .... आय मीन नमकीन लेख
छान आहे लेख.
वाह!नवी माहिती समजली.
In reply to छान आहे लेख. by इपित्तर इतिहासकार
मीठ व्यापार
In reply to वाह!नवी माहिती समजली. by Bhakti
भारत या खडकांवर प्रकिया
प्रक्रिया केवळ मोठे खडक
In reply to भारत या खडकांवर प्रकिया by चौकस२१२
पादेलोण, शेंदेलोण, शेंदेमीठ,
सामान्यज्ञानात भर टाकणारी माहिती असलेला लेख आवडला!
माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to सामान्यज्ञानात भर टाकणारी माहिती असलेला लेख आवडला! by टर्मीनेटर
जंगलात पाणवठ्यांजवळ हे सॉल्ट
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by प्रचेतस
मला हिंगाचा ट्रक दिसू द्या
In reply to जंगलात पाणवठ्यांजवळ हे सॉल्ट by टर्मीनेटर
हे घ्या
In reply to मला हिंगाचा ट्रक दिसू द्या by Bhakti
मला हिंगाचा ट्रक दिसू द्या आधी :)
हा हा ,
In reply to मला हिंगाचा ट्रक दिसू द्या आधी :) by टर्मीनेटर
हे भारी आहे
In reply to हा हा , by Bhakti
काय योगायोग आहे बघा...
वाह! नविन माहिती मिळाली!!
शेजारी धागा आहे
मला तर हिंगणे हे ग्राम नाम