मनोरुग्न होतांनां येणारी शारीरीक व मानसीक दुर्बलता नमस्कार,
मी, शिवाजी पाटील सद्या मनोविकार/डिप्रेशन/मानसीक पिडा या विषयावर माझे स्वत:हाचेच अनुभव व्यक्त करीत आहे कारण हे मला अतिआवश्यक वाटतात माझे वय27 आहे मी जिल्हा जळगाव,महाराष्ट्र येथील रहीवासी गेल्या 1 वर्षा पासुन मी मनोरुग्नच होतो.मी पदविचे शिक्षण घेत स्पर्धापरिक्षा देत होतो पदवीनंतरही अभ्यास चालु होता वारंवार होणार्या परिक्षा खर्च,अपयश खंबीर मनाने सामना करीत होतो.4ते5 वर्ष त्याच परिरीस्थीतीत कारण मी शेती ही करतो आर्थीक अडचन नेेहमीच भासत होती,मुंबईत रु12,000महीन्याची एक कंत्रीटी नौकरी भेटली 1वर्ष काम केले दुसर्या वर्षी सेवा समाप्त केली गेली