दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे.
महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे :
योगश्चित्तवृत्तिनिरोध:
('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे).
अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध:
( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय)
आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाहेरच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे.
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची
चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.
त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.
एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस असतात.
सुट्यांची चाहूल लागलेली असते आणि अंगाच्या काहिलीचीही.
`तो` आग ओकायला लागलेला असतो.
अशात एक थंड झुळूक पिवळसर मंद गोड सुगंध घेऊन येते. गावातला कुणी काका/मामा हातात एक मळक्या रंगाची पिशवी घेऊन आलेला असतो.
असा नातेवाईक नशीबात नसला, तर आपणच बाजारात काहीतरी घेऊन येताना एखाद्या कोपऱ्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्याची एखादी म्हातारी समोर भरलेली टोपली घेऊन आपल्याकडेच आशेने बघत बसलेली दिसते.
चुलीवरच्या मिसळीची पाककृती
"तुम्च्या मिसळीची पाककृती आमाला पायजेल" अशी विचारणा आल्याने ही कृती देत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यात बदल करून घ्यावेत.
---
गरम असा दिवस पाहून ठेवावा. मग सर्वात आधी दुकानात जाऊन आवडती बियर बाटल्यांची एक थंडगार केस आणावी. आपल्या आवडीचे धम्माल मित्र-मैत्रिण लोक घरी बोलवावेत. मस्त बियर पीत गप्पा हाणता हाणता अगदी रंगात आल्या की, 'चला चुलीवरची मिसळ करायची का?' असे पिल्लू सोडावे. ही कल्पना बहुदा सर्वांना आवडतेच!
मग चूल पेटवण्याचे प्रयत्न सुरू करावेत. या वेळा पर्यंत सर्वांची 'किमान बियर पातळी' गाठलेली असेल तर उत्तम असते.
बाटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||
माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||
"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||
कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||
कधीही मी कामी येई जेव्हा नसे भाजी ताजी
कोणत्याही भाजीत मिसळून जाण्या मी राजी
बहुगुणी असा सगळ्या भाज्यांत शहाणा मोठा ||
माझी करा रस्सा भाजी सुकी भाजी मटार बटाटा भाजी
किंवा करा मिक्
पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू! )
"कशाला मरतेस?
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.
उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस
कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस
वय का आपुले असे मोजिले
चार पेग जर रिते तू केले
यौवन भासेल तूस
ये सोडूनि घास फूस