शब्द झाले मोती : ३
शब्द झाले मोती : ३
जवळजवळ १०-११ वर्षे झाली, “शब्द झाले मोती” लिहायला घेतलेलं ते...
आता मागे वळून पाहताना वाटतं,
माणूस ३० मधून चाळिशीकडे येताना किती स्थित्यंतरांतून जातो...
या भागात मात्र मला चाळिशीतल्या माझ्या मनाला उमटणारे भाव शब्दांत उतरवायचे आहेत. जसं वाटेल, तसं लिहिणार आहे...
आधी वाटलं होतं, FIRE, Finance, Health, चाळीशी, अशा माझ्या आत्ताच्या विचारांवर लिहावं.
पण इतक्या वर्षांनी पुन्हा लिहायला घेतलं आणि आठवणींचे दरवाजे आपोआप उघडू लागले...
मग म्हटलं,
“शब्द झाले मोती” म्हणजे मनात येईल ते.
जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
अक्षरांचे पंख
होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते
बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते
का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी
अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते
त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी
तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते
चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा
कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते
सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण
मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते!
संध्येच्या व्याकूळ छाया.
नरो वा कुंजरो वा
कोडी
उंदीर
असं कुठं लिहिलंय?
मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,
गेले द्यायचे राहून.....
गेले द्यायचे राहून....., म्हणत आयुष्य Mute केलं
प्रारब्ध, नशीब म्हणत ..... कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं
जगण्याची मजा काय विचारता?
स्वतःच्या मनाला mute करून, दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय...
Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर Google करून बघतोय!
घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं
मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं ....
इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत Telling lies करतोय....
worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय.
शाळेचा पहिला दिवस...
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले. कुणी घराकडे तर कुणी जाॅगर ट्रॅक कडे वळाले.
मिसळपाव