Skip to main content

आरोग्य

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी बुधवार, 11/03/2026 या दिवशी प्रकाशित केले.
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

सायकल… एक प्रवास, एक विश्व

लेखक Avinash Anushe यांनी रविवार, 25/01/2026 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात झालेला रस्त्यांचा बदल आणि सायकलिंगसाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, तलाव आणि वळणावळणाचे रस्ते यांच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळाच असतो. कधीकाळी पुण्याच्या आसपास सायकलिंग करताना मनात नेहमी एक विचार यायचा या सुंदर परिसरात जर दर्जेदार रस्ते आणि सायकलिंगसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पुणेकरांना किती अप्रतिम अनुभव घेता येईल! आज त्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मला माझा सायकलिंगचा प्रवास आठवला.

रोबोटीक आय०व्ही०एफ० - प्रजननातील क्रांती?

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 13/10/2025 या दिवशी प्रकाशित केले.
 AURA, Conceivable Life Sciences द्वारे विकसित केलेली AI-चालित IVF रोबोटिक प्रणाली, थेट मानवी हस्तक्षेपाशिवाय गर्भ तयार करून एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. आतापर्यंत जवळपास २० बाळे, मेक्सिको सिटीमधील स्वयंचलित फलन (फर्टिलायझेशन) चाचण्यांमधून जन्मला आली.

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 05/09/2025 या दिवशी प्रकाशित केले.
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट - "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही - बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा - कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी - सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ! - छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ - ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा - ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट - "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!" - सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम नमस्कार!

बंगळुरू- उटी- ईशा आदियोगी- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पाँडेचेरी- चेन्नै सायकल प्रवास

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/08/2025 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. लवकरच दक्षिण भारतामध्ये सायकल प्रवास करणार आहे. परभणीतली संस्था- निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र ह्यांच्या वतीने "Yoga for fitness" अभियानामध्ये हे सोलो सायकलिंग करणार आहे. दक्षिण भारतात सायकलिंग करायचं होतं. आणि आवडीबरोबर सायकलच्या माध्यम म्हणून असलेल्या क्षमतेचा वापर करत एखादा विचार घेऊन लोकांसोबत संवाद करावा असं‌ वाटत होतं. २०१८ मध्ये परभणीच्याच निरामयतर्फे मराठवाड्यामध्ये ५०० किमीचा एक सायकल प्रवास केला होताच. त्यावेळी त्यामुळे झालेल्या भेटी, संवाद आणि एकूण परिणाम माहिती‌ होता. संस्थेनेही ह्यामध्ये रस घेतला आणि अशी ही मोहीम ठरली.

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

लेखक मार्गी यांनी सोमवार, 28/07/2025 या दिवशी प्रकाशित केले.
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

लेखक मार्गी यांनी शनिवार, 01/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 03/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ================ सध्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या तेजस्वी संस्कृतीचं जे प्रदर्शन चालू आहे, त्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण किती जणांना निर्माण झाले, आणि कितीजण लांब गेले हा एक संशोधनाचा विषय होईल. एखादा श्वेतकाय जरी कुंभमेळ्यात दिसला तरी तो गर्दी गोळा करतो, पण जे मनात निर्माण झालेली घृणा, तिरस्कार दाखवू शकत नाहीत, त्यांचा हिशेब मात्र कुणी ठेवत नाही.

भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट - २१ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 21/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आज रोजी Winter/December Solstice म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ होत असलेला २१ डिसेम्बर हा दिवस "आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस" म्हणून साजरा करायला मान्यता दिली आहे. २१ जूनच्या "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ह्या यशानंतर भारताने आणखी एक यश मिळवले आहे. योगानंतर "ध्यान" हि भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट (cultural export gift) आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे उदघाटन करण्यात येणार आहे.