मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

नपुंसकत्व

राहुल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नपुंसकत्व पुरुषाच्या लिंगाला उद्दीपनावस्था येऊन ती वीर्यपतन होईपर्यंत टिकणे हे नैसर्गिक आहे. परंतु अशी उद्दीपनावस्था वीर्यपतनाआधीच नाहीशी होणे, संभोग करण्यास असमर्थ ठरणे किंवा कामक्रीडा करताना लिंग उद्दीपन बिलकुल न होणे याला नपुंसकत्व म्हणतात. जगामध्ये नपुंसकत्व तक्रार असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. भारतात करोडो पुरुषांना ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांनी २०२५ पर्यंत जगात याची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

मानवी कामजीवन:प्रश्न आणि उत्तर

राहुल ·
लेखनविषय:
कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ? विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल ·
लेखनविषय:
सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी 'सरोगेट पार्टनर' म्हणजे असे पुरुष अथवा स्त्री की जे कामजीवनाविषयी प्रशिक्षण घेतलेले असतात व कामशास्त्रज्ञाकडे आलेल्या स्त्री-पुरुषांना कामजीवनाविषयी काहीवेळा प्रत्यक्ष कृती करून शिकवत असतात. स्त्री-पुरुष दोन्ही 'सरोगेट पार्टनर्स' असतात. स्त्री पेशंटसाठी पुरुष व पुरुष पेशंटसाठी स्त्री सरोगेट पार्टनर तयार असतो.LGBT साठी देखील असे सरोगेट ट्रेन केले असतात. प्रत्येकवेळी सेक्स केला जातोच असे नाही.

आजच्या काळात विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्व

राहुल ·
लेखनविषय:
वाढत्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये जोडीदार निवडताना केलेली चूक, स्त्री-पुरुषांमध्ये असलेल्या काही लैंगिक समस्या, कामजीवनविषयक अभ्यासाचा अभाव यांचा समावेश होतो. या सगळ्यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय ठरतो. जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी हे यातून समजते. तसेच सेक्स मधील विविधता, वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स यांचीही माहिती मिळते. विवाहाची तयारी करताना जशी कपडे, दागिने, हॉल याची काळजी घेतली जाते तशी काळजी सेक्स लाईफ चांगले होण्यासाठी घेतली जात नाही हे खेदजनक आहे.

सेक्स फॉर रेकॉर्डस

राहुल ·
लेखनविषय:
वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते. ◼फॅलोपिअन ट्यूब- फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.

मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर

राहुल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या महत्वाच्या विषयावर एकाच वेळी अनेक धागे होऊ नयेत म्हणून अन्य धाग्यातला मजकूर मूळ धाग्यात समाविष्ट करुन दुसरा धागा अप्रकाशित करत आहोत. -मिपा व्यवस्थापन स्त्रीसाठी सेक्स डॉल असते का ? पुरुषाला स्त्री सेक्स डॉल असते. यात हुबेहूब रबरी स्त्री असते, जिच्याशी सेक्स करता येतो. तसेच हुबेहूब पुरूष रबरी पुतळा असतो ज्यात ताठरता असलेले लिंग/डिल्डो असतो. योनिमार्गात प्रवेशित करून स्त्री 'विमन ऑन टॉप' या आसनात सेक्स करू शकते. हे डॉल २०० किलो पर्यंत वजन सहन करू शकते.

... अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट ✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख ✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज? ✪ ये शाम मस्तानी! ✪ मळभ हटताना ✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ✪ गरज फक्त सोबत देण्याची सर्वांना नमस्कार. नुकताच नागपूरमध्ये एक सुंदर अनुभव घेता आला. तो अनुभव व त्यासंदर्भात मनात आलेले विचार आपण सर्वांसोबत शेअर करावेसे वाटले. नागपूरमध्ये विशेष मुलांना भेटण्याचा योग आला. काही कामामुळे नागपूरला जाण्य़ाचा योग आला व तिथल्या परिचितांची भेट घेण्याचं ठरवलं. मनमंदिर नेटवर्कमुळे जोडल्या गेलेल्या मंडळींना भेटायची उत्सुकता होती.

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पाषाणभेद ·
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही. ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?

मला भेटलेले रुग्ण - २३

डॉ श्रीहास ·
https://misalpav.com/node/47104 “डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.” पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला. मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.” बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही? मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ? बाप : जी हॉं ! मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है। रिपोर्ट आल्यावर त्याला आणि मुलीला बोलावलं आणि सांगीतलं की रिपोर्ट नॉर्मल आहे. वर हे देखील सांगीतलं की तिला अस्थमा असता तरी सगळं आयुष्य चांगलंच जगता येईल.

पचनसंस्थेतील वायूनिर्मिती

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो. …………………………………………………………………………………. अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात.