मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

पुस्तक परिचय In service of the republic: The art and science of economic policy

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
In service of the republic: The art and science of economic policy, Penguin, 2022, Pages 500. लेखक – डॉ विजय केळकर आणि डॉ अजय शाह या वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि हल्लीच वाचून पूर्ण झालं. पुस्तकाच्या आधी लेखकांची थोडक्यात माहिती सांगतो. विजय केळकर आणि अजय शाह दोघेही सुरुवातीचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे नंतर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात आले. विजय केळकर यांनी केंद्र सरकारमध्ये अर्थ मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. श्री गिरीश कुबेर यांनी त्यांच्यावरील एक लेख लोकसत्ता दैनिकात नुकताच लिहिला होता.

एक आधुनिक सत्यनारायण कथा

माहितगार ·
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·
लेखनप्रकार
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

टर्मीनेटर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

आर्थिक नियोजनामागील विचार!

राघव ·
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही. --- आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही. एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे.

खचलेले शेजारी

सुधीर मुतालीक ·
लेखनप्रकार
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट

मदनबाण ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही. तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

hrkorde ·
लेखनप्रकार
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.