Skip to main content

आरोग्य

मनाचा पॉडकास्ट

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 21/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट. अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल. https://www.eplog.media/manachapodcast/

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

Once in a lifetime....!

लेखक डॉ श्रीहास यांनी शनिवार, 12/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 14/08/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला.

बट्ट्याबोळ-१

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 12/07/2020 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला.

मला भेटलेले रुग्ण - २२

लेखक डॉ श्रीहास यांनी रविवार, 28/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........

ओला कचरा निर्मूलन- इच्छा आणि त्रास

लेखक जेडी यांनी सोमवार, 08/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात सद्या महत्वाची समस्या म्हणजे घनकचरा आहे . अर्थातच कचरा निर्मूलन जिकिरीचे होऊन बसले आहे. आजकाल साफसफाई कामगारांना सोसायटीत वरच्या मजल्यावर प्रवेश नाही . रोज कचरा खाली नेवून टाकावा लागत आहे. बरेच लोक आता हे सर्व स्वतःच करत असले तरी प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून तशीच पिशवी टाकत आहेत . ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात जरी ओतली तरी निम्मा अर्धा ओला कचरा त्या पिशवीला चिकटून सुक्या कचरायच्या डब्यात जात आहे. खरे पाहता प्रत्येक घराने आपला ओला कचरा घरातच जिरवला पाहिजे, असे महापालिका सांगत आहे . अनेक ठिकाणी काही दिवस महापालिका कचरा उचलत नाही आणि घाणीचे साम्राज्य पसरते.

स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा - करोना माहात्म्य ||३||

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 09/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा
 
       करोना हे संकट अक्षरश: अभूतपूर्व असे आहे. यापूर्वी अशा तऱ्हेचे संकट देशावर कोसळले होते किंवा नाही हे सांगणे तसे अवघड आहे.