मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य

हे असे का असावं?

तमराज किल्विष ·
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही.

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

बाप्पू ·
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल?? काही लोक भटक्या तसेच पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात बुवा?? नाही..

औषधीय खरेदीत काटकसर

मिलिंद दि.भिड़े भिलाई ·
मिलिंद भिड़े,भिलाई नगर ज्या वाचकांना कुठल्या ही कारणा मुळे नियमित औषधोपचारा वर पैसे खर्च करावे लागतात त्यांच्या साठीच ही पोस्ट: जीव वाचवायाच्या साठी प्रत्येक माणूस वाटेल ते करायला तयार असतो। इतर वेळेस पैश्यांवर पालथी मारून बसलेला अति चिक्कू माणूस ही मरण समोर दिसताच पाण्या सारखा पैसा ओततो, हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल । एखाद्या डॉक्टर ने लिहिलेली औषधे, दुकान विशेष मध्ये खरेदी करणारे बहुतांश आहेत, तर काही लोक तीच औषधे क्रेडिट वर, कैश डिस्काउंट सकट घ्यायच्या प्रयत्नात नेहमी असतात ।तर काही लोक मार्केट रिसर्च करून औषधे विकत घेतात। ह्या मार्केट रिसर्चर्स च्या अनुभवाचा / ज्ञानाचा फायदा सगळ्यांनी

माझं "पलायन" ८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल

मार्गी ·
८: हाफ मॅरेथॉनच्या पुढची वाटचाल डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

बियर

सोन्या बागलाणकर ·
मूळ प्रेरणा: पाणी इतक्या बियरचे पेग बनवताना विचार करायचा भावा, शरीराला इतके झोके देताना उसंत घ्यायची भावा.... उसळून पुन्हा फेसाळते बियर बर्फ द्यायचा भावा... दोन पाय पुरत नाहीत बॉडीचा भार पेलताना... भावा, आता बार बंद करा अन् पिण्यातून मुक्ती द्या....

(जळवे)

नाखु ·
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित ********** हेच ते पिडणारे पळवे जळवे ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!! पाठिंबा वा संमती असती तर हे जळवे शक्तिने तांडून लगेच दृष्टी आड घालून विस्मृतीत टाकले असते... ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती... ना भोचक डोळे खुपसून (देत) न संपणार्या टिकेलासुद्धा सोसत राहिले असते.... ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते.... नाहीतर, माझ्या प्रिया, सगळ्यांना आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता, तर विधात्याचे काय जाते?

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३

युयुत्सु ·
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे. मागील भागाचा दुवा -http://aisiakshare.com/node/7041 (10)   प्राणायामात मेंदूत नक्की काय होते ?           सर्वसाधारण श्वसन हे अनैच्छिक असते आणि त्याचे नियंत्रण आयुष्यभर मेंदूतील एका छोट्या पेशीसमूहाकडून केले जाते. या पेशीसमूहाचा आकार काही मिलीमिटर इतका लहान असतो. त्यांचे कार्य काही वेळा औषधामुळे बदलू शकते. या पेशींना काही कारणाने धक्का बसला तर श्वसनक्रिया बंद पडते आणि मृत्यु येऊ शकतो.

दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार

vcdatrange ·
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.

प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? (१/३)

युयुत्सु ·
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग १/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे.  प्रत्येक माणूस दररोज २०,००० पेक्षा जास्त वेळा श्वास घेतो - म्हणून अमुक अमुक प्रकारे रोज काही मिनिटे श्वास घ्या, म्हणजे कॅन्सर बरा होऊ शकतो, हृदयरोग बरा होतो, मन:शांती वाढते, पुष्कळ रोग बरे होतात, असे जर कोणी सांगितले तर हा हास्यास्पद भोंदूपणा वाटतो - पण गमंत अशी आहे, की ह्यात पुष्कळसे तथ्य आहे. ही जादू कशी होते हे ह्या लेखावरून समजेल.