आमच्या मुलींचे पालक
आमच्या घरी हॉलमध्ये बर्यापैकी मोठ्या साइझचा एक फोटो आहे. मी, माझी पत्नी शुभदा आणि तिच्या हातात आठ महिन्यांची आमची कन्या पुनव. मूळ फोटो पंचवीस वर्षें जुना. एकदम ordinary.
आमची एक मानसकन्या देखील आहे. तिचं नाव दीपाली. तिच्याकडे हा जुना छोटासा धूसर फोटो होता. फोटोशॉप सॉफ्टवेअरची उत्तम माहिती आणि बरीच मेहनत यांच्या जोरावर तिनी या फोटोला नवजीवन दिलं, एनलार्ज केला, चांगल्या फ्रेममध्ये लावून एक महिन्यापूर्वी आम्हाला भेट दिला. अर्थातच आम्ही कौतुकानी तो हॉलमध्ये टेबलावर ठेवला.
आता उत्तरार्ध.