✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चोरून बघणे - आधुनिक पद्धत (शतशब्दकथा)

च
चांदणे संदीप यांनी
Wed, 04/06/2016 - 11:32  ·  लेख
लेख
परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला. "Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली! वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात? आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं! पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं. मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार." सम्याचा काय मेसेज आलाय आत्ता! बघूया......"आव्या, तुला शितलीचा भाऊ शोधतोय! :/ " - संदीप चांदणे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
कथा
विनोद
साहित्यिक
kathaa
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4689 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

लोल! शशक बरेच दिवसांनी

आदूबाळ
Wed, 04/06/2016 - 11:35 नवीन
लोल! शशक बरेच दिवसांनी वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments

खि खि खि :)

रातराणी
Wed, 04/06/2016 - 11:40 नवीन
खि खि खि :)
  • Log in or register to post comments

सुरेख हल्की फुलकी कथा...

विजय पुरोहित
Wed, 04/06/2016 - 11:44 नवीन
सुरेख हल्की फुलकी कथा...
  • Log in or register to post comments

हाहाहा!

एस
Wed, 04/06/2016 - 11:46 नवीन
हाहाहा!
  • Log in or register to post comments

तार्किकदृष्ट्या कथा जमली नाही

मराठी कथालेखक
Wed, 04/06/2016 - 12:30 नवीन
जर तिच्याकडे याचा नंबर आहे (आणि तशी याला खात्री आहे) , याच्याकडे तिचा नंबर आहे तर मग प्रोफाईल,डीपी बघण्याचे काय मोठे टेन्शन ?
  • Log in or register to post comments

तुम्हाला खात्री आहे?

चांदणे संदीप
Wed, 04/06/2016 - 12:38 नवीन
जर तिच्याकडे याचा नंबर आहे (आणि तशी याला खात्री आहे)
तुम्हाला खात्री आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

पुन्हा वाटलं, ती म्हणेल,

मराठी कथालेखक
Wed, 04/06/2016 - 13:25 नवीन
पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं
असं त्याला वाटतंय म्हणजे तिने त्याचा नंबर सेव्ह केलेला आहे असंच तो मानतोय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

चॅट विंडो येते आणि "Typing...

टवाळ कार्टा
Wed, 04/06/2016 - 13:02 नवीन
चॅट विंडो येते आणि "Typing..." असे दिसू शकते म्हणजे फ्रेंडलिस्टात आहे...म्हणजे तिच्या संमतीने तो तिच्या फ्रेंडलिस्टात आहे फ्रेंडलिस्टात असूनही मेसेज पाठवायचा नाही / कमेंट लिहायची नाही अथवा काही ठरावीकजणांनीच मेसेज करावा / कमेंट लिहावी अशी अपेक्षा??? मग फ्रेंडलिस्टात अ‍ॅडवले तरी कशाला???
"आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार."
तो = low self esteem ती = #$%@%$#@$#@...वरचा मेसेज पाहून डायरेक्ट भावाला सांगणे म्हणजे लैच रिकामे डोके =))
  • Log in or register to post comments

लैच्च राव...

चांदणे संदीप
Wed, 04/06/2016 - 13:30 नवीन
तो = low self esteem
यातच सगळ आलंय! :D (माझा जव्हेरगंज झालाय का?) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओ...असे अर्धवट वाचू नका

टवाळ कार्टा
Wed, 04/06/2016 - 13:37 नवीन
ओ...असे अर्धवट वाचू नका तो = low self esteem आणि ती = #$%@%$#@$#@...वरचा मेसेज पाहून डायरेक्ट भावाला सांगणे म्हणजे लैच रिकामे डोके =)) थोडक्यात फक्त तो नाही तर दोघेही नग आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

झेपलीच नाय. डीपी बगितला

भरत्_पलुसकर
Wed, 04/06/2016 - 13:22 नवीन
झेपलीच नाय. डीपी बगितला म्हणून भावाला सांगितल? लईच कडू ; )
  • Log in or register to post comments

भावाची भेट

नाखु
Wed, 04/06/2016 - 14:24 नवीन
दिनु गवळीशी घालून देणे. भुताच्या भीतीने भाउच काय शीतली पासून सुटका होईल याची खात्री ! ह का ना का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भरत्_पलुसकर

पुढचा भाग टाका...

उगा काहितरीच
Wed, 04/06/2016 - 13:48 नवीन
पुढचा भाग टाका...
  • Log in or register to post comments

परवा सहज तिच्या प्रोफाईलवर

जव्हेरगंज
Wed, 04/06/2016 - 22:04 नवीन
परवा सहज तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलेलं. नवा 'डीपी' आणि 'स्टेटस्' बघायला.
नवा डीपी? म्हणजे जुना बघितला होतात तर !
"Online" ह्या शब्दांतून जणू ती माझ्याकडे पाहतेय असंच वाटलं.... माझ्या हातापायातली शक्तीच गेली! वाटलं, तिने पाहिल असेन का? मी तिचं प्रोफाईल बघताना. तिला मी "Typing..." असा दिसलो असेन का? बापरे! आता कस भेटणार तिला कॉलेजात?
कसं भेटणार? म्हणजे भेट ठरली होती तर!
आरारा, ओशाळून कसनुसं हसलो नि हळूच 'ब्याकचं' बटण दाबलं!
आर्रर्र..तिच्या...! आसं झालं का? बरं मग..
पुन्हा वाटलं, ती म्हणेल, "Typing..." तर दिसलेलं, मग काहीच कस नाही लिहीलं.
लाखमोलाचा सवाल..! घामच फुटलाय बघा आमास्नीबी !
मग पुन्हा हिंमत करून तिच्या प्रोफाईलात गेलो आणि लिहिल... "आज पहिल्यांदाच तुझा डिपी आणि स्टेटस बघितलय ग.... आई शप्पथ!....परत नाही बघणार."
"ऑ लब्बाडा.. असं चोरुन चोरुन काय बघतो? खुल्लेआम बघ ना स्टेटस माझं" अश्या गरमागरम रिप्लायच्या प्रतिक्षेत... लवकर...लवकर..
सम्याचा काय मेसेज आलाय आत्ता! बघूया..... ."आव्या, तुला शितलीचा भाऊ शोधतोय! :/ "
बोंब ! खोबऱ्याचं तेल लावावं लागणार आता..! शोधा शोधा..! घाम फुटलाय आमास्नबी..!
  • Log in or register to post comments

तुमची

सिरुसेरि
गुरुवार, 04/07/2016 - 07:54 नवीन
तुमची ती " बाबा , तु आपिसला जाउ नको . तुला वाघ खातो" वाली गोष्ट भारी होती .
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/07/2016 - 08:59 नवीन
छान लिहिलय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा