ओळखले का?

राजू's picture
राजू in जनातलं, मनातलं
2 Apr 2016 - 12:05 am

"ए शुक शुक"

"ए अरे थांब"

अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते.

म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो.

आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते.

तर "ए" अशा एकेरी नावाने आवाज आल्यावर मी दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागतो तर आता मागून

"ए हॅलो!!! अरे थांब जरा."

अशी काहीशी अनपेक्षित हाक ऐकू येते आणि मी आश्चर्यचकित होऊन थांबतो.

साधारण ४० च्या घरातील एक व्यक्ती किंचित मळकट कपड्यात असलेली माझ्याकडे पाहून एका हातात भलीमोठी जड पिशवी व दुसऱ्या हाताने मला थांबायचा इशारा करत भरभर चालत येते आणि जवळ येताच हातातील पिशवी खाली ठेवून खिशातून रुमाल काढत कपाळावरील घाम पुसत मला म्हणाते....

"का रे ओळखले नाहीस का?"

जगात मी ३ गोष्टींना खूप घाबरतो आता तसा मी बऱ्याच गोष्टींना घाबरत असतो पण आता ३ गोष्टीच विचारात घेऊया.

हां तर काय म्हणत होतो तर मी जगात ३ गोष्टींना खूप घाबरतो ...

१) मी नेमका गडबडीत असतो मोबाईलवर रिंग वाजते स्क्रिनवर अनोळखी नंबर येतो जरासा विचार करून मी फोन घेतो आणि समोरून आवाज येतो "हॅलो ओळखले का मी कोण बोलतोय.?"

२)बायको बरोबर तिच्या माहेरच्या एखाद्या कार्यक्रमात गेलेलो असतो माझ्या सारख्याच चुकलेल्या एखाद ४-५ जावयांबरोबर थोड्याशा गप्पा सुरु असतात आणि अचानक एखादी वयस्कर व्यक्ती समोर येते आणि आमच्याकडे पाहून बोलते ...
"नमस्कार पाव्हणं वळखलं का नाय?" आता ते नेमके कोणाला बोलले हे न कळाल्याने एकाच बॉल मध्ये आमच्या ४-५ जणांच्या विकेट पडतात.

३) कोठेही अगदी कोठेही तुम्ही विचारही करू शकत नाही अशा ठिकाणी एखादी व्यक्ती भेटते आणि चक्क माझे नाव घेत बोलते..
"काय राजु ओळखले कि नाही?"

आई शप्पथ !!! अशा वेळी मी टोटल ब्लँक होतो. हो नाहीतर काय एकतर मी वेगळ्याच विचारात असतो. आणि अचानक जर कोणी असे विचारले तर काहीच लिंक लागत नाही कारण एकतर साधारणपणे १०वी-१२ वी नंतर म्हणजे वय वर्ष १६-१८ व्या वर्षा नंतर माझ्यात जो काही बदल झाला आहे त्यातल्या त्यात वयाच्या ३२-३४ व्या वर्षी जो काही फार मोठा बदल झाला आहे.त्यातही मला ओळखणारा कोणी भेटला कि माझ्या मनात त्याच्या विषयी प्रचंड आदर वाढलेला असतो आणि मी समोरच्याला ओळखू शकत नसल्याने स्वतःवर अतीप्रचंड चिडलेला असतो.

आणि समोरचा तर चक्क युगे अठ्ठावीस उभा विटेवरी मधिल पांडुरंगा सारखा कमरेवर हाथ ठेवून उभा असतो.आणि मी समोरच्याकडे तो मंगळ ग्रहावरचा एखादा एलियन आहे अशा प्रकारे पहात असतो.

समोरचा मात्र माझी कसलीही अवस्था झालेली असली तरी किव न करता "ओळख पाहू?" हे कोडे नव्हे सापशिडीचा पट मांडून उभा असतो.आणि मी बिचारा त्या सापशिडीच्या खेळात बालपणापासून म्हणजे अगदी बालवाडी पासून आत्ता परवा झालेल्या नविन ओळखी पर्यंत सगळ्या झालेल्या ओळखीच्या शिड्या चढत असतो आणि प्रत्येक वेळी समोरच्याचा अनोळखी चेहरा सापासारखा मला परत आहे त्या ठिकाणी आणत असतो.

आता जवळ जवळ १०-१५ मिनिटे झालेली असतात काल परवा झालेल्या नविन ओळखीपर्यंत हा समोरचा एलियन सॉरी..सॉरी.. मनुष्य काही माझ्या लक्षात येत नाही त्यामुळे मी सपशेल हार मानलेली असते आणि तसे नाखुषीनेच मी कबूल करणार तेवढ्यात समोरचा तो सापशिडीतल्या सापासदृश्य मनुष्य मला एका वेगळ्याच नावाने आवाज देतो.

क्षणभर त्याने उच्चारलेले नाव माझेच असू शकते असे मनात येते पण माझा चेहरा मात्र अजूनही गोंधळलेला पाहून आता समोरचा सुद्धा थोडासा गोंधळतो आणि परत त्या नावाचा उच्चार करतो.पण मी मात्र तसाच उभा असलेला पाहून मात्र समोरचा जास्तच गडबडतो.

तिसऱ्यांदा जेंव्हा तो ते अनोळखी नावाने मला ओळख दाखवतो तेंव्हा माझी खात्री होते कि समोरच्याची काहितरी गफलत झाली आहे आणि तो आपल्याला दुसराच कोणीतरी समजला आहे.

हे त्याच्याही लक्षात येते क्षणभर आम्ही दोघेही एकमेकांकडे अवघडल्यासारखे पहात राहतो मग अचानक तो हात पुढे करत म्हणतो

"सॉरी हं मी तुम्हाला तो अमका तमका समजलो होतो.सॉरी ...रिअली वेरी सॉरी."

हुश्श!!!

एकदाचे मनावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटते आणि मी सुद्धा त्याच्या हातात हात देत

"इट्स ओके होते असे कधी कधी.''

म्हणतो आणि आम्ही दोघेही आता एकमेकांना खूप जुने मित्र असल्या सारखे बाय बाय करतो व आपापल्या मार्गाला निघतो.

आता मी थोडेसे अंतर पुढे येताच मागून एका महिलेचा नाजूक आवाज येतो..

"अहो..अहो ऐकता का?"

मी मागे वळून पहातो तर एक अनोळखी मध्यमवयिन सुंदर महिला मला थांबवत घाई घाईने माझ्या जवळ येते आणि म्हणते...

" ओळखले का?"

©राजू सोपान लोंढे.

कथामुक्तकभाषाविनोदkathaaमौजमजाआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

2 Apr 2016 - 12:11 am | श्रीरंग_जोशी

खुमासदार शैलीतलं मुक्तक आवडलं.

फोनवर ओळखलं का असं अचानक विचारण्याच्या सवयीचा लै तिटकारा वाटतो :-) .

राजू's picture

2 Apr 2016 - 12:18 am | राजू

धन्यवाद.

विद्यार्थी's picture

2 Apr 2016 - 12:32 am | विद्यार्थी

लेखाचा शेवट लई ग्वाड केला राव तुमी!

मस्त, मजा आली वाचून :-)

राजू's picture

2 Apr 2016 - 7:57 am | राजू

धन्यवाद

लेखन आवडले पण तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही.

राजू's picture

2 Apr 2016 - 9:22 am | राजू
राजू's picture

2 Apr 2016 - 9:30 am | राजू
उगा काहितरीच's picture

2 Apr 2016 - 12:56 am | उगा काहितरीच

"अरे असं काय करतो पुरूषोत्तम ?....."
#हरीतात्या

जयन्त बा शिम्पि's picture

2 Apr 2016 - 7:49 am | जयन्त बा शिम्पि

समक्ष भेट झाल्यावर " काय , ओळखले का ? " असा प्रश्न विचारल्यावर मी , स्मरणशक्तिला थोडा ताण देवून पहातो ( दोन चार सेकंदच !! ) आणि चक्क कबुली देवुन टाकतो की " नाही ब्बा , नाही लक्षात येत , कारण मधल्या काळात काही सम्पर्क नव्हता ना ! " . कारण काही लोकांना असे मनोमन वाटते की आपल्याला सारे जगच ओळखते. त्यांना असे का वाटते कोणास ठावूक ?
मोबाईल वर अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला की सहसा मी तो घेतच नाही. जर पुन्हा कॉल आला तर आवाजावरून ओळखण्याचा प्रयत्न करतो, नाही जमले तर " अरे , जरा रेन्ज नव्हती ना , म्हणुन ओळखता आले नाही " अशी चक्क कबूली देवुन टाकतो.
एका पुस्तकात मी वाचले होते कि यावर एक सोपा उपाय आहे , तो म्हणजे , फोनवर " ओळखले का ? " असा प्रश्न विचारला कि सरळ पुढीलप्रमाणे उत्तर द्यावे , ( व्यक्ती पुरुष असल्यास ) " व्वा , ओळखले ना , महंमद रफी " आणि ( व्यक्ती स्री असल्यास ) " व्वा , ओळखले ना , लता मंगेशकर " ! !

राजू's picture

2 Apr 2016 - 7:55 am | राजू

हे मात्र एकदम मस्त.

किंवा मग, "नाही मी "ओळखले" नाही, मी <तुमचे आडनाव>"

अत्रे's picture

2 Apr 2016 - 9:20 am | अत्रे

नाही मी "ओळखले" नाही, मी (तुमचे आडनाव)"

(आधीच्या प्रतिसादात < > कंस वापरले तर शब्द्च गायब झाले)

स्पा's picture

2 Apr 2016 - 8:13 am | स्पा

सही लिहिलय

नाखु's picture

2 Apr 2016 - 9:12 am | नाखु

असं फोनवर ओळखलं का म्हणणार्यांना एक्दा दिलेला टोला आठवला

(साल २०१२) हाफीसात मार्चअखेरच्या कामात मी गळ्यापर्यंत बुडालेलो. एकाच वेळी दोन-तीन अर्धवट राहिलेल्या कामांचा उरक. अश्या वेळी अनोळखी नंबर वरून फोन. असले फोन मी सहसा घेत नाही (सगळ्या बँक्,ईंन्श्युरण्स्वाल्याना नेमके माझे नंबर कुठुन मिळतात हे शोधायला बोका भाऊंना सांगायचे आहे) सतत ५-७ वेळा फोन. मी नाईलाजाने फोन घेतो आणि:

अ.आ. (अनोळखी अनाहुत्):तुम्ही अमुक तमुक का?
मी : हो आपण कोण ?
अ.आ.:अरे ओऴ़्खलं का नाही?
मी : नाही कोण नाव सांगा?
अ.आ.: बस्सका आम्ही नंबर मिळवून तुम्हाला फोन करायचा आठवणीनं आणि तुम्ही ओळखायचं नाही.
मी: अत्ता कामात आहे मी निवांत बोलू नंतर (अटोकाट चिडण्यावर नियंत्रण ठेवत, घरी असतो तर जरा आवाज तरी वाढवता आला असता)
अ.आ.:माहीतीय आम्ही पण हाफीसात जातो आम्हाला पण कामं असतात पण दोस्तीसमोर. ते जाऊदे कोण आहे सांग?
मी:मनात (च्यायला मला हा कोण याची टोटल लागेना आणि हा थेट अरे तुरे करतोय नक्की कोण?) नाही लक्श्यात कोण सांगा.(तरीही विनाकारण आदरार्थी संबोधून) बरोबर काम करणारे सहकारी तो पर्यंत एकमेकांचे तोंडाकडे आणि माझ्या कडे पहात (हसू लपवतायत) असे मला वाटू लागले.
अ.आ.:नाही तरी सांग. तु मित्रांना लक्श्यात ठेवले का नाही ते तरी कळेल.
मी:खरंच माहीत नाही नाव सांगा नाही तर मी ठेवतो.(अता इतका किल्ला लढवलाय थोड्यासाठी का बंद करायचा हा अंदाज घेऊन)
अ.आ.:बरोबर आहे आम्हा गरीबांना कसे लक्ष्यात ठेवणारं तुम्ही , मोठे लोक ना. (उठसुठ गरीब म्हणून घेणार्यांवर सरकार एखादा दंड का लावत नाही असा हिंस्त्र विचार माझ्या मनात नेहमी येतो)

मी: अच्छा म्हणजे रंग्काम साठी पाठवायचं.
अ.आ.:नाही मी (मी मध्येच त्याला तोडत)बाथरूमचे लिकेजसाठी तो का?
अ.आ.:नाही मी (मी मध्येच त्याला तोडत)मित्राच्या कंपनी कॅजुअल लेबर भरती चालू आहे त्या साठी तुमच्म नाव कळवायचं आहे ना? कळवतो
अ.आ.:नाही मी(मी मध्येच त्याला तोडत)गॅस शेगडी रिपेअर साठी? नाही ते काम झालेय.
अ.आ.:नाही मी(मी मध्येच त्याला तोडत)मुलाची पत्रिका दिलीय ना त्याच्या साठी बघतोय स्थळ अता फक्त दहाव्वी पासला थोडीच लगेच मिळणार है मुलगी.
अ.आ.:नाही मी(मी मध्येच त्याला तोडत)क्म्पनीतल बाईंडींगच काम असेल तर आधीच दिलयं पुढच्या वर्षी बघू.
अ.आ.:नाही मी (अगदी काकुळतीने) मी (मी मध्येच त्याला तोडत) हो घरच्म पेष्ट कंट्रोलचं काम द्यायच पण इतकयात नाही. नंतर निवांत फोन करा.
अ.आ.:नाही मी (अगदी काकुळतीने) मी फोन बंद केला.

नंतर सुमारे १०-१५ दिवसांनी जुन्या कंपनीतला सहकारी भेटला त्याने मला विचारले अरे अमुक तमुकचा फोन आला होता का? मी विचारले कश्या संदर्भात अरे कसली तरी क्लब मेंबरर्शिप साठी सध्या त्याने आपल्या कंपनीतून घेतलेत आणि कालच मला @@चा फोन आला की ह्याचा फोन घेऊ नको म्हणून . फक्त दोन-तीन महिन्यासाठी डाटा इंण्ट्री साठी येणार्या कंपनीतील मध्यमवयीन इसमाने हे नंबर मिळवले होते.(आणि हीच संभाषण पद्धत वापरून अगदी सलगी /ओळख असल्याचा आव आणला होता)

मीही लगेच माझ्या इतर सहकार्यांना कळवले.

पण त्या ओळखा पाहू खेळाने ताण-निचरा होऊन पुन्हा ताजा तवाना झालो खरा.

राजू's picture

2 Apr 2016 - 9:28 am | राजू

आता कोणी "ओळखले का?" असे विचारले कि हा फॉर्म्युला वापरतो.

वा.. मस्त सर्वांच्या मनातलं शब्दात पकडलंत हो राजूशेट.

राजू's picture

2 Apr 2016 - 9:29 am | राजू

धन्यवाद.