(छटाक) नंतर

Primary tabs

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
3 Apr 2016 - 11:45 am

पुर्वार्ध

आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.

काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!

या भागत तोच मिवा नेमका मिपा सामार्ज्याची रंगपचमी निमित्त सफर करायचा मनसुबा जाहीर करतो आणि मग तो मिसा बरोबर साम्राज्यात दाखल होतो. मिवा ने सांगिअत्लेले असते तू कुणाचीही ओळ्ख करून देऊ नको,मीच सांगेन कोण काय आहे आणि काय लिहिले आहे.

आरोग्यदायी सूचना : गुढी पाडव्यानिमित्त कडुनिंबाचे फुल-पाना सोबत गुळाचा नैवेद्य जसा भक्षण करायचा तसा हा धागा आस्वादा, गुळ तर पाहिजेच गोडीला पण कडुनिंबाने पचनशक्ती सुधारते आणि त्वचाविकारही होत नाहीत.

आधीचा भाग नाट्यछ्टा स्वरूपात हाताळला होता,आणि हाही तसाच हाताळला आहे पण मध्ये मध्ये (अपरिहार्यपणे संवादी) टाकावा लागला त्या बद्दल आणि मैत्री खातर एकेरी उल्लेख क्षमाप्रार्थी. अभ्या शेठ यांचे विशेष कौतुक त्यांच्या धाग्यातीलचित्राने आणि धाग्यातील प्रतिक्रियांनी मी योग्य मार्गावर असल्याची हमी-हुरुप-प्रोत्साहन मिळाले

*************************************************************
तर तू काय म्हणतो मला मिसा माहीत नाहीत चल आजच जाऊ साम्राज्यात, अरे मिपा वाचकांना काय भोळे-अडाणी समजता तुम्ही साहीत्यीक. अरे नसेल आमच्या चार ओळी टंकून येत कुठे? आम्ही प्रतिसादापुरतेच कुठे दिसत असू म्हणून आम्ही अज्ञानी ??

हे घे साक्षात संस्थळ संस्थापक काय म्हणालेत ते :

यात आमचे थोडेफर श्रेय आम्ही नाकारत नाही, परंतु यात प्रामुख्याने मायबाप मिपाकरभुतांचेच श्रेय सर्वाधिक आहे याची आम्हाला विनम्र जाणीव आहे! त्यांच्या उत्तमोत्तम लिहिण्यामुळेच आपल्या सर्वांना चांगल्याचुंगल्या वाचनाचा आनंद मिळतो!

मिपाकर आहेत म्हणून मिसळपाव आहे! शाळेची इमारत कितीही सुंदर, सुरेख, आखीव-रेखीव, असली तरी संध्याकाळी ६ वाजता शाळा सुटून मुलं आपापल्या घरी गेल्यावर ती शाळेची इमारत कितीही सुंदर असली तरी केवळ भयाण दिसू लागते!

मिपाचंही तसंच आहे. तात्यावेताळ केवळ नाममात्र आहे. मिपाला शोभा आहे ती केवळ अन् केवळ येथे नांदत्या-गाजत्या मिपाकरांमुळेच!

तर हे बघ बोलता बोलता आलेच आपले मिपा आणि हो होडी नीट बाजूला लाव नाहीतर काही चाणाक्ष आपल्या होडीबरोबर लावतील आणि लोकांना तू त्यांच्याच कंपूतला आहेस असा देखावा उभा करतील. अगदी जपून पावले टाकयची गरज नाही पण अगदी वाजवीपेक्षा जास्त रेंगाळत चालू नको. हा बघ आलाच दरवाजा,आणि ही पहा गर्दी प्रवेशासाठी, काय म्हणालास? त्या एकाच माणसाकडे दोन तीन कपड्यावर कपडे आणि टोप्या का घातल्यात ते ? अरे एका नावाने नाही अवतार टिकला तर दुसरा असं करून मिपावर कार्यरत राहणे आवश्यक आहे रे बाबा. एकवेळ राहणेची खात्री देता येणार नाही आप्ल्या संघातल्या प्रवेशाची पण यांचे राहणे अगदी नक्की !"

"अरे संपादकांना कसे कळेल नवीन अवताराबाबत तीही माणसंच रे आपल्या सारखी, प्रपंच संभाळून ह्या लषकरच्या भाकरी भाजातायत, ते कुठे कुठे लक्ष्य देणार?

आणि हे बघ आत आलोय ते माझ्या ओळखप्त्रावर तुझ्या नाही, तेव्हा तू काळजी करू नको. मी आलोय आपल्या मर्जीने आणि जाईलही आप्ल्या मर्जीने अरे वाचक म्हणजे वाचकच त्याच्यावर कारवाई करण्याची वेळच तो येऊ देत नाही.

हे बघ झेंडेवाले आता यांच्याकडे काय काय आहे बघायचं नाही मी नाही सांगत इथं वाच तूच आणि खात्री करून घे.

लावाच!! पाचेक महिन्यातनं एकदा
सूड - Thu, 12/03/2015 - 15:13
लावाच!! पाचेक महिन्यातनं एकदा तरी हा विषय उचल खातोच. वाया म्हणून जायचं नाही काही.

अगदीच नाही तर शाकाहारी-मांसाहारी, लग्नाळू-बिनलग्नाळू, स्त्रीसमानतावादी-द्वेष्टे, मध्यवर्ती-विनामध्यवर्ती ठिकाणे, काटाकिर्र बरी की मामलेदार, ब्राह्मण-ब्राह्मणेतर , सकच्छ-विकच्छ वस्त्रे यासारख्या कुठल्याही विषयावर सहज खप होईल.

आणि उठसुट पुण्यावर/हिंदुत्वार्/देशप्रेमावर्/बाह्मणांवर्/मिपावर/अनिवासी/शाकाहारींवर प्रेम दाखवणार्या महाभागांचा सत्कार अस्सल मिपाकराने केलाय पुर्वीच केला आहे.

अता कळालं ना यांना वाद-विवादासाठी विषय शोधीत नाहीत तर आहे त्या विषयातच वाद-विवाद शोधतात

.

चल पुढे त्या तजो,पुरोहित,नाना स्कॉच,डेड्पूल्,साहना यांना लाबूनच नमस्कार कर ते पुढच्या सामन्याची तयारी करतायत.

आणि हे कोण म्हणालास? मी काय ओळखत नाही का हातात भिंग्,कमरेला दुर्बीण आणि खांद्यावरच्या शबनमम्ध्ये शास्त्र काय सांगतेच्या सहा पोथ्या. त्यांना मी ओळखणार नाही अरे हे तर आपले संस्कृती रक्षक काका . ते भिंगातून लक्ष्य ठेऊन आहेत तुझ्याकडे तेव्हा त्यांच्या संस्कृतीलाच काय पण प्रकृतीला धक्का पोहोचेल असे काही बोलू नकोस. नमस्कार कर त्यांना. बघ त्यांनी पण नमस्कार केलाच की नाही तुला? चांगलही लिहितात ते पण सुरवातीची प्रतिमा काही पुसता येईना त्यांना.

चल पूढे ये हे एक माणुस वर बसून काही तरी सांगतोय आणि बाकीचे खाली बसलेत ते नाही नाही प्रवचन नाहीय ते. काव्य संमेलन असावे बघ ही बघ यादी.

गणेश पालवे
आनंदमयी
विदेश

अता ही लोक आपला धागा सोडून कुठे फिरकलेत का ते? नाही म्हणजे त्यांच लिखाण सोडून दुसरं काही वाचण्यासारखं आणि दाद देण्यासारखं असतं असं त्यांना वाटतच नाही. इतकं का रे मिपाला साहित्य वनवास आहे? यांना आणि जुन्या लोकप्रिय कवींना पण विनंती जरा या महाभागांकडे पहा

चाणक्य
डॉ. सुनील अहिरराव
रातराणी

दुसर्याला दिलखुलास दाद द्याययला आणि वाचायचाही अजिबात कंटाळा करीत नाहीत ही मंडळी.

अगदी गेला बाजार एकही धागा न टाकता मोजके का होईना गुणग्राहकता+प्रतिसाद देणार्या वर्गाचं प्रतिनिधीत्व करणारा हा आय डी पहा.

आणी हो तो कोपर्यात उभा आहे ना तो त्रिशतकी धाग्यांचा सरदार आहे.माम्लेदारचा पन्खा
एकूण धागे ४२ त्यातील एक ४५६ प्रतीसादी तर दुसरा ३१६ शिवाय शतकोत्तर धागे २ पन्नाशी गाठलेले आणखी ७ म्हणजे पहा आहे का नाही सिद्ध हस्त लेखक आणि तोही इतरांच्या धाग्यावर प्रतीसाद देतो, अजून पक्का हुच्च भ्रू आणि हस्तीदंती झाला नाही पुरेसा. म्हणूनच इतरांचही वाचतोय आणि प्रतिसादही देतो.(मांप रागवू नकोरे या वाचकावर)

हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.

बर मग असं नाही की फक्त कवीगणच स्वतःच्या पाठ थोपटून घ्यायच्या विश्वात मशगुल असतात, ही बघ वेगवेगळ्या दगडावजा झाडाच्या पारावर बसलेली स्व तंत्र संस्थाने.

निळकंठ दशरथ गोरे
dorugaDe
shawshanky
सशुश्रीके
निमिष सोनार

आणि तजोंनी दाखवलेला आरसा
तजो बहुरंगी आयडी आहे पण वाद विवादात फारच शक्ती खर्च करतोय का काय असे मला वाटते तुला काय वाटते?

आणि हे बघ सोनार सगळ्यांचे कान टोचतो इथे सा़क्षात सोनाराचेच टोचले कान

हे ज्यांनी टोचलेत तो तिथे झाडापलिकडे खडकावर उभा आहे बघ, कॅमेर्याला डोळा लावून . कुठे बघतोय असं का विचारतोस. अरे कवीला कवीता कश्या होतात आणि या फोटोवाल्यांना कॅमेर्यातून काय पाहताय रे असं विचारू नये. आणि फार वेळ त्याच्याकडे बघू नकोस. कुठल्याही क्षणी बुवा तुला पकडतील त्याच्याकडे बघताना.

चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.

काय त्यांना कशाला मोठ्याने विचारले सूड कुठेय ते? बघ आलेच सूडपंत.
"काय झाला का व्यायाम क्षमा करा एक्सर्साईज म्हणायचे होते मला."
"तुम्ही लोक मध्ये येऊन माझे मला व्य्त्यय आणता आणि वर विचारता? आधी त्या बॅट्याचे दोन कॉल, नंतर या सग्याची हाक, नंतर वेल्लाचे कयप्पावरचे अप्डेट तीन चार वेळा माझ्या पुश-अप गणतीत विघ्न नुसती? चल पहिल्या पसून सुरु करतो. आणि या खुळ्याच्या फार नादी लागू नकोस.
*****
"काय म्हणालास हा सल्ला सूडोबांनी तुला दिला का मला ? काय ठाउक चल पुढे.तुला वाटेल नुसत्या हाणामार्याच वाचतो आम्ही मिपावर हे बघ काही चांगल्या चर्चाही होतात पक्षीय जोडे बाहेर ठेऊन .

ते बघ एक मनुष्य खिडकी-दिंडीतून येऊन काही तरी भिंतीवर चिटकवून गेला बघ. चल जाऊन बघू काय आहे ते. अरे क्षुब्ध कवीता टाकलीय इथे. अरे हे तर आप्ले लाडके लेखक गंगाधर मुटे सर

काय म्हणालास चिटकवून ते लगेच घाईने का चाललेत परत ? जा तुला विचारयचे तर विचार त्यांना ?

मी : नमस्कार सर इतक्या घाईत कवीता टाकून लगेच चाललात. जरा थांबून पहाकी कोण कोण वाचतयं ते आणि जरा दुसर्या दालनातपण चक्कर टाका ना जरा .
सरः नाही माझ्यकडे अजिबात वेळ नाही. संघटनेची बरीच कामं पेंडीग आहेत. आणि दुसर्याच का म्हणून वाचायचं आम्ही? सांग मला वर्षानुवर्षे तुम्ही आम्हाला वाचायलाच लावलं की तुम्ही लिहिलेलं. आता आम्ही कुणाचही वाचणार्/ऐकणार्/पाहणार नाही. तसा वसाच घेतलाय आम्ही, म्हणजे नाही नाही फक्त मी.
मी:पण सर तुमच्या मित्रानी तरी चांगल काम केलं असेल की. सांगा त्यांनी तरी काय केलं
सर : हे पहा मला माहीत आहे का नाही त्यांनी काय केलं ते पण अत्ताचे सरकार आम्च्या विरोधातले आहे हे पक्के.
मी : सर पण तरी तुम्ही प्राध्यापक आहात म्हणून तरी सु संवाद....
सरः नाही रे चांगल काहीच नाही चाललयं या राज्यातही आणि या सरकारातही .... नंतर बोलतो अता फोन येतोय बारामतीवरून ..चल निघतो मी.
*****
जाण ते नेते रे बाबा जाणते नेते नव्हे !

तू आप्ला पुढे चल. यांना नमस्कार कर लेण्याचा अभ्यास कम वेड असलेला मनुष्य आहे, त्याच्या पलिकडे बोकाभाउ. काय म्हणतोस दोघे अंगापिंडाने एक सारखे दिसतात त्याने गोंधळ होतोय. आरे जे लेण्याचा फेर फटका करवतात ते वल्ली आणि जे बेण्यांचा हेरफटका करवतात ते बोकेशभाऊ. त्यांना पण नमस्कार कर.

चल आता उशीर झालाय जरा विश्रांती घेऊ (काही पोटपुजा ) नको का करायला.
=============================
यापूर्वी व यानंतर कुठेही प्रकाशीत नाही.
नावे व व्यक्ती खरे असल्यास निव्व्ळ जोगायोग समजावा.
हे लिखाण "बिनबियांच्या कथा" या योजने अंतर्गत आहेत.
खुलासा संपला
आवडला तरच पुढचा भाग अनियतकालाने

इतिहासमुक्तकविनोदसाहित्यिकसमाजऔषधोपचारसामुद्रिकमौजमजाप्रकटनशुभेच्छाआस्वादसमीक्षाअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

दिग्विजय भोसले's picture

3 Apr 2016 - 12:00 pm | दिग्विजय भोसले

मिपावरील आयडींसंदर्भात काहीतरी आहे,मी नवीन असल्यामुळे फार काही उमगलं नाही,पण उमगेल हळूहळू.
बाकि आरोग्यदायी सूचना खवचट आहे.

टवाळ कार्टा's picture

3 Apr 2016 - 12:46 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

चल हे सर आहेत ना पुस्तकांच्या थप्पीशेजारी बसलेले, अध्यात्माचा अभ्यास असलेले आणि काय मनोव्यापाचा मोठ्ठा अभ्यास आहे त्यांचा. नमस्कार कर त्यांना. बघ पाहिले की नाही त्यांनी तुझ्याकडे?जुना मिपाकर असूनही नव्यांशीही आवर्जून ओळख ठेवणारा भला इसम रे तो.आणि लोकगीतांवरही चांगले धागे आहेत त रे त्याचे.

हे सर सध्ध्या लोकसंगिताकडे दुर्लक्ष करत आहेत ओ

विजय पुरोहित's picture

3 Apr 2016 - 12:47 pm | विजय पुरोहित

वा! पेशल नाखुस्टाईल मध्ये झकास सफर घडली...

विजय पुरोहित's picture

3 Apr 2016 - 12:51 pm | विजय पुरोहित

तुडतुडी, डांगे अण्णा, प्यारे, दत्ता जोशी या आयडींची आठवण आली...
त्यांना पुन्हा मिपावर सामील होण्याची विनंती...

एस's picture

3 Apr 2016 - 12:52 pm | एस

:-)

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 1:00 pm | तर्राट जोकर

अरारारा रारा..... बाजार उटिवला नाखुकाका. हैला लय भारी लिवलं. काय ते सुक्ष्म निरिक्षण आणि अनाघात चिमटे. ब्बाब्बा. मजा आली.

प्रचेतस's picture

4 Apr 2016 - 8:38 am | प्रचेतस

खी खी खी.
लय भारी.
येउ द्या पुढला भाग लवकरच.

रातराणी's picture

4 Apr 2016 - 10:01 am | रातराणी

केवढा तो अभ्यास! :)
आमची गरीबाची आठवण काढल्याबद्दल ठेन्कु बरं का! _/\_

चाणक्य's picture

4 Apr 2016 - 5:16 pm | चाणक्य

हाहा. असेच म्हणतो.
बाकी लिखाण एकदम दिवाळीतल्या भाजणीच्या चकलीसारखे खुसखुशीत.

जाण ते नेते रे बाबा जाणते नेते नव्हे !

:))

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2016 - 10:59 am | अत्रुप्त आत्मा

हहीह्हीहही!

अभ्या..'s picture

4 Apr 2016 - 11:29 am | अभ्या..

हिहीही.
नाखून्स अजून किती जणांना कुरवाळतेत का ओचकारतेत बघू.

मृत्युन्जय's picture

4 Apr 2016 - 5:51 pm | मृत्युन्जय

नाखुकाका आयडींणा कुरवाळतायत की बोचकारताहेत हेच अजुन कळालेले नाही,

बोका-ए-आझम's picture

4 Apr 2016 - 7:13 pm | बोका-ए-आझम

नाखु नव्हे. ;)

सस्नेह's picture

4 Apr 2016 - 11:47 am | सस्नेह

=))

आमची आठवण ठेवली
धन्यवाद

भारी, नाखुकाका! ठणठणपाळला काकांनी टफ फैट दिली असती!

एक एकटा एकटाच's picture

5 Apr 2016 - 9:21 am | एक एकटा एकटाच

हा हा हा

यशोधरा's picture

5 Apr 2016 - 9:25 am | यशोधरा

हीहीही!

नीलमोहर's picture

5 Apr 2016 - 1:08 pm | नीलमोहर

भारी !!

हा चिनार्या नमस्कार रे बाबा लक्ष्य असू दे वाचकांवर ! काय म्हणतोस यांना ओळखतो बघा मिसा तुम्हाला पण ओळ्खतोय माझ्या मुळे ! खुळा नाद रे टीआरपी चा. सोड तो तू.

माझा आय डी 'उल्लेखनीय' समजल्या बाबत धन्यवाद काका !