गीताई माऊली माझी...
आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. गंमत म्हणजे आईच्या प्रेमापोटी गीता मराठीत आणली पण त्याच गीतेस पण आई समजत त्यांनी सुरवातीस एक चांगला श्लोक लिहीला आहे:
गीताई माऊली माझी |
तिचा मी बाळ नेणता |
पडता रडता घेई, उचलूनी कडेवरी ||