दैवी आवाजाचे गायक - येशुदास!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
10 Jan 2018 - 7:50 am

Yesudas

कट्टासेरी जोसेफ येशुदास अर्थात पद्मविभुषण डॉ. K. J. येशुदास यांचा आज ७८ वा वाढदिवस!
पूर्वीच्या कोचीन प्रांतात म्हणजेच सध्याच्या केरळमधे १० जानेवारी १९४० रोजी एका ख्रिश्चन कुटूंबात येशुदास यांचा जन्म झाला.आपलं संगीतविषयक शिक्षण तिरुअनंतपुरमच्या स्वाती तिरुनाल संगीत महाविद्यालयातून पूर्ण करुन ६० च्या दशकात त्यांनी सिनेक्षेत्रासाठी गायला सुरुवात केली.
मल्याळम सोबतच त्यांनी तमिळ,कन्नड,तेलुगू,मराठी,बंगाली,हिंदी,अरबी,रशियन अशा विविध भाषांमधून जवळपास ७०००० गाणी गायली आहेत.त्यांनी काही सिनेमांत पडद्यावर पाहुणा कलाकार म्हणूनही काम केलंय.
येशुदास यांचा आवाज दैवी आहे हे केवळ त्यांच्या गोड,मुग्धमधूर आवाजासाठी म्हटलेलं नाही तर त्यांनी गायलेली भक्तीगीतं बर्‍याच लोकांसाठी खरोखरंच दैवी अनुभूती आणि मन:शांती देणारी ठरली आहेत.श्रीकृष्ण आणि अय्यप्पा या केरळच्या आवडत्या हिंदू दैवतांची अनेक प्रसिध्द भक्तीगीतं ही येशुदास यांनी गायली आहेत.
शबरीमलैच्या अय्यप्पा मंदिराचे दरवाजे सायंकाळी बंद करण्यापूर्वी 'हरीवरसनम्' हे येशुदास यांच्या आवाजातील भजन दररोज ऐकवण्याचा नित्यक्रम बरीच वर्षे सुरु आहे.इतर अनेक गायकांनी हे भजन गायलेलं असूनही येशुदास यांचंच गाणं अधिकृतरित्या मंदिराकडून वाजवलं जातं.येशुदास यांची कर्नाटकातील कोल्लूर येथील मुकांबिका देवीवर खुप श्रध्दा आहे.इ.स. २००० पासून ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस या मंदिरात गाणं गाऊनच साजरा करतात.केरळमधील बर्‍याचशा मंदिरांमधे केवळ हिंदूंनाच प्रवेश आहे.त्या पार्श्वभूमीवर येशुदास यांच्या दैवी आवाजानं केलेलं गारुड सगळे नियम शिथिल करुन अनेक वर्षं भक्तांना आनंद देत आलेलं आहे.

देशात केरळ आणि विदेशात भारतीय सांगीतिक सांस्कृतीचं प्रतिक म्हणूनही त्यांना अोळखलं जातं.

१४ नोव्हेंबर १९६१ रोजी त्यांनी आपलं पहिलं गाणं मल्याळम भाषेत "जाती भेदम् मत द्वेषम्" रेकॉर्ड केलं."अटेन्शन पेन्ने अटेन्शन" हे त्यांचं पहिलं गाजलेलं गाणं.मल्याळम नंतर त्यांनी सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत गायली आहेत.

येशुदास यांची काही गाजलेली हिंदी गाणी

१. जानेमन जानेमन तेरे दो नयन
२. गोरी तेरा गाँव बडा प्यारा
३. आज से पहले आज से ज्यादा
४. जानम जानम
५. कहाँ से आये बदरा
६. जिद ना करो अब तो रुको
७. हो गोरीया रे
८. माना हो तुम बेहद हँसी
९. दिल के टुकडे टुकडे करके
१०. तू जो मेरे सूर में
११. जब दीप जले आना
१२. चाँद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा
१३. सुरमयी अखियों में
१४. का करु सजनी
१५. मधुबन खुशबु देता है
१६. सुनयना इन नजारों को तुम देखो
१७. मोहब्बत बडे काम की चीज है
१८. धीरे धीरे सुबह हुई
१९. तुझे देखकर
२०. खुशियाँ ही खुशियाँ हो
२१. अो भवरे

(येशुदास यांनी गायलेल्या काही तमिळ,मल्याळम,कन्नड,तेलुगू गाण्यांच्या लिंक्स नंतर प्रतिसादातून पेस्टवतो.)

आमचे एक केरळी स्नेही म्हणतात,मनावरचा ताण हलका करायचा असेल तर एक उत्तम उपाय;हेडफोन लावून येशुदास यांची गाणी ऐकणं!

दैवी कृपा असलेल्या या दैवी आवाजाच्या गायकाला दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईशचरणी प्रार्थना.बाकी त्यांची गाणी चिरंतन आहेतच!

संस्कृतीकलासंगीतभाषासमाजजीवनमानशुभेच्छामाहितीसंदर्भप्रतिभा

प्रतिक्रिया

१.संगीतकार यशवंत देव यांनी येशुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत
https://m.youtube.com/watch?v=GXVzBI34h4E

२. वेलीवरी उमले कळी (चित्रपट: माझा मुलगा. मूळ मल्याळम असणारा मराठीत डब झालेला हा एकमेव सिनेमा)
https://youtu.be/JQ_52mi-TAg

३. वारा आला भेटायाला (नणंद भावजय)
https://youtu.be/FDvfyxpe1bY

४. मायेची सावली (नणंद भावजय)
https://youtu.be/rfdYbFlBAfg

पगला गजोधर's picture

10 Jan 2018 - 11:47 am | पगला गजोधर

मस्त लेख आवडला... १+

तुमच्याकडे प्लेलिस्ट आहे का अजून ?

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2018 - 10:32 pm | चौथा कोनाडा

मराठी गाण्यांसंदर्भात येसूदास यांचे नाव ऐकले नव्हते. या धाग्यामुळे ही माहिती मिळाली. धन्यवाद !

चारही गाणी ऐकली, क्लासिक आहेत ! गाण्यांचे शब्द देखील सुंदरच !

सिरुसेरि's picture

10 Jan 2018 - 12:25 pm | सिरुसेरि

छान ओळख . येसुदास यांनी गायलेले , इलायराजा यांचे संगीत असलेले " सिंधु भैरवी " या चित्रपटातील "महागणपतीम मनसा स्मरामी " हे गाणे खुप आवडते आहे .

उपयोजक's picture

10 Jan 2018 - 12:26 pm | उपयोजक

तमिळ

दैवम् तंद वीडु
https://youtu.be/zmfq3GsoSDU

कल्याणत्ते नीला
https://youtu.be/yDwDIlksjnA

मलरे कुरिंजी मलरे
https://youtu.be/x8A9ktuonKA

मल्याळम

सुप्रसिध्द हरिवरसनम्
https://youtu.be/UyCW91AhqNQ

प्रमादावानम् वींडुम्
https://youtu.be/g7jN78z5A4M

देवांगणंगल
https://youtu.be/bIXcK4mNhzY

तेलुगू

नवरससुमा मालिका
https://youtu.be/2CipBdbWaRk

आकाश देसाना
https://youtu.be/KDb67BTbvmY

आ पुला रंगु
https://youtu.be/Jt6r68D8bPA

बंगाली

पाथ हराबो बोले एबार
https://youtu.be/OWtJrsfzN18

नाम शोकुंतलो तार
https://youtu.be/UGDqsyR1TqY

सिरुसेरि's picture

10 Jan 2018 - 12:33 pm | सिरुसेरि

आलाप या अमिताभ , ऋषीकेश मुखर्जी जोडीच्या चित्रपटातली येसुदास यांनी गायलेली "चांद अकेला " , "कोइ गाता मै सो जाता " , "माता सरस्वती शारदा" ही गाणीही खुप गाजली अहेत .

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2018 - 1:14 pm | चौथा कोनाडा

समयोचित सुरेख लेख ! या महान गायका बद्दल माहिती मिळाली !
त्यांनी गायलेली हिंदी गाणी माझी आवडती !
हॅप्पी बर्थडे, येशुदासजी !

वा! येसुदास यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! लेख आवडला. अतिशय सुमधुर गाणी आहेत सर्वच.

पैसा's picture

10 Jan 2018 - 8:21 pm | पैसा

समयोचित लेख.

लेख आवडला.. न ऐकलेली गाणी आज ऐकेन.. धन्यवाद!

अंतु बर्वा's picture

10 Jan 2018 - 9:22 pm | अंतु बर्वा

इतर भाषेतली गाणी जास्त ऐकली नाहीयेत पण हिंदीतली जवळजवळ सर्व गाणी आवडतात. मागच्या सहा महिण्यांत सुरमयी अखियों में कमीतकमी दोन अडिचशे वेळा तरी पोराला झोपवायला वाजवले असेल. :-) इतर वेळी झोपताना किर्किर करणारं बाळ हे गाणं ऐकल की शांतपणे झोपी जातं. येसुदासांना शतायुष्य लाभो!

विशुमित's picture

11 Jan 2018 - 12:38 pm | विशुमित

अतीमहाप्रचंड सहमत....!!

गामा पैलवान's picture

10 Jan 2018 - 10:44 pm | गामा पैलवान

येशुदासांना अभिवादन व त्यांचे अभीष्टचिंतन. जीवेत शरद: शतम्.

-गा.पै.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2018 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा

वाचनखुण साठवली आहे. धन्यवाद. :)

"ळ" मिसिंग आहे प्रत्येक गाण्यातून. मल्याळम मध्ये तर ळ हा उच्चार आहे मग असे का झाले असावे असा प्रश्न पडला आहे.

बाकी वर चौथा कोनाडा यांनी म्हटल्याप्रमाणे...

चारही गाणी ऐकली, क्लासिक आहेत ! गाण्यांचे शब्द देखील सुंदरच !

Sandy

सस्नेह's picture

11 Jan 2018 - 12:27 pm | सस्नेह

येशुदास यांचे 'का करू सजनी' अत्यंत आवडीच्या गाण्यांपैकी एक आहे.

विशुमित's picture

11 Jan 2018 - 12:34 pm | विशुमित

अहाहा....!! लाजवाब

मंदार कात्रे's picture

11 Jan 2018 - 9:12 pm | मंदार कात्रे

के जे येसुदास यांचे " वाथापि गणपतिम भजेहम" हे मुत्थुस्वामी दीक्षितार रचित भजन देखील अतिशय सुन्दर आहे. नेट वर अनेक व्हर्जन्स उपलब्ध आहेत त्यापैकी एक अगदी अद्वितीय आहे

मूकवाचक's picture

12 Jan 2018 - 9:01 am | मूकवाचक

_/\_

ramjya's picture

12 Jan 2018 - 12:21 pm | ramjya

मस्त लेख...तुझे देखकर बर्याच वेळेसैकले आहे.

urenamashi's picture

14 Jan 2018 - 10:11 pm | urenamashi

प्रचंड मोठी फॅन आहे.... स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेली आहे त्यांना .....

गॅरी ट्रुमन's picture

17 Jan 2018 - 8:51 am | गॅरी ट्रुमन

येशुदास माझे अत्यंत आवडते गायक आहेत. वरील यादीत नसलेले पण तितकेच नितांतसुंदर असलेले एक गाणे इथे देत आहे. आनंद महल नावाचा एक चित्रपट येणार होता त्यात हे गाणे असणार होते. या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले पण नंतर काही कारणाने (नक्की कोणत्या ते माहित नाही) तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तरीही येशुदासांच्या आवाजातील हे गाणे आपल्याला आस्वाद घ्यायला मिळाले हे चांगलेच झाले. शास्त्रीय संगीतातील मला काही म्हणजे काहीही कळत नाही. कुठला राग आहे कुणास ठाऊक पण या गाण्यात जो कुठला राग आहे तो फारच सुंदर आहे.

चांदणे संदीप's picture

19 Jan 2018 - 11:44 am | चांदणे संदीप

एका दुपारी घरी असताना टीव्हीवर चॅनल बदलताना Asianet हा चॅनल चुकून लागला आणि हा कार्यक्रम लाईव्ह सुरु होता. येसूदास आणि सोनू एका स्टेजवर काय करत आहेत म्हणून थांबलो आणि माझी लॉटरीच लागली. साक्षात अमृतानुभव!

Sandy