गावाकडचे नवरात्र
स्मरण रंजन
नवरात्र
गावातील मोठ्या चौकात,मध्यभागी एक मोठा आड.
चौकाभोवती देशमुखांची पंधरा सोळा घरे.
देशमुख गल्ली.
दोन मोठी चिरेबंदी वाडे .
पैकी एक आमचा.
भाद्रपद वद्य ( पितृपक्ष)
संपायच्या आधी चार पाच दिवस ,म्हणजे
नवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या
साफसफाईची लगबग .
ओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील
खोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण.
स्त्री मजुरांकडून.
अंगणाच्या भिंतींना पिवळी खडी.
अंबाडीचे कुंच्याने किंवा पिकांवर,
डी.डी.टी. फवारणीचे फवार्राने.