संस्कृती
बेंगळुरूचा कार्तिक -१
कार्तिक महिना दक्षिण भारतामध्ये श्रावण महिन्याइतकाच महत्वाचा मानला जातो, विषेशतः महादेवाच्या पूजेसाठी. दर सोमवारी महदेवाच्या सर्व मंदिरांमध्ये महादेवाची विशेष पूजा-अर्चा केली जाते. बेंगळूरूच्या व्हाईटफिल्डमधील काही मंदिरांमधील पूजा आणि उत्सव चित्रस्वरुपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
एका धाग्यात सगळं लिहलं तर तो खुप मोठा होईल, म्हणुन, छोट्या छोट्या भागांमध्ये लिहित आहे.
सुरुवात करुया दिवाळीपासून. आपल्याकडे जसे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होते तसं इथे पिलेकाम्मा देवीच्या मंदिरात महागौरी पूजन करण्यात आले होते. त्याची काहि छायाचित्रे
मी आणि माझा न्यूनगंड - 2
हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!!
चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे.
जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही..
साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे.
शेवटी मी म्हणजे कोण?
हा देह? नाही नाही
मग या देहातील अस्तित्व?
चार्ज ड
"गुड मॉर्निंग"
चाळीशी चे वर्क फ्रॉम होम ६ फुटांवरून
गुड मॉर्निंग
"काय कसे काय"
Ok, nothing great, nothing bad either
"सर, एक प्रश्न विचारू"
माझ्या होकाराची वाट न बघता
"तुम्ही तुमचा मोबाईल १०० percent चार्ज व्हायची वाट बघता का"?
नाही. तसा कधी जास्त विचार केला नाही. तुमचे काय?
"सॉकेट आणि चार्जर ची कायम ची दोस्ती. सर्कस च होते.
कायम चार्ज वरून असुरक्षित वाटत राहते."
पुन्हा पानिपत!
वृक्षासिनी
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.
मी आणि माझा न्यूनगंड
जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते.
कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले.
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
रॉकस्टार
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.
गावाकडचे नवरात्र
स्मरण रंजन
नवरात्र
गावातील मोठ्या चौकात,मध्यभागी एक मोठा आड.
चौकाभोवती देशमुखांची पंधरा सोळा घरे.
देशमुख गल्ली.
दोन मोठी चिरेबंदी वाडे .
पैकी एक आमचा.
भाद्रपद वद्य ( पितृपक्ष)
संपायच्या आधी चार पाच दिवस ,म्हणजे
नवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या
साफसफाईची लगबग .
ओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील
खोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण.
स्त्री मजुरांकडून.
अंगणाच्या भिंतींना पिवळी खडी.
अंबाडीचे कुंच्याने किंवा पिकांवर,
डी.डी.टी. फवारणीचे फवार्राने.