बाहेरील रुपाला आतील विषयाइतकेच महत्त्व

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
25 Aug 2020 - 9:09 pm

अगदी आताआतापर्यंत अशी समजूत होती की, कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. काही प्रमाणात खोटे. खोटे अशाकरता की, आपण सगळे राहतो अशा समाजात ज्यात डोळे आहेत. कोणतीही गोष्ट कशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते. म्हणजेच, दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढे जाण्याचा निर्णय लवकर होतो.
कोणताही व्यवसाय किंवा कार्याचे क्षेत्र बाहेरून कसे दिसते, यावर त्याचे यश काही प्रमाणात अवलंबून असते. व्यवसाय बाहेरून चांगला दिसत गेला तर त्याच्या यशात कमीतकमी दहा टक्के वाढ नक्की होते. अर्थात, बाहेरून चांगला दिसत असताना आतला दर्जाही कायम रहायला हवा.
बाहेरून दिसण्याचे उदाहरण - आता आतापर्यंत मिनिटात खाण्याचा एक पदार्थ म्हणून लोक वडापावकडे पाहत होते. तो तळणारा माणूस फारसा चांगला दिसत नसला तरी, गाडी खराब दिसत असली तरी फार विचार न करता लोक वडापाव घेत असत. माझ्या माहितीत एक वडापावचे दुकान आहे. दुकान चालविणा-याने किंमत पूर्वीइतकी कायम ठेवून दुकान प्रशस्त केले. भरपूर प्रकाश देणारे दिवे लावले. काउंटर स्वच्छ ठेवला. सुटे पैसे हाताशी ठेवले. प्यायला पाणी ठेवले. वडापाव हेच उत्पादन. नवे काही नाही. वरील सर्व सोईसुविधांमुळे येता जाता लोक थांबू लागले. उत्पादनाची मागणी वाढली. वडापावसारख्या पाच बोटांत मावणा-या उत्पादनाला ग्लॅमर आले.
दुसरे उदाहरण घेऊ. एखाद्या हॉटेलमधल्या खोल्यांचा दर्जा मध्यम स्वरुपाचा असला तरी रिसेप्शनवरच्या सौजन्यामुळे ग्राहक तिथे थांबतो. रिसेप्शन ही हॉटेलची पहिली प्रतिमा आहे. खोल्या नंतर पाहिल्या जातात. आधी रिसेप्शन पाहिले जाते.
खूप वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राचे मार्केटिंग करण्याचा योग आला होता. आम्हाला प्रशिक्षण देताना सांगितले गेले होते - आतील सदरांबद्दल व्यवस्थित माहिती द्या. एखादे सदर कमअस्सल असले तरी तुमच्या संभाषणामुळे ग्राहक खरेदीकरिता उद्युक्त होईल. ग्राहकापुढे जाताना तुमचा सदरा स्वच्छ असू द्या. पहिली प्रतिमा चांगली झाली तर पुढे वृत्तपत्राचा खप वाढायला मदत होईल.
याच विचारातून बहुधा नोकर चाकर, प्यून हे शब्द बाद होत आहेत. Housekeeping personnel असा शब्द वापरला जात आहे. ग्लॅमर आले. व्यवसायांच्या बाबतीत जे आहे, तेच माणसांच्या बाबतीतही. गुणांनी उजवी असलेली मुलगीही दाखवायच्या कार्यक्रमात रीतसर सजून येते. गुण नंतर दिसतात. पहिली छाप चेह-याची पडत असावी.

संस्कृतीजीवनमानविचार

प्रतिक्रिया

सनईचौघडा's picture

25 Aug 2020 - 9:38 pm | सनईचौघडा

मुलगीही दाखवायच्या कार्यक्रमात रीतसर सजून येते. गुण नंतर दिसतात. पहिली छाप चेह-याची पडत असावी.>>>>
1000% खरं
पण आताशा अनाहिता नाहीत मिपावर नाहीतर कुठून पहिला लेख असा लिहला हेच वाटलं asate.
असो मिपावर स्वागत.

केदार पाटणकर's picture

26 Aug 2020 - 9:37 am | केदार पाटणकर

धन्यवाद प्रतिसादाखातर.

चांगला विषय. लेख थोडा त्रोटक वाटला तरी पण आवडला. आणखीन काही उदाहरणे देउन त्याची रंगत वाढवण्यासाठी स्कोप होता असे वाटतंय.
मिपावर स्वागत आणी पुढील लेखनास शुभेच्छा!

टीपीके's picture

26 Aug 2020 - 10:29 am | टीपीके

+१ असेच म्हणतो

कंजूस's picture

26 Aug 2020 - 10:33 am | कंजूस

नेमकं लिहिलंय.
आणखी वाचक भर घालतीलच. चांगली भपकेदार वस्तू राखायला कुणाला आवडत नाही? पण पैशाचं सोंग नाही आणता येत. शिवाय काही लोकांना स्वस्तात फंडीग मिळते तसे सर्वांनाच नाही मिळत.

शाम भागवत's picture

26 Aug 2020 - 11:18 am | शाम भागवत

चांगल रूप म्हणजे देवाकडून स्वस्तात किंवा फुकटात मिळालेले फंडिंगच की.

देव?
आता हा धागा शंबरी गाठणार.
;)

शा वि कु's picture

26 Aug 2020 - 12:59 pm | शा वि कु

सध्या मी एका स्टार्ट अप साठी काम करतोय.. चांगली कल्पना असून देखील अजून ते धावायला लागले नाहीयेत.. साधारण विचार करता असे लक्ष्यात आले की लोकांना स्वप्न विकावे लागते... जो लीडर अधिक लोकांना स्वप्न विकतो तो अधिक यशस्वी होतो.
तुमचे बाह्य रूप हे तुमचे ते विकले जाणारे स्वप्न आहे. आत काय आहे ते नंतर दिसते.. पण हे माझ्या कल्पनेतले उत्पादन आहे का हा प्रश्न जर आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकलो तर आपण यशस्वी होऊ शकतो..