तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
6 Sep 2025 - 10:44 am

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मनुवादी ब्राह्मणी अर्थव्यवस्था ही गरिबांच्या शोषणावर उभी होती. ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त उद्योगपतींनी मजुरांचे श्रम, त्यांचे हक्क आणि त्यांची माणुसकी यांची पायमल्ली केली. त्या काळात बॉलीवूडनेही जनतेच्या बाजूने भूमिका घेतली. चित्रपटांमधून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. मिल मालक 'प्राण' शोषण करणार्‍या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते—जो मजुरांच्या घामातून आपला वैभव उभारायचा.

स्वातंत्र्यानंतर जनतेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तत्कालीन पंतप्रधानांनी या शोषणकारी व्यवस्थेला आव्हान दिले. काही मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले. 80% आयकर लादून धनसंपत्तीच्या एकाधिकाराला लगाम घालण्यात आला. समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार पुढे आला. जनतेला शोषणातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण हे स्वप्न अपूर्ण राहिले. सरकारला पुन्हा ब्राह्मणी उद्योगपतींची मदत घ्यावी लागली.

आता भारतातील जनतेचे शोषण करणार्‍या या ब्राह्मणी उद्योगपतींच्या विरुद्ध लढ्याला मदत देण्यासाठी अमेरिका मैदानात उतरला. भारतीय कोल्ड ड्रिंक उद्योगपती जनतेचे शोषण करत होते. त्यांना नष्ट करण्यासाठी कोका कोला, पेप्सी भारतात आली. मिशन फत्ते केले. भारतातील ब्राह्मणी कोल्ड ड्रिंक उद्योग नष्ट झाला. भारतातील गरीब कामगारांना स्वस्त जेवण देण्यासाठी अनेक अमेरिकन पित्झा कंपन्या डोमिनो इत्यादि भारतात आल्या. कारगिल आणि बंजे ऑइल खाद्य तेल घेऊन भारतात आले. डालडा गगन ते गिन्नी इत्यादि अनेक खाद्यतेल ब्रांड दोन्ही कंपन्यानी आपल्या खिश्यात टाकले। पोस्टमन आणि इंद्रधनुषची मक्तेदारी उद्ध्वस्त केली. भारतातील गरीब जनतेला स्वस्त तेल उपलब्ध करून ब्राह्मणी अर्थव्यवस्थेची कंबर मोडून टाकली।

आज भारतातील जनतेला दूध ही अत्यंत महागत घ्यावे लागते. भारतातील ब्राह्मणी उद्योगपती अमूल, मदर डेअरी, नंदिनी इत्यादि जनतेचे शोषण करत आहे. ट्रंप तात्यांना हे पाहावले नाही. त्यांनी भारतात स्वस्त दूध विकून दूध पिणार्‍या जनतेला शोषण पासून मुक्ति द्यायची आहे. पण आज भारतात मनुवाद समर्थक, ब्राह्मणवादी शेटजी सत्तेवर आहेत. ते काही अमेरिकेला भारतीय जनतेचे भले करू देत नाही. उलट रशियाकडून क्रूड ऑइल घेऊन, स्वच्छ करून भारतील ब्राह्मणवादी उद्योगपती अरबो डॉलर कमवितात आहे. भारतीय जनतेचे शोषण करून रशियाला युद्धात मदत करत आहे.

तात्यांनी टेरिफ लावून भारतातील गरीब जनतेला ब्राह्मणवादाविरुद्धच्या संघर्षात मदत केली आहे. सर्व पुरोगामी मंडळींनी तात्यांचे आभार मानले पाहिजेत—कारण हा संघर्ष केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचा यज्ञ आहे.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अहो फोडा आणि झोडा नीती गोरे ईंग्रज आणि काळे ईंग्रज सर्वानाच सोयीची आहे नव्हे का?

पूर्वीचा मित्र सद्दाम तेल देण्याच्या विरोधात गेला त्याला दहशतवादी ठरवुन मारला. गद्दाफीने नखे दाखवली त्याचेही तेच केले. लादेन ला शीतयुद्धाच्या काळात पोसला, गरज सरली न मग स्वतःच ९/११ घडवुन त्याला दोषी ठरवुन टिपला. वदंता अशी आहे की भारत रशियाकडुन तेल घेतोय नी सौदीचे नुकसान होतेय, म्हणुन त्यांनी तात्यांना सुपारी दिलिय. आता तात्या युक्रेनच्या नथीतुन तीर मारुन ही तेल आयात थांबवायला बघताहेत. पण जिथे जर्जर ईराणने अमेरिकेचे ऐकले नाही तिथे भारत काय ऐकेल? म्हणुन ही फो. नी झो. नीती आरंभली आहे.

भारताने आपली शेती आणि दुग्ध मार्केट खुले करावे हि अमेरिकन मागणी अत्यंत रास्त आहे आणि तसे नको असेल तर अमेरिकन मार्केट भारतासाठी बंद राहील हे सुद्धा योग्य आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हाच नियम आहे.

भारतीय शेतकरी हे अत्यंत फुकटे आणि अकार्यक्षम आहेत. पाण्याची नासाडी, हवेचे प्रदूषण करून अत्यंत कमी पीक पिकवतात आणि वरून इतर करदात्याकडून सबसिडी उचलतात. त्याशिवाय ऍन सुद्धा हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि भेसळ युक्त आहे ह्यांत सुद्धा शंका नाही. ह्यांत शेतकऱ्यांची चूक नाही. भारतीय सरकारनेच नियम करून त्यांना ह्या चक्रांत सापडवले आहे. छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी शेती मोठया आणि जास्त कार्यक्षम शेतकऱ्यांना विकून शहराच्या दिशेने इतर धंद्यांत लक्ष घातले पाहिजे. भारतीय शेती हि आधुनिक आणि यांत्रिकी झाली पाहिजे. त्याशिवाय भारतीय लोकांना गरिबीतून वर येणे शक्य नाही.

ट्रम्प तात्यांची मागणी अत्यंत रास्त आहे.

भारतीय शेतकरी हे अत्यंत फुकटे आणि अकार्यक्षम आहेत हे एकदम मान्य. त्यावर सुधारणा अगदी आवश्यक आहेच. परंतु दुसर्‍याच्या घराच्या भिंती बांधायला आपल्या घराच्या विटा द्याव्या का?

विवेकपटाईत's picture

7 Sep 2025 - 7:58 am | विवेकपटाईत

भारतातील शेतकरी निकृष्ट दर्जाचे अन्न पिकवितात हा निष्कर्षाला काही आधार आहे का? भेसळ शेतकेरी करत नाही. तसे ही गहू तांदूळ, डाळी भेसळ जवळपास नाही. प्रश्न हा असायला पाहिजे, अमेरिकन गायींचे दूध हे खरोखर गायीचे दूध आहे का?
काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी अशोक नगर मध्य प्रदेशात एका नातेवाईक कडे गेलो होतो. त्या भागात मराठी जमीनदार आणि शेतकरी ही आहेत. एक मराठी जमिंदारच्या वाड्यात अनेक दुकाने आहेत. त्यात ते ही ट्रेक्टर विकतात. त्यांच्या मते जेंव्हा शेतकरी बैलाने शेती करत होता तेंव्हा कर्ज दहा ते वीस हजार. पण ट्रेक्टर घेतल्या नंतर ते कर्ज वाढून काही लाख होते. कारण शेतीचा आकार छोटा असतो. ही परिस्थिति. ते जुने ट्रेक्टर विकत घेऊन, दुरुस्त करून स्वस्तात विकतात. शेतीत बैल वापरणे त्यांना जास्त उपयुक्त.

कर्नलतपस्वी's picture

7 Sep 2025 - 8:54 am | कर्नलतपस्वी

७२-७३ मधे पडलेल्या भिषण दुष्काळात दयाळू अमेरिकेने किड्यासह दिलेल्या लाल ज्वारी ,मका आणी सकस लाल गव्हांवर बरीच भारतीय बाळकं आणी तरूण धष्टपुष्ट झालेले बघीतले आहेत. त्यामुळेच आता अमेरिकन दुध घेऊन पांग फेडण्याची संधी भारतीयांनी सोडू नये.

दुष्काळ ग्रस्तांच्या तोंडी गोड घास जावा म्हणून सुकडी दिली होती.

कर्नलतपस्वी's picture

7 Sep 2025 - 9:03 am | कर्नलतपस्वी

एव्हढे पिकवतो की आता अन्नधान्य आयात करावेच लागत नाही. तरीही कृ.बु.ला विचारता ती म्हणाली

"net exporter of major grains like wheat and rice; imports are primarily for specific needs, such as pulses, due to high domestic demand, or for specific situations"

Key reasons for India's food grain imports:
Pulses:
India is a major importer of pulses because domestic demand often exceeds production, making it a persistent import requirement, despite increasing domestic production.

The Sovereignty Debate: Trade Rules vs. Food Security

The larger concern in Delhi is that Trump’s tariffs are not about economic balance but political leverage. Framing the issue around India’s Russia ties gives it geopolitical cover, but insiders say the real agenda is agricultural market access.

Former JNU professor Biswajit Dhar called the move “a sovereignty challenge.”

“You cannot dictate trade terms that endanger food security and rural livelihoods. The WTO exists for a reason.”

India has long defended its right to food sovereignty, enshrined in laws like the National Food Security Act and supported by minimum support prices (MSP) and public procurement systems. Opening to U.S. agri imports would undermine price protections and risk destabilising grain markets.
https://www.google.com/amp/s/eng.ruralvoice.in/amp/latest-news/india-fa
जेव्हा दिल्लीत शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन झाले तेव्हा मोदी सरकारने माघार घेतली होती. त्यावेळेस हे सरकार "शेतकरीविरोधी" आहे असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते.
आता जी भूमिका मोदी सरकारने dairy आणि कृषी क्षेत्रा संदर्भात अमेरिके विरोधात घेतलेली आहे. यावर विरोधक काय म्हणतात ?
माझ्या मते मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याची क्षमता गमावून बसलेली आहे. नांगी टाकण्यात आलेली आहे. आणि शोकांतिका म्हणजे त्यासाठी त्यांचे appreciation सुद्धा होत नाहीये.
कृषी आणि डेअरी 100 टक्के ओपन करावे असे माझे मत आहे. आणि अमूल सारख्या संस्था मोडून काढाव्या असे माझे मत आहे.

https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/chandigar

या शेतकरी संघटना समोर मोदी सरकार झुकलेले आहे.

एकीकडे तात्या आपल्या ऊद्योजकांना इतर देशांना काॅन्ट्रॅक्ट देऊ नका म्हणतात आणी दुसरीकडे अमेरिकन दुध आणी कृषी क्षेत्रास भारतात पाय पसरू द्या म्हणतात. यावरून काय समजायचे ते समजा.

सरकार देशहित मधे काम करत असते. सध्याचे सरकारही तेच करत आहे. पं.प्र. शास्त्री, अटलजी आणी आता मोदी यांनी अमेरिकन धमक्यांना भीक घातली नाही. फक्त एकच गोष्ट हवी ,कितीही अंतर्विरोध असेल पण जागतीक पातळीवर सर्वजण संघटीत हवे.

सुबोध खरे's picture

8 Sep 2025 - 7:49 pm | सुबोध खरे

अमेरिकेत मिळणारे बहुतेक पदार्थ हे जेनेटिकली मॉडिफाईड अन्नापासून बनलेले असतात याशिवाय बहुसंख्य पशुखाद्य हे जेनेटिकली मॉडिफाइड आहे. याचा दूरगामी परिणाम काय आहे हे अजून माहिती नाही Genetically modified (GM) crops, such as corn, soybeans, cotton, canola, and sugar beets, are widely grown in the United States, with over 90% of these major commodity crops using GM varieties.

पण ते सर्व अमेरिकी जनतेच्या गळी उतरवले आहे.

फायझर मॉडर्न ची लस यांचे वाईट परीनं आता दृगोच्चर होऊ लागले आहेत. असले अन्न भारतात आणून भारतीय शेतकऱ्यांना उपाशी मारण्यापेक्षा ते न आलेलेच बरे.

While their primary diet is vegetarian, some dairy cows are fed non-vegetarian ingredients, which has led to trade issues with India due to cultural and religious concerns.

अमेरिकेत शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते USDA Expediting $10 Billion in Direct Economic Assistance to Agricultural Producers
https://www.google.com/search?q=genetically+modified+crops+in+the+united...

यामुळे अमेरिकेने/ आणि अमेरिकेत राहणाऱ्यांनी भारताला शेती बद्दल अक्कल शिकवायला जाऊ नये.

सुक्या's picture

8 Sep 2025 - 10:24 pm | सुक्या

यामुळे अमेरिकेने/ आणि अमेरिकेत राहणाऱ्यांनी भारताला शेती बद्दल अक्कल शिकवायला जाऊ नये.
+१

अमेरिकेत जे जे काही खाद्य विकत मिळते त्यातले अगदी ७०% तरी जेनेटिकली मॉडिफाईड अन्नापासून बनलेले असते. त्यावर त्याचे शेल्फ लाईफ वाढवायसाठी भरमसाठ केमिकल टाकलेले असतात. त्याउपर आजवर रेडी टु ईट या बाबीचा प्रसार ईतका झाला आहे की अमेरिकन लोकांना भारतीय लोक बनवता तसे अन्न बनवताच येत नाही. एकतर कच्या भाज्या खाणे किंवा जे जसे मिळेल तसे खाणे एवढेच त्यांना येते.

त्यामुळे अमेरिकन शेती उत्पादने दिसायला कीतीही सुंदर असली तरी ती ब्याद भारतात यायलाच नको.

कर्नलतपस्वी's picture

7 Sep 2025 - 5:34 am | कर्नलतपस्वी

प्रथमदर्शनी विडंबन म्हणून लिहीलेला लेख बरेच काही सांगून जातो.

पिझ्झा बर्गर ने जर्जर होणारी पिढी अमेरिकन दुध पिवून सशक्त होईल.

बदामाची आलेली खेप परत पाठवली हे ही चुकीचे पाऊल होते.

काळी मिरी,लवंगा,दालचिनी सर्व शेती अमेरिकेला दिली तर उत्पादन नक्कीच वाढेल व भारतीय अकार्यक्षम शेतकरी कार्यक्षम मजदूर नक्कीच बनेल.

भारतीय इकाॅनाॅमीक चांगले होईल व अमेरिकन बेरोजगारांना मिळणाऱ्या खिरापती प्रमाणे आपल्या इथे पण वाटप करता येईल. आणी टॅक्स पेयर चा पैसा सत्कारणी लागेल.

विडमबनात्मक छान लेख. पूर्वीची सरकारे हेच तर करून आम्हा सामान्यनिम्नवर्गीय मध्यमवर्गीयाना गरीबीच््या खाईत लोटले होते . नको आठवणे ते लहानपण व शिक्षण पूर्ण होईपर्यतची गरिबी.. फारशी नन्तरही सुटली नाही पण छोट्या गरजान्साठी मग नोकरीला लागल्यावरचा थोडा पैसा तरी हाताशी होता. किचित खाऊपिऊ शकणे व कपडे अशा अत्यावश्यक गरजा तरी माझ्या मीच पुर्या करू शकत होते.

अरथात याला कुटम्बातील कर्त्या व्यक्तीच्या अगदी थोङ्या चुकाही कारणीभूत होत्या.. पण सतत महागाई वाढणे ईन्कमटक्स व निर्वासित कर बान्गला देश युद्धामुळे लादून आधीच कमी असलेला वडिलान्चा पगार अजून कमी येऊन घर गरिबीत व बिनपैशामुळे घरात सर्वच वस्तून्ची टन्चाईमुळे साबण अन्न् धान्य पुरेसे कापड कपडे स्वच्छते करिता अत्यावशक असलेलेही घरात नसे त्यामुळे मलातरी घर अस्वचछ वाटे जे आता होत नाही कारण माणसाच्या मानाने ऊत्पन्न पुरून ऊरेल इतके आहे त्यामुळे भविष्याची तरतूद करून या ज्येष्ठ वयाला आरामात रहाता येते एकुलत्या मुलीचे कोडकौतुक पुरवता येते अर्थात
तीचे ती पण मिळविते पण लहानपणी तिच्या खूप कौतुकाने सर्व पुरवता आले याचे एक समाधान आहे जे जेआम्हाला मिळाले नाही ते सर्व व त्यावरसुद्धा कौतुक करता आले.

अरथात याला कुटम्बातील कर्त्या व्यक्तीच्या अगदी थोङ्या चुकाही कारणीभूत होत्या.. पण सतत महागाई वाढणे ईन्कमटक्स व निर्वासित कर बान्गला देश युद्धामुळे लादून आधीच कमी असलेला वडिलान्चा पगार अजून कमी येऊन घर गरिबीत व बिनपैशामुळे घरात सर्वच वस्तून्ची टन्चाईमुळे साबण अन्न् धान्य पुरेसे कापड कपडे स्वच्छते करिता अत्यावशक असलेलेही घरात नसे त्यामुळे मलातरी घर अस्वचछ वाटे जे आता होत नाही कारण माणसाच्या मानाने ऊत्पन्न पुरून ऊरेल इतके आहे त्यामुळे भविष्याची तरतूद करून या ज्येष्ठ वयाला आरामात रहाता येते एकुलत्या मुलीचे कोडकौतुक पुरवता येते अर्थात
तीचे ती पण मिळविते पण लहानपणी तिच्या खूप कौतुकाने सर्व पुरवता आले याचे एक समाधान आहे जे जेआम्हाला मिळाले नाही ते सर्व व त्यावरसुद्धा कौतुक करता आले.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

7 Sep 2025 - 9:41 am | माईसाहेब कुरसूंदीकर

एफ ३५ विमाने खरेदी करण्यास भारताने दिलेला नकार, रशिया/चीन बरोबरचे संबंध आणी सौदी/अमेरिकेकडुन तेल घेण्यास भारताने दिलेला नकार ह्यामुळे ट्रम्प आणि त्यांची लॉबी खवळली आहे. पाकिस्तानसारखे भारताला पटवता येइल असा ट्रम्प ह्यांचा गैरसमज होता.

अभ्या..'s picture

7 Sep 2025 - 3:01 pm | अभ्या..

rt

ब्राह्मणी उद्योगपती हा शब्द अमेरिकन सचिवाने वापरला आहे.

व्यापारात मोठा मासा लहान मासा ही पद्धत आहे. त्यात सर्वच देश, संस्कृती आले.

श्वेता व्यास's picture

8 Sep 2025 - 3:06 pm | श्वेता व्यास

लेख आवडला

गामा पैलवान's picture

8 Sep 2025 - 5:50 pm | गामा पैलवान

माझ्या मते नावारोनानांनी ब्राह्मण हा शब्द 'बोस्टन ब्राह्मिन' या संदर्भात वापरलेला आहे. बोब्रा विषयी अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Boston_Brahmin

बोस्टन ब्राह्मिन यांचा अर्थ प्रस्थापित उच्चभ्रू पैसेवाले असा होतो. याचा भारतातल्या ब्राह्मण नामे जातीशी वा तत्सम वर्गाशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही.

-गा.पै.

विवेकपटाईत's picture

10 Sep 2025 - 5:18 pm | विवेकपटाईत

या लेखात भारतीय उद्योगपतींच्या संदर्भात ब्राम्हण शब्द वापरला आहे. जगात अस्थिरता पसरवून तिथेले उद्योग नष्ट करणे हा अमेरिकेचा प्रिय खेळ आहे.

माहितगार's picture

11 Sep 2025 - 6:08 pm | माहितगार

एकदम बेस्ट ऑफ विवेक पटाईत!!