विरंगुळा

जावे IT च्या डिपार्टमेंटा

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
27 Dec 2022 - 6:12 pm

Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे?

विनोदविरंगुळा

शब्द कल्लोळ

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
25 Dec 2022 - 9:38 am

शब्द कल्लोळ!
शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने,
(अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई.
गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत.
अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.
     'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!

विनोदविरंगुळा

पंचगंगातिरीचा दिपोत्सव

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
12 Nov 2022 - 11:46 am

पंचगंगा घाट

संस्कृतीकलामुक्तकसमाजदेशांतरछायाचित्रणआस्वादसमीक्षालेखअनुभवविरंगुळा

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
5 Nov 2022 - 1:10 am

साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान.

क्रीडाप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

अमू- OTT सिनेमा

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
4 Nov 2022 - 2:09 pm

अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं.

एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते.

kathaaसमीक्षाविरंगुळा

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
23 Oct 2022 - 12:11 pm

Byculla

यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख. मुंबईत अनेकवेळा जाणं झालं असलं तरी भायखळ्याला जाऊन त्या स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीला भेट देण्याची संधी अलिकडेच मिळाली होती.

मांडणीसंस्कृतीइतिहासमुक्तकप्रवासविचारलेखअनुभवमाहितीविरंगुळा

माझिया मनाला ( कथा )

चष्मेबद्दूर's picture
चष्मेबद्दूर in जनातलं, मनातलं
18 Oct 2022 - 9:47 pm

अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

साहित्यिकविरंगुळा