✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिक्षा.....

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 09/11/2025 - 16:24  ·  लेख
लेख
टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्‍यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले. "मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले. " कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच. तूच ठरव काय शिक्षा घ्यायची ते" सुमित्रा म्हणाली. " मी कोपर्‍यात पाच मिनीटे अंगठे धरून उभा रहातो" मन ने स्वतःच शिक्षा ठरवली आणि तो कोपर्‍यात उभा राहिला. खळ्ळ..... सुमित्राकडून धुवत असताना बेसीन मधे एक कप फुटला. मन हे पहात होता हे सुमित्रालाही जाणवले. " बघ माझ्याकडूनही चूक झाली. आता तू मला शिक्षा दे." सुमित्रा म्हणाली. " ते चुकून झाले ना!. तू काय मुद्दाम होऊन केले आहेस? चुकून झाले त्याला शिक्षा कशाला द्यायची" मन च्या उत्तरावर सुमित्रा नि:शब्द झाली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
2191 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

आधुनिक झेन/जातक कथा!

युयुत्सु
गुरुवार, 09/11/2025 - 17:23 नवीन
आधुनिक झेन/जातक कथा!
  • Log in or register to post comments

आवडली.

श्वेता व्यास
गुरुवार, 09/11/2025 - 18:29 नवीन
आवडली. आमचं लहानपण आठवले, लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे. आईकडून कप फुटला की इथे कोणी ठेवला आणि आईने ठेवलेला कप इतरांकडून फुटला की नीट बघता येत नाही का तुम्हाला. :D
  • Log in or register to post comments

हा हा हा ....

श्वेता२४
गुरुवार, 09/11/2025 - 22:39 नवीन
लहानपण कशाला; अजूनही तसंच आहे अगदीच असं होतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

असोच

अभ्या..
गुरुवार, 09/11/2025 - 18:49 नवीन
विजूभाऊ सारख्या कसलेल्या लेखकाकडून इतकी प्रायमरी प्रतिलिपी स्टाइल भाबडी कथा अपेक्षित नाही. असो...
  • Log in or register to post comments

नाहितर काय? अतिशय दवनिय कथा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 09/11/2025 - 21:58 नवीन
नाहितर काय? अतिशय दवनिय कथा आहे. वाचून सगळा मूड गेला आता एखादी मचाक वाचल्याशिवाय किंवा नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

युयुत्सु
Fri, 09/12/2025 - 07:59 नवीन
नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र धागा वाचल्याशिवाय मूड बनणार नाही. ;) हा हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अरे बापरे....

विजुभाऊ
Fri, 09/12/2025 - 10:31 नवीन
अरे बापरे.... अभ्या भाउ.... मनावर घेतो तुमचे म्हणणे. नक्की. एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

घ्याच

अभ्या..
Fri, 09/12/2025 - 14:45 नवीन
एखादी झ्याक प्रेमकथा तळायला घेतो. होऊं द्या खरपूस अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

छान. नवीन काळात कमी आकारात

गवि
Fri, 09/12/2025 - 06:58 नवीन
छान. नवीन काळात कमी आकारात काही कथा आणि आशय बसवणे ही गरज आहे.
  • Log in or register to post comments

आता तू मला शिक्षा दे." सुमित्रा म्हणाली.

कर्नलतपस्वी
Fri, 09/12/2025 - 07:27 नवीन
ही गोष्ट आमच्या काळातली होती. आजच्या काळात अशी पनिशमेंट द्यायला हवी. तू मला" डबल टाॅपिंग पिझ्झा,फ्रेंच फ्राईड आणी दोन तास एक्स्ट्रा स्क्रिन टाईम दे ", बादवे,हाताचे आंगठे का पायाचे?
  • Log in or register to post comments

सत्य वचन!!

असंका
Sat, 09/13/2025 - 06:04 नवीन
सत्य वचन!! आवडली गोष्ट!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

छोटीशी गोष्ट आवडली.

पर्णिका
Mon, 09/15/2025 - 08:41 नवीन
छोटीशी गोष्ट आवडली. आपल्या मुलांकडून येणारे असे टँजेन्ट्स आपले अनुभवविश्व समृद्ध करतातच पण माणूस म्हणून घडवतातदेखील. मी लिहिन माझे काही अनुभव, इतरांचेही वाचायला आवडतील. :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा