असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
28 Dec 2014 - 9:41 pm

असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

खेळाडूंसाठी सूचना: [प्रेक्षकांसाठी सूचना याच धाग्यात शेवटी दिलेल्या आहेत]

१. थेट मिपावरच ऑनलाईन बुद्धीबळ खेळण्यासाठी "बुद्धीबळ नोंदणी" या दुव्यावर जाऊन नोंदणी करा. त्या तारखेस आणि वेळेस दोन्ही खेळाडू उपस्थित असणं आवश्यक आहे.

२. "ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे खेळाडूंनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे:
वर आणि खाली अशा दोन एकसारख्या खिडक्या आहेत.

वरील खिडकी - प्रथम आव्हान देणारा/री खेळाडू: पांढरी मोहोरी - Name: (MiPa1); Password: (1White)
'Go' वर क्लिक करा.

खालील खिडकी - आव्हान स्वीकारणारा/री खेळाडू: काळी मोहोरी - Name: (MiPa2); Password: (1Black)
'Go' वर क्लिक करा.

३. तुमच्याच खिडकीत नवीन पान उघडेल, त्याचा वरील भाग खालीलप्रमाणे दिसेल. चित्रात लिहिलेल्या सूचना आणि गोष्टी दर्शवणारे बाण पहा.

--

आता वरच्या चित्रात दर्शवलेला स्क्रोल बार वापरून तळाशी जा, पानाचा खालचा भाग असा दिसेलः

--

मधल्या बाणाने दर्शवलं आहे तिथे '1' हा आकडा टाका आणि तळाशी बाणाने दर्शवलं आहे तिथे तुमचा (शून्यापासून) बदललेला 'preference' 'change' हे बटन दाबून save करा. स्क्रोल बार वरती करून वरच्या उजव्या कोपर्‍यातलं 'refresh' हे बटन दाबा.

तुमच्या विरोधी खेळाडूने याच सर्व स्टेप्स केल्या की त्याचं/ तिचं नाव (MipA1 / MiPa2 असं) वर मधल्या बाणाने दाखवलं आहे तिथे खालीलप्रमाणे दिसायला लागेल:

--

त्या खेळाडूच्या नावावर क्लिक करून मग स्क्रोल बार वापरून तळाशी जा, आणि न विसरता 'refresh' बटन दाबा. [हे 'refresh' बटन प्रत्येक बदलानंतर/ खेळीनंतर दाबणं महत्वाचं आहे!]

४. दोन्ही खेळाडूंनी वरील खेळपटावर प्रवेश करण्याच्या स्टेप्स पूर्ण केल्या की नवीन पान उघडेल ज्यात खाली दर्शवल्याप्रमाणे 'प्ले' बटन दिसेल, जे दाबून तुम्हाला खेळ सुरू करता येईलः

--

ज्या खेळाडूने पांढरी मोहोरी घेऊन सुरूवात करायची आहे त्याचे/ तिचे MipA1/ MiPa2 असे नाव सूचनेत दिसेलः ...to move

५. आता (एकदाचा!) पट उघडेल. मग पांढरी मोहोरी असलेल्या खेळाडूने माऊसच्या / कीपॅडच्या 'सिलेक्ट' की च्या वापराने हवं त्या मोहोर्‍याला स्पर्श करून क्लिक करायचं आणि त्याला हवं त्या ठिकाणी हलवायचं. झाली सुरूवात.

--
फक्त, न विसरता, प्रत्येक खेळीनंतर 'refresh' बटन दाबणं महत्वाचं आहे! त्याशिवाय तुमच्या प्रतिस्पर्ध्याला पुढची खेळी करता येणार नाही.

६. काही कारणाने डाव पुढे चालू ठेवणं शक्य नसेल तर दोघांपैकी एका खेळाडूने 'तळाशी असलेले 'resign' बटन दाबून प्रतिस्पर्ध्याला ते कळवलं पाहिजे. हे करण्यासाठी 'resign' बटन दाबून झाल्यावर 'refresh' बटन दाबणं महत्वाचं आहे, म्हणजे प्रतिस्पर्द्याला त्याच्या/ तिच्या खेळीच्या वेळी डाव 'resign' केला गेला आहे अशी सूचना मिळेल.
डाव बरोबरीत सोडवण्यासाठी 'offer to draw' हे तळाचं बटन दाबलं पाहिजे, आणि 'refresh' बटन दाबून प्रतिस्पर्द्याला सूचना दिली पाहिजे.

डाव 'resign' केला गेला, 'draw' झाला किंवा निर्णायक ठरून दोघांपैकी एकाचा विजय झाला, की अखेरीस न विसरता प्रत्येक खेळाडूने पटाच्या उजवीकडे मध्यभागी असलेले 'back' हे बटन पुन:पुन्हा दाबून सर्व मोहोरी सुरूवातीच्या स्थितीस आणून ठेवली पाहीजेत. पट पूर्णपणे शून्य स्थितीस आल्याशिवाय पुढच्या खेळाडूंना त्यांचा डाव सुरू करता येणार नाही.

तसेच डाव पूर्ण झाल्यावर दरवेळी न विसरता सामन्याच्या निकालाची नोंद नोंदणी - तक्त्यात करून वर उजवीकडे असलेले 'Share' हे बटन दाबा.

प्रेक्षकांसाठी सूचना:
"ऑनलाईन बुद्धीबळ" या धाग्यात प्रवेश करा. तिथे प्रेक्षकांनी खालीलप्रमाणे log in करायचं आहे:
Name: (MiPa3); Password: (Watch)

'Go' वर क्लिक करा.

त्यानंतर खालील खिडकी उघडेल, त्यात दर्शविल्याप्रमाणे कृती करा:

--

चला तर मग, बुद्धीबळाचा सामुहिक आनंद घेउयात!

क्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Dec 2014 - 11:19 pm | प्रचेतस

धन्यवाद बहुगुणी ह्या धाग्याबद्दल.
आपण केलेल्या सूचनांनुसार आताच बिरुटे सर आणि माझी प्रायोगिक तत्वांवरील मॅच संपन्न झाली.
खेळात जाम धमाल आली.

बहुगुणी's picture

28 Dec 2014 - 11:33 pm | बहुगुणी

प्रेक्षक म्हणून मीही मॅच एंजॉय केली.

(यापुढील प्रतिसाद बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते या धाग्यात आले तर हा 'असं खेळा बुद्धीबळ' धागा केवळ सूचनांसाठी वाचनमात्र ठेवता येईल.)