हैराण इराण !!
14 जुन ला इराणच्या नवीन म्हणजे ११ व्या अध्यक्षांसाठी निवडणुका झाल्या. इराणी जनतेने भरभरून मतदान केले. पाच कोटी पाच लाख मतदारांपैकी घसघशीत ८०% मतदारांनी मतदान केले. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकी पेक्षा प्रचंड मतदान झाल्याने इराण मध्ये लोकशाही नाही असे म्हणणा-यांची तोंडे काही काळासाठी तरी बंद झाली होती. अमेरिकेच्या निवडणुकीत ५०% च मतदान झाले होते. निवडून आलेल्या हासन रोहानी यांना ५०% हून थोडे अधिक मतदान झाले. रोहानी अध्यक्ष होणार हे समजल्यावर इराणी जनतेने एका अर्थाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. कारण इराणी जनता आता एकूणच त्यांच्या सद्य परिस्थितीला पकली आहे.