" आरती कंत्राटदाराची - "

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
25 Jul 2013 - 10:16 am

'
जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा
थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||

साटे लोटे तुमचे जमले असेल
आगाऊ रक्कम घेतली असेल
लाज शर्म थोडी शिल्लक असेल
नैतिकता काही ध्यानीमनी धरा ||

पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे
सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे
विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे
खाल्लेल्या पैशावर उपकार करा ||

अपचन अजीर्ण होऊ देऊ नका
डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका
आयकरवाले पहा घालतील डाका
घरच्या लक्ष्मीची आठवण करा ||
.

शांतरसकविताराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

25 Jul 2013 - 5:19 pm | अभ्या..

हम्म. मस्त लिहिले आहे.
अगदी इथल्या आरतीची आठवण झाली. परवाच तिच्या पप्पांना खड्डेदुरुस्तीचे टेंडर मिळाले अन हिला नवीन ट्याब २.
एवढी हुशार न स्मार्ट नाहीये पण पप्पांनी पीडब्ल्यूडीतला ईई बघितलाय म्हणं तिच्यासाठी.