राजकारण

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
24 Mar 2013 - 11:12 pm

1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.

श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.

अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.

संपादक मंडळास नम्र विनंती.

तेरी कौनसी है मंझील

विकास's picture
विकास in काथ्याकूट
22 Mar 2013 - 3:46 am

"बीस साल बाद" या चित्रपटातील "कही दीप जले कही दिल" या अवीट गोडीने म्हणलेल्या पण गुढ गाण्यात गायीका आणि चित्रपटातील नायीका, वीस वर्षां नंतर परदेशातून गावी आलेल्या नायकाला सावध करताना त्याला "तेरी कौनसी है मंझील" म्हणत असते.

याला न्याय कसं म्हणायचं

रामबाण's picture
रामबाण in काथ्याकूट
21 Mar 2013 - 11:58 am

१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बाँब स्फोट खटल्याचा आता सर्वोच्च न्यायालयात निकाल देणं सुरु आहे.
तसा हा देशावरचा पहिला आणि सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, २५७ लोकांचा जीव घेऊन गेला.
दाऊद, टायगर वगैरे मुख्य आरोपी पाकिस्तानात सुखरुप आहेत. बाकींच्यांना घेऊन २० वर्ष उलटली तरी खटला सुरुच आहे. बहुतांश पब्लिकला संजुबाबाचं काय होणार याचीच उत्सुकता आहे.
आता २० वषांनंतर काहीही निकाल लागला तरी, जे गेले त्यांना... ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना... जे जखमी झाले त्यांना... ज्यांचं सगळं आयुष्यंच बदलून गेलं त्यांना.. न्याय वगैरे मिळाला असं कसं म्हणता येईल?

माहेरचा अव्हेर!

आजानुकर्ण's picture
आजानुकर्ण in काथ्याकूट
12 Mar 2013 - 8:26 pm

भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.

इमोशनल फुलांच्या देशा…

रामबाण's picture
रामबाण in जनातलं, मनातलं
11 Mar 2013 - 10:35 am

आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं.

आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे.

आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य.

40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय... तर, नमस्स्स्त्ते.

समाजजीवनमानराजकारणविचारअनुभवमत

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Mar 2013 - 3:26 pm

विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.

धोरणसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानराजकारणप्रकटनविचारमाध्यमवेधबातमीमतमाहितीसंदर्भवाद

मतदान पध्दत

NiluMP's picture
NiluMP in काथ्याकूट
26 Feb 2013 - 1:56 pm

देशाचे प्रतिनिधित्व राजकारनी करतात हे मान्य पण मतदान करून नेता निवडून देणे ही पध्दत चुक की बरोबर.

माझया मते चुक आहे कारण

१ मतदान पध्दतीमुळे व्होटबॅंक ही समस्या निर्माण झाली
२ व्होटबॅंकमुळे शहरे बकाल झाली आणि अनैतिक धंदे वाढले
३ अनअधिकृत बांधकामे वाढून भ्रष्टाचार वाढला
४ राजकीय घराणेशाही जोर धरू लागली
५ कायदा आणि सुव्यवस्था हतबल झाली

तसेच, टिव्हीवरील रिअल्टी शो आणि मतदान यातील फरक

संसद: बजेट सत्र २०१३

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
22 Feb 2013 - 9:29 am

याआधी आपण २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. काल, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू झाले आहे.