कला
तारे तोडण्याची स्पर्धा
प्रेषक, गिरीजा, Tue, 09/04/2013 - 18:03नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्या नेत्याने तारे तोडले .
एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे .
असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन !
नायक क्रमांक एक
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Tue, 02/04/2013 - 16:17आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
प्रेषक, पाषाणभेद, Sun, 31/03/2013 - 21:34एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.
निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.
शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!
निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?
गुंडा
प्रेषक, मृत्युन्जय, Thu, 28/03/2013 - 17:58क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर
गायन = लता / आशा / किशोर / रफी
संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन
अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी
सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर
लेखक = पु ल / व पु / सावंत
कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे
पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ
ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड
फिर काहे दर्द जगाओ
प्रेषक, इनिगोय, Mon, 18/03/2013 - 11:46तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस.
पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे..
तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे.
आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे.
पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
कसं रोखावं आता ह्याला? कसं सांगावं, पुन्हा नको त्या वाटांवरून चालूस?
कोस्टर्स
प्रेषक, जयवी, Mon, 11/03/2013 - 13:03नेटवर ही दोन अगदी वेगळी डिझाईन्स मिळाली. ह्या लिंक्सवर
http://idealdelusions.blogspot.com/p/kitchen-kolors-trivet.html
आणि
http://made-in-k-town.blogspot.de/2012/06/spiral-coasterpotholder-patter...
झाल्यावर इथे शेअर केल्याशिवाय राहवेना 
वर्तुळ-कोन सिद्धांत
प्रेषक, श्रावण मोडक, Fri, 08/03/2013 - 17:57"
नूतन - एक सुंदर स्वप्न.
प्रेषक, प्रथम फडणीस, Thu, 21/02/2013 - 14:17डिझाईनर क्रोशे स्टोल
प्रेषक, जयवी, Thu, 21/02/2013 - 09:19हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं 
हे एक साधंच पण नाजुक डिझाईन
परका काळा घोडा
प्रेषक, वेल्लाभट, Wed, 20/02/2013 - 22:08'मला ना, का कोणास ठाउक, इथे येऊन असं एखाद्या परक्या प्रांतात आल्यासारखं वाटलं.', माझी बायको म्हणाली. त्या वेळी, आणि त्या आधी तीन तास मला तेच वाटत होतं पण नेमक्या शब्दात मांडता येत नव्हतं.
दहावी झाल्यानंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत मित्रांबरोबर मुंबईला गेलो होतो तेंव्हाही हे असंच 'परक्या प्रांताचं' फीलिंग आलं होतं. पण तेंव्हा कुतुहल, उत्सुकता, या गोष्टी मोठ्या होत्या त्यामुळे ते तसं जाणवलं नाही. तिथली गर्दी परकी वाटली नाही, त्या गर्दीचा उबग आला नाही, गोंगाटाचा त्रास झाला नाही की काही नाही. या वेळी काळा घोडा कला उत्सवाला मात्र असं सगळं वाटलं. मन रमलं नाही.
